नदीम शेख,पालघर,
कौतुकास्पद उपक्रम,
विद्यार्थी-विद्यार्थिनीसाठी आधुनिक स्वच्छतागृहांची निर्मिती करण्यासाठी सहकार्य.
राज्यातील प्रत्येक व्यक्तीला राहण्यासाठी एक चांगलं घर असण्याची आवश्यकता आहे,असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गृहनिर्माण क्षेत्रात काम करणारी हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया,ही एक आघाडीची ना-नफा तत्वावरची संस्था आहे.
सॅमसंग सी.अँड टी.या संस्थेसोबत भागीदारी करत हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटीने महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये सावरे,कंचाड आणि हमरापूर या गावांत राहणाऱ्या वारली आदिवासी कुटुंबांचे जीवन समृद्ध करण्यासाठी १५ घरे आणि जिल्हा परिषदेच्या ३ शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहे बांधण्याचा संकल्प केला आहे.पायाभूत सोयी-सुविधांपासून वंचित असलेल्या या दुर्गम प्रदेशात राहणाऱ्या आदिवासी समुदायासाठी आवश्यक सुविधांची उभारणी,या प्रकल्पाद्वारे केली जाणार आहे.
या महत्त्वपूर्ण उपक्रमावर बोलताना हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाचे राष्ट्रीय संचालक ( राष्ट्रीय संचालक ), आनंद कुमार बोलिमेरा आपल्या भाषणात म्हणाले, “आम्ही बांधत असलेली घरे प्रत्येक कुटुंबाला वरदान असून समाजातील वंचित घटक आपले उज्ज्वल भविष्य घडवू शकतात.सॅमसंग सी.अँड टी. कंपनीने दिलेल्या सहकार्यासाठी आम्ही कृतज्ञ आहोत.ही भागीदारी प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित आणि योग्य निवारा मिळावा,या आमच्या उद्देशाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.घरांच्या माध्यमातून लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”
हा उपक्रम सावरे गावातील आदिवासी समुदायाला सुरक्षित आणि चांगल्या निवाऱ्याची सुविधा उपलब्ध करून देत त्यांच्या राहणीमानात सुधारणा घडवून आणेल.या प्रकल्पाचा एक भाग म्हणून,शालेय स्वच्छतागृहांची उभारणी देखील करण्यात येत आहे.जी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या दोघांसाठी फायदेशीर ठरेल. याशिवाय पाणी,स्वच्छता आणि आरोग्य ( WASH ) या बाबींवर प्रशिक्षण हा उपक्रमाचा अविभाज्य भाग आहे.
हा प्रकल्प भारतातील शाश्वत ग्रामीण विकासासाठी एक आदर्श उदाहरण ठरेल. धोरणात्मक भागीदारीतून गृहनिर्माण आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत गरजा पूर्ण करून हा उपक्रम पालघरच्या सावरे, कंचाड आणि हमरापूर गावांतील लोकांचे जीवन बदलण्यात मदत करेलच,तसेच देशभरातील ग्रामीण समुदायांच्या सक्षमीकरणासाठी एक आदर्श संरचना तयार करण्याचे कार्य देखील करेल.यावेळी विविध क्षेत्रातील विविध मान्यवर कार्यक्रमात सहभागी झाले होते.८५०

