वसंत भोईर,वाडा,
तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्ता,हाच खरा भाजपचा मुख्य कणा आहे
— खा.हेमंत सवरा
पक्षनिष्ठा राखून दिवस-रात्र पक्षवाढीसाठी मेहनत करणारा तळागाळातील सर्व सामान्य कार्यकर्ताच खरा पक्षाचा मुख्य कणा आहे.गाव -पाड्यातील प्रत्येक घरातील व्यक्तीला भाजपचे ध्येय -धोरण,विचार पटले आहेत.भाजप पक्षाच्या विचारधारेचा कार्यकर्ता घरा-घरात असावा.भाजप हा जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष आहे.असे उदगार पालघरचे खा.डाॅ.हेमंत सवरा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना काढले.ते वाडा येथे सदस्य नोंदणी अभियान बैठकीत बोलत होते.
भारतीय जनता पार्टी तालुका शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सदस्य नोंदणी अभियानाची बैठक आज जिल्हा मध्यवर्ती कार्यालय वाडा,येथे पार पडली.या बैठकीस तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रत्येक बुथवर किमान दोनशे सदस्य नोंदणी करण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी केला आहे.
या बैठकीस जेष्ठ नेते बाबाजी काठोळे,माजी जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील आदी मंचावरील प्रमुख मान्यवरांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष मंगेश पाटील यांनी केले.
या प्रसंगी राजेंद्र पाटील,उल्हास सोगळे, कुणाल साळवी,हर्षल खांबेकर,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष नितीन घरत, महीला आघाडी जिल्हा सरचिटणीस अर्चना भोईर, महीला आघाडी तालुकाध्यक्षा अंकिता दुबेले,तालुका सरचिटणीस दीक्षा पाटील,संचिता भगत, उपाध्यक्ष दिनेश पांडे,संतोष साठे,कांतीलाल गोरे आदी मान्यवरांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

