दीपक मोहिते,
” फ्रँटलाइन,”
पाकिस्तानने वेळीच शहाणे व्हावे,अन्यथा तीन तुकडे होण्याची शक्यता,
भारत-पाकिस्तान दरम्यान सुरू झालेल्या युद्धाला पाच दिवस पूर्ण झाले असून युद्धाची व्याप्ती सतत वाढत आहे.हे युद्ध लवकर संपण्याची शक्यता फार कमी आहे.त्यामुळे दोन्ही देशांची आर्थिक स्थिती डबघाईला येण्याची शक्यता आहे.या युद्धाचा सर्वाधिक फटका पाकिस्तानला बसणार आहे.गेल्या काही वर्षात या देशाची आर्थिक घडी पार विस्कळीत झाली आहे.औद्योगिक उत्पादन,व्यापार,जीडीपी,कृषी व रोजगार या क्षेत्रात पाकिस्तान जगाच्या क्रमवारीत १०९ क्रमांकावर घसरला आहे.वाढती महागाई व बेरोजगारी,यामुळे जनता अधूनमधून रस्त्यावर उतरून आंदोलन करत असते.

देशाचे चारही प्रांत सिंध,पंजाब,पख्तुनख्वा व बलुचिस्तान,अशांत बनले आहेत.बलुचिस्तान व पख्तुनख्वा,हे दोन्ही प्रांत फुटून निघण्याच्या तयारीत आहेत.अशा स्थितीत हे युद्ध त्यांच्या विनाशाला आमंत्रण देणारे आहे.त्यांनी वेळीच शहाणपण दाखवले नाहीतर त्यांच्या देशाचे तीन तुकडे होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे भारताने मात्र आज ना उद्या आपले पाकिस्तानशी युद्ध होणार,हे गृहीत धरून गेल्या दहा वर्षांपासून जोरदार तयारी चालवली होती.दहशतवादाला खतपाणी घालण्याचे पाकिस्तानच्या आयएसआय गुप्तचर संघटनेचे कृत्ये लक्षात घेऊन आपल्या सरकारने आपली संरक्षण अधिकाधिक प्रभावी करण्यावर भर दिला होता.त्यासाठी प्रत्येक अर्थसंकल्पात संरक्षण सिद्धतेसाठी भरीव आर्थिक तरतूदी केल्या.हे करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुत्सद्देगिरी दाखवत बड्या राष्ट्रांशी आपले संबंध अधिक दृढ केले.तसेच ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज,( आयओ
सी ) या मुस्लिम देशाच्या संघटनेशी चांगले संबंध राखले.त्यामुळे या संघटनेने युद्धात पाकिस्तानला केवळ तोंडदेखला पाठिंबा दिला.तुर्कस्तान,चीन,मलेशिया व अझरबैझान,या चार देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला.तर अमेरिका,रशिया,जपान,
फ्रांस,ब्रिटन,ऑस्ट्रेलिया,
इस्त्रायल व इटली ही आठ राष्ट्रे भारताच्या पाठीशी उभी राहिली.यापैकी अनेक राष्ट्रांनी भारताला आधुनिक शस्त्रास्त्रे व विमाने दिली.तुर्कस्तानने पाकला केवळ ड्रोनची मदत केली.आजपर्यंत पाकिस्तानने आपल्यासोबत चार युद्धे केली,या चारही युद्धात त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.समोरासमोर झालेल्या युद्धात आपण भारतासमोर टिकू शकत नाही,हे लक्षात घेऊन पाकिस्तानच्या लष्कराने गेल्या काही वर्षांपासून दहशतवाद्यांना हाताशी धरून आपल्याशी प्रॉक्सी युद्ध छेडण्यास सुरुवात केली.पण आपल्या लष्कराने वेळोवेळी दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले.पंधरा दिवसापूर्वी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी २६ निष्पाप पर्यटकांची हत्या केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्याचा निर्णय घेतला व युद्धास तोंड फुटले.आज पाकिस्तानात अराजकासारखी स्थिती निर्माण झाली आहे.बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने उचल खाल्ली असून पाकिस्तानच्या एक तृतीयांश भूभागावर कब्जा मिळवला आहे.अफगाणिस्तानला लागून असलेल्या पख्तुनख्वा या प्रांतातही लोक उठाव करण्याच्या तयारीत आहेत.या दोन्ही प्रांतातील जनतेने
भारताकडे आधुनिक शस्त्रास्त्रे व विमाने देण्याची मागणी केली आहे.ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन पाकिस्तानने शहाणपण दाखवले नाहीतर पाकिस्तानचे तीन तुकडे होण्याची शक्यता आहे.

