सुरेश काटे,तलासरी
कळमदेवी आश्रमशाळेच्या नवीन इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन,
आदिवासी विकास विभागातर्फे चालवण्यात येणाऱ्या शासकीय आश्रम शाळा कळमदेवीच्या नवीन इमारतीचे उदघाटन पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री गणेश नाईक,खा.हेमंत सवरा, आ.विनोद निकोले, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, प्रकल्प अधिकारी सत्यम गांधी,जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी,तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते कलमदेवी आश्रम शाळेच्या नवीन इमारतीच्या उदघाटनासोबत विज्ञान केंद्राच्या नवीन इमारतीचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
शासकीय आश्रमशाळेत अनेक अडचणी,सोयी सुविधाचा अभाव होता.त्या अडचणी टप्पाटप्पाने सोडवण्यात येत आहेत.अनेक इमारती जुन्या जीर्ण झाल्या असून त्यांचे नूतनीकरण व नव्याने बांधकाम करण्यात येत आहेत.जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेच्या अनेक तक्रारीचे निराकरण करण्यात येत असून,तलासरी भागात अनेक विकास प्रकल्प लादण्यात आले असुन आदिवासी शेतकरी त्यामुळे बाधित होत आहेत.त्यांना योग्य तो मोबदला दिला जात नसल्याकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले असता याविषयी निवेदन दिल्यास त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

