नदीम शेख,पालघर,
संविधान सन्मान समितीतर्फे संविधान प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न,
संविधान सन्मान समिती पालघर जिल्ह्याच्या वतीने काल चिराग विद्यालय भिमनगर बोईसर येथे संविधान प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.सदर शिबिरास प्राध्यापक सुनील देवरे यांनी मार्गदर्शन केले.त्यांचे संविधानावर प्रशिक्षणावर हे १ हजार ५४३ वे व्याख्यान होते.
सुरुवातीला संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून, त्यामधील स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय याचे स्पष्टीकरण करत त्यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली.संविधान काय आहे ते समजा व त्याचा समाजामध्ये प्रचार व प्रसार करा,असे आव्हान केले.संविधानातील कलम १ ते ३२ व ३४०,३४१,३४२ या महत्वपूर्ण कलमांचे तसेच जनगणना कशाप्रकारे केली जाते,याविषयी माहिती दिली.तसेच आपले अधिकार व कर्तव्य,याची जाणीव उपस्थित असलेल्या ३० संस्थांच्या पदाधिकारी व कार्यकर्ता यांना करून दिली. येणाऱ्या काळात लोकशाही टिकवायची असेल तर संविधान वाचवणे,हे आपले आद्यकर्तव्य आहे,तसेच संघटनात्मक काम करताना प्रत्येकाने आपली वेळ,बुद्धी व आर्थिक सहकार्य दिले तरच हे कार्य पुढे दीर्घकाळ टिकू शकेल.
पालघर जिल्ह्यातून आज सुरू केलेला उपक्रम पालघर जिल्हा पुरता मर्यादित न ठेवता येणाऱ्या काही दिवसांमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये संविधान सन्मान समिती स्थापन करून हे संविधानाचं लोण पूर्ण महाराष्ट्रभर व नंतर पूर्ण भारतभर पसरवण्याचे आवाहन केले व त्यासाठी संपूर्ण ताकतीने योगदान देण्यात असल्याचे सुनील देवरे यांनी जाहीर केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकेश भोईर यांनी तर आभार प्रदर्शन निलेश मोरे यांनी केले.

