Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, कुणबी सेना आणि आगरी कोळी सेनेचा बहुजन विकास आघाडीला पाठिंबा, पालघर जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुका निवडणुकीच्या प्रचारातबहुजन विकास आघडीने प्रचंड आघाडी घेतली आहे.त्यामुळे विरोधी पक्षांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून पालघर जिल्ह्यात आश्चर्यकारक घटना घडत आहेत.कुणबी व आगरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आ.हितेंद्र ठाकूर यांची विरार येथे भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला आहे.काही मातब्बर उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी अनेक संघटना पुढे येत आहेत.त्यामुळे विरोधी पक्षाचे धाबे दणाणले आहे.या घडामोडीमुळे भयभीत झालेल्या एका राष्ट्रीय पक्षाने जागावाटपाच्या धर्तीवर आता पैसेवाटप करण्याचा उद्योग सुरू केला आहे.जिल्ह्यातील बहुजन विकास आघाडी या प्रमुख पक्षास ठाणे आणि पालघर…

Read More

दीपक मोहिते, स्थिर पथकाकडून वाडा येथे ३ कोटी ७० लाखाची रोख रक्कम जप्त, वाडा विक्रमगड मार्गावरील पाली येथे काल सायंकाळी आलोंडे या गावाकडून वाडा येथे येणा-या एम एच ४३ सीई ४०५१ या क्रमांकाच्या पिकअपला स्थिर पथकाकडून रोखण्यात आले व वाहनांची तपासणी केली असता सदर पिकअपमध्ये ३ कोटी ७० लाख ५० हजार रू.ची रोख रक्कम आढळून आली.पथकाने ती जप्त केली आहे.या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.ही रोख रक्कम नक्की कुणाची आहे,याविषयी तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत आहेत. स्थिर पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभेची निवडणूक सुरू असून निवडणूक आयोगाकडून विविध नाक्यांवर तपासणी पथके तैनात करण्यात आली आहेत.विक्रमगड-वाडा मार्गावरील पाली फाट्याजवळही असेच पथक तैनात करण्यात…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” पालघर विधानसभा ; महायुतीचे राजेंद्र गावित सध्या अडचणीत आले आहेत, पालघर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांना मुरबे गावात प्रचार करताना मच्छीमार समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले.या गावात स्थानिक गावकऱ्यांनी त्यांचा काळे झेंडे दाखवून निषेध केला.राजेंद्र गावित यांचे ज्या जिंदाल उद्योग समूहाशी घनिष्ट संबंध आहेत,त्या समूहाला या गावात बंदर उभारणीसाठी गावित यांनी मदत केली,असा आरोप मच्छीमार समाजाकडून करण्यात येत आहेत. वाढवण बंदर प्रकल्प उभारणी बाबतही याच गावित यांची भूमिका संशयास्पद होती. त्यावेळी खासदार असलेल्या राजेंद्र गावित हे या बंदरासंदर्भात तोंडातून चकार शब्द काढत नसत.त्यामुळे त्यांच्यावर मांगेला व माच्छी समाजामध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे.ही नाराजी त्यांना…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक रणसंग्राम, वसई विधानसभा ; लोकनेते आ.हितेंद्र ठाकूर यंदा विक्रमी मते घेत विजयी होणार.. १३३ वसई विधानसभा मतदारसंघात या निवडणुकीत तिरंगी लढत होत आहे.विद्यमान आ.लोकनेते हितेंद्र ठाकूर,महाविकास आघाडीचे विजय पाटील व महायुतीतर्फे स्नेहा दुबे हे तिघे उमेदवार रिंगणात आहेत.गेली तीस वर्षे आ.हितेंद्र ठाकूर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.१९९० पासून थेट २०१९ दरम्यान झालेल्या सहा निवडणुकांमध्ये त्यांच्या समोर कोणाचाही टिकाव लागू शकला नाही.प्रत्येक निवडणुकीत विरोधक विकासकामांवर न बोलता वैयक्तिक टीका करण्यात धन्यता मानत आले.त्यामुळे आजवर झालेल्या सर्व निवडणुकीत वसईकर आ.हितेंद्र ठाकूर यांच्या पारड्यात भरभरून मते टाकत आले.सलग सहावेळा निवडणूक जिंकणे,हे वसईच्या मतदारांचे आ.ठाकूर यांच्यावर किती प्रेम आहे,हेच दाखवून देते.…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” मोठ्या रकमा पाठवणाऱ्या लोकांची नावे कळायला हवीत, गेल्या चार ते पाच दिवसात वसई विधानसभा मतदारसंघात सुमारे तीन ते चार कोटी रु.रोख रक्कम पकडण्यात आली.ही रक्कम कोणाची आहे,हे येथील मतदारांना कळले पाहिजे.कारण तो त्यांचा अधिकार आहे.गेल्या आठवडाभरात पालघर लोकसभा मतदारसंघात सुमारे सात ते आठ कोटी रु.जप्त करण्यात आले.या रकमा पाठवणारे कोण ? ते कोणत्या उमेदवारासाठी पाठवण्यात आले ? ते स्विकारणारे कोण ? या सर्व प्रश्नांची उत्तरे मतदारांना कळायला हवीत. केंद्रीय निवडणूक आयोग हा पारदर्शक व्यवहार करतो,असा गाजावाजा सतत होत असतो.त्यामुळे आयोगाने या सर्वांची नावे जाहीर करणे,आवश्यक ठरते.हे पैसे कोण पाठवते,हे न कळण्याइतके येथील मतदार दुधखुळे नाहीत.गेल्या लोकसभा…

Read More

दीपक मोहिते, कुणबी सेनेचा बहुजन विकास आघाडीला पाठिंबा, कुणबी सेनेने आज अचानक बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिल्यामुळे इतर पक्षाचे धाबे दणाणले आहे.आज कुणबी सेनेचे नेते विश्वनाथ पाटील यांनी बविआचे नेते व वसईचे आ.हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र दिले. यावेळी माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले, होते गेल्या सात वर्षांपासून घटक पक्ष म्हणून कुणबी सेना भाजपासोबत सोबत होती.मात्र त्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली.त्यामुळे नालासोपारा वसई आणि बोईसर या तिन्ही विधानसभा निवडणुकीत कुणबी सेना बहुजन विकास आघाडीला जाहीर पाठिंबा देत आहे. यापुढेही स्थानिकांच्या अस्तित्वासाठी एकत्रितपणे निवडणुका लढवण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे कुणबी सेनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांनी सांगितले.यापुढेही आम्ही बहुजन विकास…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक पर्व, राजेश पाटील यांच्या रॅलीला सर्वत्र उत्स्फूर्त पाठिंबा, बहुजन विकास आघाडीचे बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आ. राजेश पाटील यांच्या निवडणूक प्रचार दौ-याला आज सकाळी ९.०० वाजता कोळी पडघे येथून सुरुवात झाली.यावेळी काढण्यात आलेली भव्य प्रचार रॅली मान,बेटेगाव, वाळवे,महागाव,कुकडे,गारगाव – खानिवडे,शिगाव,हनुमान नगर,राणी शिगाव,गणेश नगर,काटकर पाडा अशा भेटी देत,बोईसर येथे पोहोचली.या रॅलीला गावागावातील नागरिकांकडून मोठ्याप्रमाणात समर्थन मिळाला.आ.राजेश पाटील यांनी पाच वर्षे जनतेत राहून केलेल्या कामांची पोचपावती स्वागताने आणि जल्लोषाने मिळत आहे.त्यामुळे कार्यकर्ते व नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सदैव कर्तव्यदक्ष तत्पर असलेल्या आ.राजेश पाटील यांना विक्रमी बहुमताने निवडून देणार अशी आश्वासने ठिकठिकाणी देण्यात येत होती. महिलांनी त्यांचे औक्षण करून शुभेच्छाही दिल्या.…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” छगन भुजबळ व अजित पवार,अडचणीत… राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपल्या मुलाखतीमध्ये आपण ईडीच्या त्रासामुळे भाजपसोबत गेल्याचे सांगितल्यामुळे राज्याचे राजकारण अक्षरशः ढवळून निघाले आहे.राजदीप सरदेसाई यांनी लिहिलेल्या पुस्तकात याविषयी सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे.त्यावर बोलताना भुजबळ यांनी मी असे बोललेलो नाही,असे माध्यमांना सांगत सुटले आहेत. छगन भुजबळ आता आपण अशी मुलाखत दिलीच नसल्याचा दावा करत आहेत.पण त्यांच्या या मुलाखतीमुळे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सध्या संकटात सापडल्याचे पाहायला मिळत आहे.संजय राऊत,सुप्रिया सुळे,नाना पटोले,यांनी अजित पवार गटावर टीकेची झोड उठवली आहे.त्यामुळे त्यांची व त्यांच्या सहकाऱ्यांचा याविषयी खुलासा करताना प्रचंड दमछाक होत आहे.संजय राऊत यांनी तर…

Read More

मुरबे गावात गावित याना स्थानिक भूमीपुत्रांनी काळे झेंडे दाखवले, जिंदाल जेटी,वाढवण बंदरास विरोध, पालघर, पालघर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांची प्रचार रॅली मुरबे गावात आली असता स्थानिक भूमीपुत्रांनी रद्द करा,रद्द करा,मुरबे बंदर रद्द करा अशा घोषणा दिल्या. यावेळी काळे झेंडे दाखवून रॅलीला गावात प्रचार करण्यास विरोध केला. त्यामुळे गावीतांना किनारपट्टीत प्रचार करणे,आता अडचणींचे ठरले आहे. सातपाटी, मुरबे, चिंचणी,वरोर, दांडी आणि वाढवण या भागांत स्थानिक मच्छीमार मतदारांची संख्या बहुसंख्य आहे.गेल्या अनेक निवडणूकीत पश्चिम किनारपट्टीवरील या भागांतील मते ही राजेंद्र गावित यांची वोट बँक समजली जात होती.मात्र सद्यस्थितीत वाढवण बंदर आणि मुरबे गावाच्या हद्दीत जेएसडब्लयू जिंदाल जेट्टीला मंजूरी देण्यात आल्याने…

Read More

दीपक मोहिते, मुरबे गावात गावित याना स्थानिक भूमीपुत्रांनी काळे झेंडे दाखवले, जिंदाल जेटी,वाढवण बंदरास विरोध, पालघर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांची प्रचार रॅली मुरबे गावात आली असता स्थानिक भूमीपुत्रांनी रद्द करा,रद्द करा,मुरबे बंदर रद्द करा अशा घोषणा दिल्या. यावेळी काळे झेंडे दाखवून रॅलीला गावात प्रचार करण्यास विरोध केला. त्यामुळे गावीतांना किनारपट्टीत प्रचार करणे,आता अडचणींचे ठरले आहे. सातपाटी, मुरबे, चिंचणी,वरोर, दांडी आणि वाढवण या भागांत स्थानिक मच्छीमार मतदारांची संख्या बहुसंख्य आहे.गेल्या अनेक निवडणूकीत पश्चिम किनारपट्टीवरील या भागांतील मते ही राजेंद्र गावित यांची वोट बँक समजली जात होती.मात्र सद्यस्थितीत वाढवण बंदर आणि मुरबे गावाच्या हद्दीत जेएसडब्लयू जिंदाल जेट्टीला मंजूरी देण्यात…

Read More