दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
आम्ही झालो बटिक,
महानगरपालिकेचे पक्षपाती धोरण ; मॅरेथॉनच्या रंगात अचानक बदल,
वसई-विरार महापालिकेच्या कार्यक्रमांत राजकीय अजेंडा नसावा,अशी अपेक्षा नवनिर्वाचित भाजप आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी व्यक्त केली होती.आम्ही आमचा रंग असावा,असा अजिबात आग्रह धरणार नाही.मात्र अन्य राजकीय पक्षांचा रंगही दिसू नये,असं आ.स्नेहा दुबे-पंडित यांनी काल आपल्या भाषणात म्हटलं होतं.पण नेमके घडलं उलटे,मॅरेथॉनचे बूथ,स्टॉल्स व झाडांना भगवा रंग लावण्यात आला.पूर्वी महानगरपालिका प्रशासन हिरवा व पिवळा रंग लावत असे,पण आयुक्तांना या रंगाची उपरती झाली व भगव्या रंगाने त्याची जागा घेतली.
महापालिकेचे उपक्रम राजकीय पक्ष निरपेक्ष असावेत,अशी त्यांची अपेक्षा होती.प्रत्यक्षात मात्र भाजपने आपले “रंग,” सत्तेत आल्या आल्या आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली.उद्या होणाऱ्या ” वसई-विरार मॅरॅथॉन स्पर्धे,” निमित्ताने शहरभरात उभारण्यात आलेल्या स्टॉल्स आणि झाडांच्या बुंध्यांना भगवा रंग मारण्यात आला आहे.
वसई-विरार विधानसभा निवडणुकीत राजकीय सत्तापरिवर्तन घडल्यामुळे वसई-विरार मॅरॅथॉन स्पर्धा-२०२४ विशेष चर्चेचा विषय ठरला आहे.आतापर्यंत या स्पर्धेवर बहुजन विकास आघाडीचा प्रभाव होता.यंदा राजकीय सत्तापरिर्वतनानंतर मॅरॅथॉन स्पर्धेतील रंगांचं परिवर्तन होईल,असे येथील नागरिकांना वाटले नव्हते,पण नेमके तसेच घडले.प्रत्यक्षात मात्र वसई-विरार महापालिकेने शहरातील अनेक स्टॉल्स आणि झाडांच्या बुंध्यांना भगव्या रंगाने रंगवून आम्ही सत्ताधारी पक्षाचे बटिक झाल्याचे दाखवून दिले. वसई-विरार मॅरॅथॉन स्पर्धा ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आहे. या स्पर्धेत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत असंख्य स्पर्धक सहभागी होत असतात.या स्पर्धकांच्या सेवा आणि मदतीसाठी तितक्याच मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचं बळ लागत असतं.वसई भाजपकडे इतक्या प्रमाणात कार्यकर्त्यांचं बळ नाही.त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी करणे,हे सर्वात मोठं आव्हान भाजपसमोर आहे. केवळ राजकीय असूया दाखवून नव्हे,तर कर्तृत्व दाखवून भाजपने स्वत:ला सिद्ध करावे, असा सल्ला या रंगपरिवर्तनाच्या निमित्ताने शहरवासीयांनी भाजपला दिला आहे.

