दीपक मोहिते,
” अर्थकारण,”
केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ ; सर्वसामान्यजनांना दिलासा देणारा असू शकतो,
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन,या आज सलग आठव्यांदा देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडणार आहेत.आजवर एकाही अर्थमंत्र्याला शक्य झाले नाही,ते सीतारामन यांनी करून दाखवले आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ कसा असेल,यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोनच दिवसापूर्वी मध्यमवर्ग,महिला व गरीब या घटकांना दिलासा मिळेल,अशा आर्थिक सुधारण्याचे संकेत दिले आहेत.त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारकडून करसवलती व सामाजिक व कल्याणकारी योजनांचा वर्षाव होईल,अशी शक्यता आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी संसदेत केलेल्या अभिभाषणामध्ये प्रधानमंत्री आवास योजना आणखी ३ कोटी कुटुंबासाठी विस्तारीत करण्याचे जाहीर केले होते.त्यामुळे देशभरातील कोट्यवधी कुटुंबाना घरे मिळणे शक्य होणार आहे.तसेच या अर्थसंकल्पात महिला उद्योग,बचत गट व आरोग्य योजनांसाठी भरीव तरतूद करण्यात येणार आहे. नोकरदार मंडळींसाठी करसवलत व करकपातीचे फायदे मिळणार आहेत.मात्र महागाईवर नियंत्रण,बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे,कृषीविषयक सुधारणा,कृषी उत्पन्नांना हमी भाव ( एमएसपी ) या विषयाला पंतप्रधानांनी स्पर्श न केल्यामुळे या क्षेत्रात सर्वत्र संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.पायाभूत सोयी-सुविधा क्षेत्रात मात्र त्यांनी सुधारणांना प्राधान्य दिले आहे.त्यासाठी भरीव आर्थिक तरतुदी केल्याचे संकेत मिळत आहेत.एकंदरीत हा अर्थसंकल्प हा सर्वसामान्यजनाना दिलासा देणारा असेल.

