सचिन परब,वसई
अवकाळी पावसामुळे वसई विजयोत्सव दिन उत्सवाच्या तारखेत बदल,
वसई विरार शहर महानगरपालिकेने २८७ वा वसई विजयोत्सव दिन सोहळा १० ते १२ मे २०२५ असा तीन दिवसीय कार्यक्रम आयोजित केला होता.मात्र,मंगळ.६ ते ८ मे २०२५ या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे नरवीर चिमाजी अप्पा स्मारक परिसरामध्ये पाणी साचले, सोबत या संपूर्ण कार्यक्रमाचे मुख्य ठिकाण असलेला परिसरात चिखलाचे सम्राज्य निर्माण झाले आहे.

तसेच हवामान खात्याच्या सुचनेनुसार,पुढील तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेने वसई विजयोत्सव कार्यक्रम तीन दिवसांच्या ऐवजी फक्त एक दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे सोम.१२ मे २०२५ रोजी फक्त एक दिवसीय कार्यक्रम आयोजित केला असून परंपरेनुसार,बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी,सोम.१२ मे २०२५ रोजी सकाळी ठीक ७. ०० वाजता,वज्रेश्वरी येथील श्री वज्रेश्वरीदेवी मंदिरात मशाल प्रज्वलित करून मशाल मिरवणूक मोटरसायकल रॅलीद्वारे वसई पारनाका येथे नेण्यात येईल.
श्री वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिर,शिरसाड फाटा,राष्ट्रीय महामार्ग,वसई फाटा मार्गे वालीव नाका,रेंजनाका, गोखिवरे नाका,अंबाडी रोड रेल्वे ओव्हर ब्रिजवरुन पश्चिमेकडे,अंबाडी रोड, माणिकपूर,भाबोळा,पापडी, तामतलाव,पारनाका येथे येईल व पारनाका येथून तहसील कार्यालयमार्गे वसई किल्यापर्यंत मिरवणूक निघेल.
दरम्यान या मिरवणुकीनंतर सकाळी ११.०० वाजता नरवीर चिमाजी अप्पा स्मारक पूजन होणार असून त्यावेळी त्यांच्या प्रतिमेला व बुद्ध प्रतिमेसह पुष्पहार अर्पण कार्यक्रम संपन्न होईल.
तरी वसईकर नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेच्या क्रिडा व सांस्कृतिक विभाग प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

