दीपक मोहिते,
नेत्रदिपक कामगिरी,
दि ठाणे जिल्हा मध्य.सह. बँकेला २१८ कोटी रु.चा नफा,
सहकार क्षेत्रात अग्रेसर बँक आणि शेतकऱ्यांची जिव्हाळ्याची बँक म्हणून प्रसिद्ध असलेली ठाणे आणि पालघरवासियांची बँक दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मागील आर्थिक वर्षात २१८ कोटी ९७ लाख रु.चा नफा चालू आर्थिक वर्षात मिळवला आहे.राज्यातील अन्य जिल्हा बँकेच्या तुलनेने दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.ठाणे नेहमीच अग्रेसर राहिली आहे.बँकेने वर्षअखेर १ हजार ५९३ कोटी २५ लाख रु.चा निधी उभारला आहे.

सद्यस्थितीत बँकेकडे ९ हजार ६३१ कोटी ४७ लाख रु.च्या ठेवी आहेत.यात बँकेने गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ५५९ कोटी ७३ लाख रु.ची वाढ झाली आहे.बँकेने ४ हजार १९० कोटी रु.चे कर्ज वितरीत केले असून त्यामध्ये १०६ कोटी ३० लाख रु.ची वाढ झाली आहे.चालू आर्थिक वर्षात बँकेच्या एकूण व्यवसायात ६६६ कोटी ४ लाख रु.ची वाढ होऊन एकूण व्यवसाय १३ हजार ८२२.२७ कोटी रु.इतका झाला आहे.
डिजीटल बँकिंग क्षेत्राकडे बँकेने आपले लक्ष केंद्रित केले आहे,अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत पठारे यांनी दिली .
त्याचप्रमाणे सद्या मोबाईल बँकिंग वापरकर्ते व डेबिट कार्डधारकांमध्येही सातत्याने वाढ होत आहे.बँक जास्तीत जास्त खातेदारांना डिजीटल बँकिंगची सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करत आहे.अशी माहिती बँकेचे चेअरमन राजेंद्र पाटील यांनी दिली.ते पुढे म्हणाले कि,बँकेचा मजबूत आर्थिक पाया,वाढती डिजीटल व्यवस्था,संचालक व कर्मचारी वर्ग यांचा बँकेच्या यशस्वी वाटचालीत सिंहाचा वाटा आहे.

