अनिकेत मेहेर,डहाणू,
अशोक धोडी यांची कार गुजरात राज्यातील भिलाड येथे दगडखाणीच्या तलावात सापडली,
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे डहाणू तालुका संघटक हे गेल्या अकरा दिवसापासून बेपत्ता होते.पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर आज त्यांची कार गुजरातच्या भिलाड गावातील दगडखाणीच्या तलावात सापडली आहॆ.ती कार बाहेर काढण्याचे काम पोलिसाकडून सुरु आहे. ही कार बाहेर काढल्यानंतर अशोक धोडी यांचे नेमके काय झाले हे स्पष्ट होईल.
गेल्या २० जाने.रोजी सांयकाळी अशोक धोडी यांचे अपहरण करण्यात आले होते.त्या दिवशी त्यांनी आपण डहाणू येथून घरी येत असल्याचे आपल्या पत्नीला कळवले होते.त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाला होता. त्यांच्या नातेवाईकांनी तक्रार केल्यानंतर पोलीसानी सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली.सीसीटीव्ही तपासल्यानंतर त्यांची गाडी गुजरातच्या दिशेने गेल्याचे स्पष्ट झाले.दरम्यान पोलिसांनी चार संशियतांना याप्रकरणी ताब्यात घेतले.तपाससा अंती आज त्याची ब्रेझा गाडी गुजरात राज्यातील भिलाड येथे एका दगडखाणीच्या तलावात सापडली,ती बाहेर काढण्याचे काम सध्या सुरु आहॆ.ती बाहेर काढल्यानंतर धोडी यांचे नेमके काय झाले, याविषयी उलगडा होईल,असे पोलिसांचे म्हणणे आहॆ.त्यांची हत्या झाली असावी,असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.अशोक धोडी यांचे अपहरण हे दारूच्या तस्करीमधून झाल्याचे उघड झाले आहे.या प्रकरणात अशोक धोडी यांचा भाऊ अविनाश धोडी यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते,पण तो पोलिसांची नजर चुकवून पोलीस ठाण्यातून पळून गेला.तसेच अन्य दोघेजणही राजस्थानात पळून गेल्याची माहिती असून हे फरारी आरोपी जोवर पोलिसांच्या हाती लागत नाहीत,तोवर अशोक धोडी यांचे काय झाले,यामागची नेमकी कारणे समजू शकणार नाहीत.

