जव्हार येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन : बेरोजगार तरुण. मोठ्या संख्येने सहभागी,
जव्हार प्रतिनिधी-
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार,जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पालघर आणि भगवान बिरसा मुंडा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जव्हार यांच्या संयुक्त विद्यमाने,
जव्हार,मोखाडा,विक्रमगड आणि वाडा तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी,यादृष्टीने काल औद्योगिक प्रशिक्षण संस्था जव्हार येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन करिष्मा नायर (भा.प्र.से.) प्रकल्प अधिकारी तथा सहा. जिल्हाधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय जव्हार,यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाची प्रस्तावना श्याम अंबाळकर यांनी केली.सदर मेळाव्यासाठी लोखंडे इंडस्ट्रीज,गोविंदास एच आर सर्विसेस,एम.एस. आर.टी.सी.पालघर,ब्लू स्टार वाडा,ई.पी.एल.लिमिटेड , आस्था हॉस्पिटल,नवनीत एज्यु,आयशर मोटर्स नाशिक, अण्णासाहेब पाटील महामंडळ पालघर,अलाईड प्लेसमेंट अँड एच.आर.सर्विसेस,ऑल इन वन प्लेसमेंट,सक्सेस जॉब प्लेसमेंट.अशा एकूण १२ आस्थापने सहभागी झाले होते.एकूण ३६५ उमेदवार सहभागी झाले होते.त्यातून २१८ उमेदवारांना नोकरीची संधी मिळाली.करिष्मा नायर यांनी मुलांना रोजगाराच्या आणि व्यक्तिमत्व विकास तसेच आजच्या युगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चॅट जी.पी.टी.याचा आपण आपल्या जीवनामध्ये कशा तऱ्हेने उपयोग करू शकतो,याविषयी मार्गदर्शन केले.दीपक टिके सहा. प्रकल्पाधिकारी यांनी सदर संधीचे सोने करावे,असे आवाहन केले.सदर मेळाव्यामध्ये नरेंद्र शिरसाट कौशल्य विकास को-ऑर्डिनेटर यांनी इस्त्रायल येथे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याबाबत माहिती दिली. तसेच संस्थेचे प्राचार्य अंबाळकर यांनी या रोजगार मेळाव्याचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा,असे आवाहन केले. रोजगाराभिमुख आणि महत्त्वकांक्षी या प्रकल्पात दहावी,बारावी,आयटीआय, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण झालेले विविध उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यात उपस्थित राहून संधीचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पडवळ आणि आभार प्रदर्शन श्रीमती संपदा मरगडे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय जव्हार,औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग या सर्व संस्थेतील सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद आणि प्रशिक्षणार्थी यांनी सहकार्य लाभले.

