शुभम सावंत,विरार
९ फेब्रू.रोजी विरार येथे,विरार फन रन २०२५ चे आयोजन,
यंग स्टार ट्रस्ट,अमेय क्लासिक क्लब व विराट फाऊंडेशन आयोजित विरार रन २०२५,९ फेब्रु.रोजी पार पडणार आहे. यात १८ वर्षांवरील सर्व वयोगटातील १० किमी दौड आयोजित करण्यात आली आहे. तसेच ६ ते १६ वयो गटातील मुलं व मुलींसाठी १.५ किमी दौड आयोजित करण्यात आली आहे. १.५ कि.मी.दौडमध्ये भाग घेणाऱ्या सर्वांसाठी प्रवेश मोफत आहे. तसेच या वेळी फन रन दरवर्षी प्रमाणे आयोजित करण्यात येते.तर विरार रन मध्ये महिलांसाठी विशेष ‘वॉकथॉन’ आयोजित करण्यात आली आहे. वॉकथॉन मध्ये कमीत कमी ५ जास्तीत जास्त १० महिलांचा एक संघ बनवणे आवश्यक आहे.प्रत्येक संघाला ५ सामाजिक संदेश देणे आवश्यक असणार आहे. यातील ४ सामाजिक संदेश आम्ही दिले आहेत तर पाचवा संदेश हा संघांनी तयार कराय्चा आहे.जसे वसई विरार महानगरपालिका मॅरॅथॉनचे ब्रीद वाक्य ‘स्त्री भ्रूण हत्या टाळा, निसर्गाचा समतोल पाळा’, विरार रनचे ब्रीद वाक्य ” गो ग्रीन गो क्लीन,” विरार पोलिसांचे ब्रीद वाक्य ” से नो टू ड्रग्स,” विरार मेडिकल असोसएशनचे ब्रीद वाक्य,” से नो टू डिप्रेशन’ हे चार संदेश असणार आहेत. तर पाचवा सामाजिक संदेश हा संघाने स्वतः बनवायचा आहे.
याच बरोबर रन संपल्यावर वॉकथॉनमध्ये भाग घेतलेल्या प्रत्येक महिलेने सेल्फी पॉइंट वर फोटो स्वतः काढावा यासाठी विरार रनचे स्वयंसेवक त्यांना सहकार्य करतील.हा फोटो महिलांनी स्वतःच्या इंस्टाग्राम वर अपलोड करून विरार रन इंस्टाग्राम अकाउंटला टॅग करणे व कोलॅब करणे गरजेचे आहे.गौरी देशमुख आणि उत्कर्ष विद्यालयाच्या उपमुख्यद्यापिका चित्रा सुनील ठाकूर या स्पर्धेचे परीक्षण करणार आहेत.यातून ४ संघांना पारितोषिकाच्या स्वरूपात रोख बक्षिसे व मानचिन्ह देण्यात येणार आहेत.स्पर्धेत भाग घेतलेल्या महिलांनी साडी नेसून पारंपरिक वेशभूषेत येणे गरजेचे आहे.वॉकथॉनमध्ये सहभाग घेण्यासाठी अमेय क्लासिक क्लब येथे फॉर्म भरून नोंदणी करणे आवश्यक आहे व ही नोंदणी विनामूल्य आहे.
सर्व महिलांना आवाहन करण्यात येते की आपण जास्तीत जास्त संख्येने ह्या स्पर्धेचा लाभ घ्यावा.
असे आवाहन
आयोजक माजी नगरसेवक हार्दिक राऊत यांनी केले आहॆ.

