मनोज कामडी,
जागतिक एड्स दिनानिमित्त पालघर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन,
जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, ग्रामीण रुग्णालय पालघर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.
कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुण्यांमध्ये पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके, दुसऱ्या सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती एस. आर. बांदल,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रामदास मराड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत लोहारे व डॉ.राजगुरू (मनोर), वाय.आर.जी.केअरच्या जानवी मॅडम,जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाचे रतन गाढवे,तसेच एम अँड ई रवि विशे आदींचा समावेश होता.
कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरीने झाली. जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते या फेरीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. दाखवण्यात आला.प्रभात फेरी दरम्यान एक चित्ररथ फिरवण्यात आला.नर्सिंग कॉलेज व दांडेकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याने जनजागृतीला चालना दिली.
२०२३-२४ मध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र,शहरी आरोग्य केंद्र आणि आयसीटीसी केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.तसेच कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या व्यक्तींनाही सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना एचआयव्ही/एड्स विषयी माहिती व जागरूकतेचे महत्व पटवून दिले.जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी एमएसएसीएस,आरोग्य यंत्रणा आणि सामाजिक संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे एचआयव्ही/एड्सचा प्रसार कमी होत असल्याचे सांगितले आणि भविष्यात या आजाराचे संपूर्ण निर्मूलन होईल,असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमानंतर मासिक आढावा सभेचे आयोजन करण्यात आले होते.या सभेत न्यू ऑन फाउंडेशनतर्फे १० सीएलएचआयव्ही मुलांना वाटप करण्यात आले.
या उपक्रमानेएड्स विषयी समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला असून आरोग्य यंत्रणेकडून होत असलेल्या या प्रयत्नांचे समाजातर्फे कौतुक करण्यात येत आहे.

