- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर : खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
- ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
- भारतीय संविधानाचे देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान,
- मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
- प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक….
- अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
- ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार, कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता,
- कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, काँग्रेसचे विजय पाटील यांना वसईतून उमेदवारी मिळण्याची शक्यता, १३३,वसई विधानसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विजय पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी दिल्लीत जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत,त्यांच्या उमेदवारीसाठी एका माजी मुख्यमंत्र्यांनी दिल्ली दरबारी शिफारस केली आहे.या माजी मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला गांधी कुटुंबात वजन असल्यामुळे विजय पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता आहे.विजय पाटील यांनी २०१९ साली निवडणूक लढवली होती. त्यावेळी झालेल्या सरळ लढतीत त्यांचा पराभव झाला होता,पण समोर आ.हितेंद्र ठाकुर यांच्यासारखा दिग्गज उमेदवार असताना त्यांनी ७६ हजार ९५५ मताचा पल्ला गाठला होता.तत्पूर्वी २०१४ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या मायकल फुर्टडो याना केवळ १६ हजार ४६७ मते पडली…
दीपक मोहिते, सरकार निवडणुकांना घाबरतय, महाराष्ट्र शासनाकडून जारी झालेल्या आदेशानुसार उद्या होणारी मुंबई विद्यापीठाची निवडणूक शासनाकडून पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात आल्याचे परिपत्रक मुंबई विद्यापीठाने जारी केले आहे.त्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या निवडणुकीत पराभव झाल्यास त्याचा परिणाम आगामी होणाऱ्या निवडणुकांमध्ये होईल,अशा भितीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या निवडणुका पुढे ढकलल्या असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेची ( सिनेट ) निवडणूक गेल्या अडीच वर्षापासून रखडल्या आहेत.या काळात दोन वेळा या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. त्यानंतर आता विद्यापीठाने २२ सप्टें.ला ही निवडणूक घ्यायचं ठरवलं होते.पण ही निवडणूक पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत.परिपत्रकात…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाजपची पालघर मतदारसंघावर कावळ्याची नजर, राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहेत.पालघर जिल्हा त्याला अपवाद नाही.कारण जिल्हा,तालुका व स्थानिक पातळीवर पदाधिकारी,कार्यकर्ते व बुथ प्रतिनिधींच्या बैठकांना वेग आला आहे.भाजपने आपल्या घटक पक्षातील ( शिंदे गट ) काही पदाधिकाऱ्यांची समित्यांवर सदस्य म्हणून नियुक्त्या करून तिरकी चाल खेळण्यास सुरुवात केली आहे.विधानसभा निवडणुकीसाठी ज्या इच्छुक उमेदवारांनी आपल्या गुडघ्याला बाशिंग बांधले होते,अशांची समित्यांवर सदस्य म्हणून नियुक्त्या करून त्यांचा पत्ता कट केला आहे.पालघर विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या वैदेही वाढाण यांची अनु.जाती-जमाती समितीवर सदस्य म्हणून नियुक्त करणे,हा त्याचाच एक भाग आहे.या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी त्या इच्छुक होत्या,पण त्यांचे स्वप्न भाजपच्या अशा खेळीमुळे…
दीपक मोहिते, ” राजकीय घडामोडी,” तिसरी आघाडी प्रयोग यशस्वी होणार नाही, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जागावाटपावरून महायुती व महाविकास आघाडी मध्ये रणकंदन सुरू झाले आहे.या दोघांकडून कितीही दावे करण्यात येत असले तरी ५० ते ६० जागांवर हमरी-तुमरी सुरू झाली आहे.अशी स्थिती असताना आता तिसरी आघाडी या कुरुक्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहे.या आघाडीचे नेतृत्व तीन असंतुष्ट आत्मे करत आहेत.शेतकरी नेते राजू शेट्टी,दिव्यांगाचे नेते बचू कडू व मराठा समाजाचे नेते संभाजी राजे,यांनी एकत्र येऊन ही आघाडी स्थापन केली आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीने या तिघांना फारसे महत्व न दिल्यामुळे त्यांनी आता तिसरी आघाडीची निर्मिती केली आहे.हे तिघेही विशिष्ट क्षेत्रापुरते मर्यादित असल्यामुळे…
दीपक मोहिते, ” वास्तव,” स्थानिक भूमिपुत्रांचा मीठ व्यवसाय भूतकाळात जमा, एकेकाळी जगभरातील २० देशांना वार्षिक ७ मिलियन टन मीठ निर्यात करणारे आपल्या देशातील मीठ उत्पादक व्यवसायिक व कामगार सध्या उपेक्षित जीवन जगत आहेत.गेल्या २० वर्षात या व्यवसायावर अनेक संकटे कोसळली व हा व्यवसाय उतरणीला लागला.त्यामागे निसर्ग व मानवनिर्मित कारणे आहेत.या व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात स्थानिक भूमिपुत्र रोजगार मिळवत होते.अनेक कुटुंबाचा चरितार्थ चालत होता.पण कालांतराने सरकारने बहूराष्ट्रीय कंपन्यांना परवानग्या देण्याचा सपाटा सुरू केला व भूमिपुत्र या व्यवसायातून बाहेर फेकला गेला.तर या व्यवसायात रोजगार मिळवणारे मजूर पार देशोधडीला लागले. मीठ व्यवसाय हा प्रामुख्याने समुद्रकिनारी असलेल्या गावातील खारटन जमिनीवर केला जातो.भरतीच्या वेळी नजीकच्या खाडीत…
दीपक मोहिते, ” पंचनामा, अज पवार गटाला शरद पवार धक्का दिला “झटका,” ओबीसी नेता गळाला, अजित पवार गटाच्या ओबीसी सेलचे प्रदेश समन्वयक व प्रदेश सरचिटणीस ईश्वर बाळबुद्धे यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केला. त्यांचा हा प्रवेश अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. ओबीसी भगवान भगवान छगन भगवान बुद्धजबल पक्ष दोन दिवसापूर्वी भेटलेले बघितले त्यांचा निर्णय कानाना बीसी महानायक यांनी नियुक्त केला आहे. महायुतीच्या नगरसेवकांचा प्रचार करण्यात आला होता. त्यांच्या नेतृत्वाखालील गोल्फ येथे सेलचे भव्य प्रशिक्षण शिबीर पार पाडण्यात आले होते. ओबीसी महामंडळाचे अध्यक्ष तयार करण्यात आले होते, मात्र नियुक्तीचा आदेश निघाला होता. नाराज होते. नुकत्याच महामंडळावर नियुक्त्या करताना…
दीपक मोहिते, रात्र वैऱ्याची आहे… स्थानिक भूमीपुत्राच्या जमिनी लुटण्यासाठी धनदांडगे सरसावले, डहाणू-नाशिक रेल्वे,हा महत्वाकांक्षी प्रकल्प आता मार्गी लागला आहे.हा प्रकल्प गेली ४० वर्षे कसा रखडला ? त्याला राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधी यांचा नाकर्तेपणा कसा जबाबदार आहे,व आता प्रकल्प मार्गी लागत असल्याचे पाहून या भागातील जमिनी खरेदी करण्यासाठी मड्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे नतद्रष्ट लोक कसे सरसावले आहेत,यावर प्रकाशझोत टाकणारा व राज्यकर्त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन टाकणारा लेख लवकरच आपल्या news27.in या वेब पोर्टलवर प्रकाशित करत आहे.वाढवण बंदर होणार असल्याची खात्री पटल्यानंतर अनेक धनदांडग्यांनी वरोर व वाढवण गावातील जमिनी मातीमोल भावाने गिळंकृत केल्या.त्याच धनदांडग्यांनी आपला मोर्चा आता डहाणू -नाशिक रेल्वे प्रकल्प परिसरातील…
दीपक मोहिते, फ्रंटलाईन, ” एक नेशन,एक इलेक्शन,” ; पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणे कठीणच, ” एक नेशन,एक इलेक्शन,” हे जे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे,ते प्रत्यक्षात उतरणे,अत्यंत जिकिरीचे आहे.मोदी यांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे.अनेक घटनातज्ञ व नामवंत विधीतज्ञानी या संकल्पनेच्या अमलबजावणीमध्ये अनेक अडथळे असून ते अडथळे सहजासहजी दूर करणे,सरकारला शक्य होणार नाही,अशा प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. माजी राष्ट्पती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या उच्चस्तरीय समितीने आपल्या अठराशे पानी अहवालामध्ये तीन महत्वाच्या शिफारशी केल्या आहेत.त्या शिफारशी मंत्रिमंडळाने जशाच्या तशा स्विकारल्या आहेत.मात्र त्या स्विकारताना मंत्रिमंडळाने या शिफारशींची अमलबजावणी व त्यामध्ये असलेले अडथळे,याविषयी विचार केला नसल्याचे दिसून…
दीपक मोहिते, विरार-चिखलडोंगरे येथे सबस्टेशनचे भुमीपूजन, मंत्रालयापासून ते जिल्हाधिकारी आणि ही सब स्टेशनची जागा मिळवण्यासाठी आ.हितेंद्र ठाकूर व आ.क्षितीज ठाकूर यांचे लोकप्रतिनिधी म्हणून महत्त्वाचे योगदान आहे. त्यांच्या प्रबळ पाठपुरावामुळेच हे सबस्टेशन साधारणपणे येत्या २ वर्षात पूर्ण करण्यात येईल,असे आश्वासन महापारेषणचे अधीक्षक अभियंता मोहन ननावरे यांनी कार्यक्रम प्रसंगी चिखल डोंगरे येथे झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमाला वसईचे आ. हितेंद्र ठाकूर,नालासोपाऱ्याचे आ. क्षितीज ठाकूर,माजी महापौर नारायण मानकर,माजी स्थायी समिती सभापती जितुभाई शहा,आजीव पाटील,प्रशांत राऊत,माजी नगराध्यक्षा कांता पाटील,माजी नगरसेवक रंजन पाटील,वामन पाटील,माजी सरपंच रामचंद्र मेहेर,गोवालीज औद्योगिक चे अशोक ग्रोव्हर,अशोक कुलास,किशोर शेट्टी ,महावितरण कंपनी चे मुख्य अभियंता महेश भागवत,अधीक्षक अभियंता मोहन ननावरे,कार्यकारी अभियंता योगेश पोलपांडे…
पालघर, फ्रंटलाईन, एक देश,एक निवडणूक ; शिफारशींना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी, ” एक देश,एक निवडणूक,” या प्रणालीला नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता त्यावर दोन्ही सभागृहात मंजुरी मिळावी,यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.पण त्यांच्या या प्रयत्नांना प्रादेशिक पक्षाची साथ मिळेल,अशी शक्यता नाही.कारण ही प्रणाली प्रादेशिक पक्षाना मारक ठरणारी आहे,असे त्यांचे म्हणणे आहे.त्यामुळे इंडिया गटानेही यावर विचार करण्यासाठी आपल्या घटक पक्षाची बैठक बोलावली आहे. केंद्र सरकारने १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर काल झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले.या बैठकीत ” एक देश,एक निवडणूक,” या महत्वाच्या विषयावर स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी एकमताने स्विकारण्यात आल्या आहेत. निवडणुकीसाठी होणारा प्रचंड खर्च,वेळेचा…
