दीपक मोहिते,
भारताला नडला,त्याला लष्कराने फोडला,
अखेर पाकने भारतासमोर गुडघे टेकले…
भारतीय सैन्याने अवघ्या सहा दिवसात पाकिस्तान्याना गुडघे टेकायला लावले.पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाझ शरीफ यांचे मोठे बंधू व माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रातोरात दोन्ही देशा दरम्यान शस्त्रसंधी घडवून आणली.त्यामुळे पाकिस्तानची अब्रू राखली गेली.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या शस्त्र संधीसाठी साकडे घालण्यात आले.त्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्र सचिव रोबियो यांनी वेगाने हालचाली केल्या व या शस्त्रसंधीला मूर्तस्वरूप दिले.

पहलगाम येथे दहशतवाद्यांनी २२ पर्यटकांची निर्घृण हत्या केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडक कारवाई करण्याचे संकेत दिले व भारतीय वायू दलाने अवघ्या २५ मिनिटात पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवाद्यांचे ९ तळ उध्वस्त केले.यावेळी करण्यात आलेल्या २४ बॉम्बहल्ल्यात सुमारे १०० हुन अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला.यामध्ये कुप्रसिद्ध दहशतवादी मसूद अजहर याच्या कुटुंबातील चौदा जणांचा समावेश होता.या हल्ल्यानंतर दोन्ही देशात युद्धाला तोंड फुटले.भारतीय सैन्याने कराची,लाहोर,रावळपिंडी,बहावलपुर ही चार शहरे अक्षरशः भाजून काढली.दरम्यान पाक सैन्यानेही अमृतसर,जम्मू,काश्मीर,
जालंदर,जसलमेर या भागात तुफान गोळीबार केला,त्यास भारतीय सैन्याने सडेतोड उत्तर दिले.दरम्यान भारतीय वायुदलाने पाकचे कराची बंदर व अनेक विमानतळांची धावपट्या उध्वस्त केल्या.त्यांनी केलेले हवाई हल्ले आपण यशस्वीपणे परतवून लावले.परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पाकिस्तान घाबरला व काल त्याने भारतीय अधिकाऱ्यांना फोन करून शस्त्रसंधी करण्याचा प्रस्ताव ठेवला.तत्पूर्वी त्यांनी अमेरिकेकडे युद्ध थांबवण्याबाबत याचना केली होती.ती मान्य करून डोनाल्ड ट्रम्प यांनी परराष्ट्र सचिव रोबियो यांना पाचारण केले व युद्धविराम उभय देशांनी मान्य केले.पाच दिवसाच्या लढाईत पाकिस्तानचे मात्र अतोनात नुकसान झाले आहे.

