- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” पालघर जिल्हा,चौथी मुंबई : पालकमंत्र्यांचे स्वप्न,” मुंगेरीलालके हसीन सपने,” ठरता कामा नये, तिसऱ्या डहाणू फेस्टिवलच्या उदघाटनप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक यांनी पालघर जिल्हा,हा आगामी काळात चौथी मुंबई म्हणून नावारूपाला येणार असल्याची प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.त्यांच्या या वक्तव्याचे जिल्ह्यात सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या वेशीवर असलेल्या जिल्ह्याचा ग्रामीण आजही अंधारात चाचपडत आहे.जिल्ह्याच्या विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.या स्थितीला लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांची मानसिकता कारणीभूत आहे.पाणी,आरोग्य, शिक्षण,रोजगार,उद्योगवाढ,महिला व एकात्मिक बालविकास,कृषी, दळणवळण व पायाभूत सोयी-सुविधा इ.क्षेत्राचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत.२५ वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे एका कार्यक्रमांसाठी विरार येथे आले…
शुभम सावंत,विरार ९ फेब्रू.रोजी विरार येथे,विरार फन रन २०२५ चे आयोजन, यंग स्टार ट्रस्ट,अमेय क्लासिक क्लब व विराट फाऊंडेशन आयोजित विरार रन २०२५,९ फेब्रु.रोजी पार पडणार आहे. यात १८ वर्षांवरील सर्व वयोगटातील १० किमी दौड आयोजित करण्यात आली आहे. तसेच ६ ते १६ वयो गटातील मुलं व मुलींसाठी १.५ किमी दौड आयोजित करण्यात आली आहे. १.५ कि.मी.दौडमध्ये भाग घेणाऱ्या सर्वांसाठी प्रवेश मोफत आहे. तसेच या वेळी फन रन दरवर्षी प्रमाणे आयोजित करण्यात येते.तर विरार रन मध्ये महिलांसाठी विशेष ‘वॉकथॉन’ आयोजित करण्यात आली आहे. वॉकथॉन मध्ये कमीत कमी ५ जास्तीत जास्त १० महिलांचा एक संघ बनवणे आवश्यक आहे.प्रत्येक संघाला ५ सामाजिक…
जव्हार येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन : बेरोजगार तरुण. मोठ्या संख्येने सहभागी, जव्हार प्रतिनिधी- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार,जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पालघर आणि भगवान बिरसा मुंडा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जव्हार यांच्या संयुक्त विद्यमाने, जव्हार,मोखाडा,विक्रमगड आणि वाडा तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी,यादृष्टीने काल औद्योगिक प्रशिक्षण संस्था जव्हार येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन करिष्मा नायर (भा.प्र.से.) प्रकल्प अधिकारी तथा सहा. जिल्हाधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय जव्हार,यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाची प्रस्तावना श्याम अंबाळकर यांनी केली.सदर मेळाव्यासाठी लोखंडे इंडस्ट्रीज,गोविंदास एच आर सर्विसेस,एम.एस. आर.टी.सी.पालघर,ब्लू स्टार वाडा,ई.पी.एल.लिमिटेड , आस्था हॉस्पिटल,नवनीत एज्यु,आयशर मोटर्स नाशिक, अण्णासाहेब…
मनिष म्हात्रे,वसई, नालासोपारा शहराची स्वच्छतेकडून अस्वच्छतेकडे वाटचाल, २०१९ मध्ये स्वच्छ भारत अभियानात पहिल्या तीन राज्यात महाराष्ट्राचे नाव होते.तर महाराष्ट्रात पाचव्या क्रमांकावर वसई विरार महानगरपालिकेने बाजी मारली होती.मात्र सध्या या महानगरपालिकेची स्वच्छतेच्या बाबतीत स्वच्छ शहराकडुन अस्वच्छ शहराकडे वाटचाल सुरु आहे.पालिकेच्या स्वच्छता विभागाकडून दररोज कचरा उचलला जात नसल्यामुळे जागोजागी कच-याचे ढिग साचलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे नागरीकांना रस्त्यावरून येजा करणे जिकिरीचे झाले आहे. नालासोपारा पुर्व नगिनदासपाडा येथे पालिकेच्या माध्यमातून सुशोभीकरण केलेल्या चौकात गांधीजींच्या तीन प्रसिद्ध माकडांची शिल्पे बसवण्यात आली आहेत.स्वच्छता विभागाकडून परीसरात कचराकुंड्या ठेवलेल्या नसल्यामुळे येथे नागरीकांकडून प्लॅस्टीक,चप्पल,बाटल्या तसेच इतर टाकाऊ कचरा बिनधास्तपणे उघड्यावर टाकला जात आहॆ.त्यामुळे या चौकाची अक्षरशा दुर्दशा झाली…
दीपक मोहिते, ” अर्थकारण,” केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ ; सर्वसामान्यजनांना दिलासा देणारा असू शकतो, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन,या आज सलग आठव्यांदा देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडणार आहेत.आजवर एकाही अर्थमंत्र्याला शक्य झाले नाही,ते सीतारामन यांनी करून दाखवले आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ कसा असेल,यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोनच दिवसापूर्वी मध्यमवर्ग,महिला व गरीब या घटकांना दिलासा मिळेल,अशा आर्थिक सुधारण्याचे संकेत दिले आहेत.त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारकडून करसवलती व सामाजिक व कल्याणकारी योजनांचा वर्षाव होईल,अशी शक्यता आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी संसदेत केलेल्या अभिभाषणामध्ये प्रधानमंत्री आवास योजना आणखी ३ कोटी कुटुंबासाठी विस्तारीत करण्याचे जाहीर केले होते.त्यामुळे देशभरातील कोट्यवधी कुटुंबाना घरे मिळणे शक्य होणार आहे.तसेच या अर्थसंकल्पात…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” पालघर/ठाणे जिल्ह्यात पालकमंत्री गणेश नाईक चांगलेच सक्रिय, ठाणे व पालघर जिल्ह्याच्या राजकीय आघाडीवर गेल्या दोन दिवसांपासून वेगवान घडामोडी घडत असून आजच्या घडीला त्या सुप्तावस्थेत असल्या तरी येणाऱ्या काळात त्या उजेडात येण्याची शक्यता आहे.या सर्व घडामोडीत पालकमंत्री गणेश नाईक हे प्रमुख भूमिका निभावत आहेत.काल त्यांनी बहुजन विकास आघाडीच्या एका बड्या व नाराज नेत्याची भेट घेऊन अर्धा तास चर्चा केली.तसेच ईडीचे प्रकरणही सध्या मोठ्याप्रमाणात गाजत आहे.या प्रकरणामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.तर एकनाथ शिंदे यांचा गड असलेला ठाणे जिल्हा भेदण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.त्यामुळे एकनाथ शिंदे हे प्रचंड तणावाखाली आले आहेत. देवेंद्र फडणवीस,पक्षाचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व पालकमंत्री…
अनिल वैद्य,नाशिक, तृणधान्याचे महत्व लोकाभिमूख होण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार- कृषीमंत्री कोकाटे, नाशिक,तृणधान्यांमधील पोषणमुल्यांमुळे त्यांचे आहारातील आरोग्यविषयक महत्व अनन्यसाधारण आहे.हे लक्षात घेवून नागरिकांनी दैनंदिन आहारात तृणधान्यांचा समावेश वाढवणे आवश्यक आहे.तृणधान्याचे महत्व अधिक लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने तसेच जिल्हा व तालुकास्तरावर तृणधान्य उत्पादक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी विक्री व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील,असे प्रतिपादन कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी केले. कृषी पणन मंडळाचे विभागीय कार्यालय नाशिक यांच्यातर्फे उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालय गंगापूर रोड,नाशिक येथे आयोजित ” मिलेट महोत्सव-२०२5,” कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी,महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणेचे सरव्यवस्थापक विनायक कोकरे,कृषी पणन मंडळ विभागीय कार्यालय नाशिकचे उपसरव्यवस्थापक एस.वाय. पुरी,कृषी महाविद्यालयाचे…
अनिकेत मेहेर,डहाणू, अशोक धोडी यांची कार गुजरात राज्यातील भिलाड येथे दगडखाणीच्या तलावात सापडली, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे डहाणू तालुका संघटक हे गेल्या अकरा दिवसापासून बेपत्ता होते.पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर आज त्यांची कार गुजरातच्या भिलाड गावातील दगडखाणीच्या तलावात सापडली आहॆ.ती कार बाहेर काढण्याचे काम पोलिसाकडून सुरु आहे. ही कार बाहेर काढल्यानंतर अशोक धोडी यांचे नेमके काय झाले हे स्पष्ट होईल. गेल्या २० जाने.रोजी सांयकाळी अशोक धोडी यांचे अपहरण करण्यात आले होते.त्या दिवशी त्यांनी आपण डहाणू येथून घरी येत असल्याचे आपल्या पत्नीला कळवले होते.त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाला होता. त्यांच्या नातेवाईकांनी तक्रार केल्यानंतर पोलीसानी सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली.सीसीटीव्ही तपासल्यानंतर त्यांची गाडी गुजरातच्या…
मनिष धानू,डहाणू, डहाणू फेस्टिवलला ५ लाख नागरिक भेट देतील – पालकमंत्री नाईक, डहाणू महोत्सवाचे यंदाचे हे तिसरे वर्ष असून पहिल्या वर्षी दीड लाख नागरिकानी या फेस्टिवलला भेट दिली होती.दुसऱ्या वर्षी ही संख्या दुपट्टीने वाढली होती.यावर्षी पाच लाख नागरिक,या महोत्सवामध्ये सहभागी होतील,असा विश्वास वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी उदघाटन प्रसंगी व्यक्त केला. ते पुढे आपल्या भाषणात म्हणाले,डहाणू तालुका हा चिकूसाठी जगप्रसिद्ध आहे.तसेच या डहाणू महोत्सवाला जिल्ह्यातील जनसामान्यांचा मोठा पाठिंबा मिळणार असून हा जिल्हा आणि आसपासच्या परिसराची ओळख ही चौथी मुंबई म्हणून होणार आहे. डहाणू येथील सिव्यू पार्क,डहाणू-आगर रोड येथे डहाणू नगरपरिषद यांच्यातर्फे आयोजित डहाणू पर्यटन महोत्सव ३.० उद्घाटन…
दीपक मोहिते, संवेदना, रेल्वे अधिकाऱ्याकडून जिल्ह्यातील कोकणवासीयांना सावत्रपणाची वागणूक, वसईहुन थेट सावंतवाडी अशी गाडी सुरू करा,अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून डहाणू-भाईंदर परिसरात राहणाऱ्या कोकणवासीयांनी लावून धरली आहे.पण रेल्वे बोर्ड त्यांच्या या मागणीला सातत्याने केराची टोपली दाखवत आहे.वसई,मीरा- भाईंदर,पालघर व डहाणू या चार तालुक्यात सुमारे १० ते १५ लाख कोकणवासीय नागरिक राहत आहेत. सध्या या मार्गावर दररोज चार ते पाच गाड्या सावंतवाडीला येजा करत असतात,पण या गाड्यामध्ये वसई पालघर व डहाणू येथील प्रवाशांसाठी पुरेसा आरक्षण कोटा नसल्यामुळे त्यांचे मोठ्याप्रमाणात हाल होत असतात.या सर्व गाड्या इतर राज्यातून येत असतात,त्यामुळे येथील प्रवाशांना पुरेसे आरक्षण मिळत नाही.त्यामुळे त्यांना महागड्या खाजगी बसेसचा पर्याय स्विकारावा लागतो.अशावेळी…
