- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” कुणाल कामराचे गाणे : शिंदे यांचा गेम नक्की कोणी केला? सध्या कुणाल कामरा यांनी सत्ताधाऱ्यांची झोप पार उडवली आहे.त्याच्या एका गाण्याने शिंदे गटाच्या पायाखालची जमीनच जणू सरकली आहे.त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारांनी त्याच्या स्टुडिओची प्रचंड नासधूस केली.वास्तविक शिंदे यांनी कामरावर निंदानालस्ती केल्या प्रकरणी न्यायालयात दावा ठोकायला हवा होता,ते न करता त्यांच्या पिल्लावळीने हिंसक मार्ग स्विकारत त्याचा स्टुडिओ व ज्या हॉटेलमध्ये कामरा याचा शो होता,त्या हॉटेलचे जवळपास २५ लाखाचे नुकसान केले.आता या हॉटेलचा मालक सरकारला ” या प्रकरणी आमचा दोष काय ? असा प्रश्न विचारत आहे.या प्रश्नाचे उत्तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजे. या…
नाशिक प्रतिनिधी, अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये चार श्रमसंहिता व जन सुरक्षा कायद्याची होळी, नाशिक शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीतील सिमेंस कंपनी चौफुली जवळ केंद्रातील भाजप सरकार व राज्यातील महायुती सरकारतर्फे १ एप्रिल २०२५ पासून नवीन लेबर कोड कायदा व महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा लागू करणार आहे.त्याच्या निषेधार्थ आज नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात निदर्शने करण्यात आली. हे कायदे कामगार,शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेच्या हिताचे नाहीत,त्यास विरोध करण्यासाठी अंबड औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यांचे कामगार एकत्र येऊन जोरदार निदर्शने करण्यात आली.यावेळी चार लेबर कोड व जनसुरक्षा कायद्याच्या प्रतीची होळी करण्यात आली.नासिक वर्कर्स युनियनचे चिटणीस कॉ. आत्माराम डावरे व सरचिटणीस कॉ.तुकाराम सोनजे यांनीयावेळी मार्गदर्शन केले.या आंदोलनामध्ये अरविंद…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावरून वादंग होण्याची शक्यता… राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून वादंग सुरु असताना आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. काही दिवसापूर्वी स्वराज्य पक्षाचे प्रमुख आणि माजी खा.संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड समाधीस्थळाजवळ असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा उपस्थित केला आहे.ही समाधी कपोलकल्पित असून तिला इतिहासाचा कुठलाही आधार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रायगडावरील या समाधीबाबत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये वाघ्या कुत्र्याच्या पात्राचा कुठेही उल्लेख नाही, असे इंद्रजित सावंत यांनी म्हटले आहे.तसेच,वाघ्या कुत्र्याची निर्मित्ती कुठून झाली, यावर त्यांनी भाष्य केलं आहे.एका नाटकातून वाघ्या कुत्र्याची निर्मिती झाल्याचं…
वसंत भोईर,वाडा सरकारच्या निष्क्रियतेमुळे वाड्यातील शेतकऱ्यांची दैनावस्था, गेल्या पाच वर्षापासून शेतकऱ्यांना खरीप हंगामात नापीकीपणाचा सामना करावा लागत आहे.यंदाही खरीप हंगामात अतिवृष्टी व दोनदा आलेल्या महापुरामुळे होत्याचे नव्हते झाले.हाती आलेले धानाचे पीक मातीमोल झाले आहे.नदी व नाल्यांच्या काठावरील शेती पिकांसह खरडून वाहून गेली.त्यातच लष्करी अळीसह कीड व रोगांनी पीक नेस्तनाबूत केले आहे. यंदा शासनाने तेवीसशे रु.चा हमीभाव जाहीर केला.परंतु दोन महिने उशिरा हमीभाव केंद्र सुरू झाले. आर्थिक अडचणीमुळे व्यापाऱ्यांना प्रति क्विंटल दोन हजार रु.च्या भावाने धान विकावे लागले.सोने पिकवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाती यंदा माती पडली आहे.धानाची साडेसाती शेतकऱ्यांचा पिच्छा सोडताना दिसत नाही.शासनाच्या मार्गदर्शनामध्ये शेतकरीवर्ग धानाच्या शेतीत विविध प्रयोग करत असतात.परंतु…
सुरेश काटे,तलासरी तलासरी येथे शहीद दिनानिमित्त मशाल रॅलीचे आयोजन, २३ मार्च १९३२ रोजी क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना फाशी देण्यात आली होती. त्यामुळे आपल्या देशात २३ मार्च हा दिवस शहिद दिवस म्हणून पाळण्यात येतो. त्यानिमित्ताने काल सांय.डीवायएफआय,तलासरी तालुकातर्फे मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.ही रॅली तलासरी गावाच्या बाजारपेठेतून काढण्यात आली.आपल्या देशात दरवर्षी २३ मार्च रोजी शहीद दिन साजरा करण्यात येतो.देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या शूरवीरांचे स्मरण दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी या दिवसाचे खास स्मरण केले जाते. २३ मार्च १९३२ रोजी लाहोर तुरुंगात,युवा स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” कुणाल कामरा प्रकरण : “आपला तो बाब्या,दुसऱ्याचा तो कार्ट्या,” असे होता कामा नये, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे म्हणणाऱ्या कुणाल कामरा यांच्या स्टुडिओची शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी प्रचंड तोडफोड केली.या घटनेतील शिवसैनिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे.कुणाल कामरा याने आपल्या गाण्यात थेट शिंदे यांना लक्ष्य केल्यामुळे शिवसैनिकांच्या भावना अनावर झाल्या व ही घटना घडली.कामरा याने आपल्या गाण्यात जिव्हारी लागेल, अशाप्रकारची टीका करणे,न्यायाला धरून नाही.पण,शिवसैनिकांनीही हिंसक कृती करणे,हे देखील समर्थनीय नाही,हेही तितकेच खरे आहे. पण हल्लीच्या काळात ” चुकीला माफी नाही,” हा नवीन फंडा अस्तित्वात आला आहे.” नो पोलीस,नो न्यायप्रक्रिया,” सिर्फ हम करेसो…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आधी पकडा आणि मग कोकला ” याला सोडणार नाही,त्याला सोडणार नाही,” छत्रपती शिवाजी महाराजांवर टीका करून मुस्लिम देशात पळून जाणे,याला आपण नवा हिंदुत्ववाद म्हणायचे का ? राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ दररोज ” याला सोडणार नाही,त्याला सोडणार नाही,” अशा सिंहगर्जना करताना पाहायला मिळतात.त्यांच्या नाकावर टिच्चून प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेला.देवभाऊनी एक लक्षात घ्यायला हवे की ” याला सोडणार नाही,त्याला सोडणार नाही,” हे म्हणायला सोपे आहे.पण त्यांना सोडायला, सर्वप्रथम पकडा तरी… संतोष देशमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी हा देवाभाऊच्या पोलिसांना गेल्या चार महिन्यापासून सापडत नाही आणि भाऊ ” सोडणार नाही,” ची भाषा करत फिरत आहेत.नागपूर येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी…
दीपक मोहिते, बाबर ते औरंगजेबाची कबर, हा प्रवास पुन्हा सुरु होणे, आपल्याला परवडणारे नाही… महाराष्ट्रात औरंगाजेबाच्या कबरीवरून गेल्या काही दिवसापासून प्रचंड गदारोळ उठला आहे.हा प्रश्न नेमका आताच उकरून काढण्यात का आला.या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.चारशे वर्षांपूर्वी कबरीत गेलेल्या आलमगीर औरंगजेबावरून नागपूर सारख्या सुशिक्षित शहरामध्ये राज्याच्या पुरोगामी चेहऱ्याला काळे फासणाऱ्या समाजविघातक शक्ती कोण आहेत.यावर विचारमंथन होण्याची गरज आहे.त्यासाठी दोन्ही बाजू समोर आणण्याचा हा प्रयत्न आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे असलेल्या त्या कबरीची पुजा होते,तिच्यावर चादर चढवली जाते आणि तिच्यावर गुलाबाची फुले वाहिली जातात,ही खरी समस्या आहे.औरंगजेब फक्त हिंदवी स्वराज्याचा वैरी नव्हता,तर तो हिंदुचाही वैरी होता.इतिहास चाळून पाहिला तर…
सुरेश काटे,तलासरी कळमदेवी आश्रमशाळेच्या नवीन इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन, आदिवासी विकास विभागातर्फे चालवण्यात येणाऱ्या शासकीय आश्रम शाळा कळमदेवीच्या नवीन इमारतीचे उदघाटन पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गणेश नाईक,खा.हेमंत सवरा, आ.विनोद निकोले, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, प्रकल्प अधिकारी सत्यम गांधी,जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी,तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते कलमदेवी आश्रम शाळेच्या नवीन इमारतीच्या उदघाटनासोबत विज्ञान केंद्राच्या नवीन इमारतीचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. शासकीय आश्रमशाळेत अनेक अडचणी,सोयी सुविधाचा अभाव होता.त्या अडचणी टप्पाटप्पाने सोडवण्यात येत आहेत.अनेक इमारती जुन्या जीर्ण झाल्या असून त्यांचे नूतनीकरण व नव्याने बांधकाम…
वसंत भोईर,वाडा सततच्या खोदकामाने कुडूस-चिंचघर-देवघर रस्त्यावर वाहतूककोंडी, वाडा तालुक्यातील कुडूस -चिंचघर- देवघर रस्त्यावर गुजरात गॅस पाईपलाईन कंपनीकडून गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे.त्यामुळे या मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. सतत होणाऱ्या खोदकामामुळे रस्त्याचीही पार दुरावस्था झाली आहे.रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे सध्या अतोनात हाल आहेत. प्रशासनाने याप्रकरणी गंभीर दखल घेऊन संबंधित कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसचे पालघर जिल्हा अध्यक्ष प्रफुल पाटील यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.कुडूस-चिंचघर- देवघर हा अत्यंत वर्दळीचा रस्ता असून,या रस्त्यावर मोठ्याप्रमाणावर अवघड वाहनाची वाहतूक होत असते. अशा परिस्थितीमध्ये या खोदकामामुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीने नागरिकांचा जीव मेटाकुटीस आला आहे.सध्या या रस्त्यावरून प्रवास करणे अत्यंत धोकादायक…
