वसंत भोईर,वाडा,
वाडा तालुक्यातील नरेगाच्या कामांची पाहणी,
पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.पालघर,रविंद्र शिंदे यांनी आज वाडा तालुक्याला भेट देऊन नरेगाच्या कामांची पाहणी केली.यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रा.प. ) चंद्रशेखर जगताप,उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( नरेगा ) अतुल पारसकर,गटविकास अधिकारी पं.स.वाडा,इ.अधिकारी उपस्थित होते.ही पाहणी झाल्यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शक सूचना केल्या.
यावेळी त्यांनी ग्रामपंचायत मांडवा अंतर्गत सुरु असलेल्या डीएस-गवळी पाडा,बाळा कडु यांच्या शेताजवळील बंधाऱ्यातील गाळ काढणे,या कामाला भेट दिली.सदर कामावर १४८ मजुर हजर होते.या भेटी दरम्यान रविंद्र शिंदे यांनी मजुरांची विचारपुस केली आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.तसेच पं.स.वाडा,ग्रामपंचायत परळी अंतर्गत सुरु असलेल्या एनएस-कदल नाला सरळीकरण करणे,या कामाला भेट दिली.या कामावर असलेल्या ११८ मजुरांसोबत चर्चा करून मजुरांची विचारपुस केली.यावेळी अनेक मजुरांनी सांगितलेल्या अडचणी व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी उपस्थित अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मार्गदर्शक सूचना केल्या.
यावेळी पं.स.वाडा, उपअभियंता बांधकाम,विस्तार अधिकारी पं.स.वाडा,सहायक कार्यक्रम अधिकारी ( नरेगा ), तांत्रिक अधिकारी ( नरेगा ) उपस्थित होते.

