जव्हार प्रतिनिधी,
वाड्यात मशाल गौरव पुरस्काराचे वितरण,
ठाणे व पालघर जिल्ह्यातून प्रकाशित होणाऱ्या ‘मशाल’ या वृत्तपत्राच्या ३१ व्या वर्धापनदिनानिमीत्त मशाल गौरव पुरस्कारांचे वितरण शरद नगर येथे करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते प्रकाश पाटील,माजी राज्यमंत्री मनीषाताई निमकर,कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील, खा.डॉ.हेमंत सवरा,सद्गुरु अलोकनाथ महाराज,उबाठाचे सहसंपर्क प्रमुख निलेश गंधे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, प्रसिद्ध सिने अभिनेत्री सिया पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यामधे आदर्श लोकप्रतिनीधी खा.डॉ.हेमंत विष्णू सवरा,आदर्श संस्थाचालक शिल्पा शिंदे, आदर्श युवा कार्यकर्ता मनोज कमा कामडी,आदर्श धार्मिक ट्रस्ट सद्गुरु आलोकनाथ महाराज,आदर्श फोटोग्राफर दिपक गोळे,उत्कृष्ट पत्रकार दिपक चंदे,आदर्श युवा उद्योजक प्रितम भोपतराव, आदर्श सामाजिक संस्था प्रिया गंधे,आदर्श फोटोग्राफर सुधीर दुरगुडे यांना मान्य
वरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
यावेळी ‘संघर्षमूर्ती’ सन्मान मिळवलेल्या सामाजिक कार्यकर्त्या स्व. लक्ष्मीबाई यशवंत पाटील ( रा. पिक ) यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. वाडा शहरामधे हा पहिलाच पुतळा बसवला गेला आहे. त्यावेळी समारंभास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मशाल वर्धापनदिनानिमीत्त आ. हरिश्चंद्र भोये,माजी आ.सुनिल भुसारा,शिवसेना जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण,भाजपाचे उपाध्यक्ष संदिप पवार, काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष प्रफुल्ल पाटील,जि.प.चे माजी सभापती संदिप पावडे,माजी सभापती योगेश गवा,माजी उपसभापती अमोल पाटील, काँग्रेसचे तालुकाप्रमुख दिलीप पाटील,शिवसेना तालुकाप्रमुख निलेश पाटील,पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे,मराठा सेवा संस्थेचे नेते नितीन मोकाशी,जि.प.चे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पारस्कर, चंद्रशेखर जगताप,प्रांत अधिकारी संदिप चव्हाण, तहसीलदार भाऊसाहेब अंधारे,गटविकास अधिकारी वैभव शिंदे,यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल पटारे यांनी तर संपादक शरद पाटील यांनी आभार मानले.

