दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
नाल्यातील कचरा नाल्याच्या बाजूला टाकण्यात येतो,या कृष्णकृत्यात फार मोठे अर्थकारण,
दरवर्षी वसई विरार शहर महानगरपालिकेचे आरोग्य विभाग १०० % नालेसफाई केल्याचा दावा करत असते.पण त्यांच्या या दाव्यात बिलकुल तथ्य नसते.या महानगरपालिकेची नालेसफाई ही चक्क करदात्यांच्या डोळ्यात धूळफेक करणारी असते.ठेकेदार,मनपा अधिकारी व लोकप्रतिनिधी या तिघांचे खिसे भरण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असतो,असा आरोप नागरिक करत असतात.

वसई विरार महानगरपालिका हद्दीत पावसाळी पाणी वाहून नेणारे असंख्य नाले आहेत.परंतु गेल्या काही वर्षात या नाल्याच्या परिसरात अनेक अनधिकृत बांधकामे झाल्यामुळे हे सर्व नाले अरुंद झाले आहेत.त्यामुळे दरवर्षी अतिवृष्टी झाली की हे सर्व नाले तुडुंब भरतात व पावसाळी पाणी शहरात साचून राहते.या नैसर्गिक आपत्तीमुळे चार शहरातील दैनंदिन व्यवहार तीन ते चार दिवस ठप्प होतात.या नाल्याची सफाई व गाळ काढणे,या कामावर महानगरपालिका दरवर्षी कोट्यवधी रु.खर्च करत असते.पण दरवर्षी येणारी ही आपत्ती रोखण्यात आजवर मनपा प्रशासनाला कधीही यश मिळू शकले नाही.कारण ही नालेसफाई केवळ कामचलाऊ व दिखाऊ स्वरूपाची असते.यंदाही करदात्यांना पुरपरिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे.कारण अद्याप नालेसफाईच्या कामाना वेग आलेला नाही.नालेसफाई केल्यानंतर नाल्यातील गाळ नाल्याच्या बाजूच्या भागात टाकला जातो.कालांतराने तो पुन्हा नाल्यात जातो व ” ये रे माझ्या मागल्या,” अशी स्थिती निर्माण होते.ठेकेदार व मनपा अधिकारी हे संगनमताने ही कृष्णकृत्ये करत असतात.

