सुरेश काटे,तलासरी
तलासरी येथे शहीद दिनानिमित्त मशाल रॅलीचे आयोजन,
२३ मार्च १९३२ रोजी क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना फाशी देण्यात आली होती. त्यामुळे आपल्या देशात २३ मार्च हा दिवस शहिद दिवस म्हणून पाळण्यात येतो.
त्यानिमित्ताने काल सांय.डीवायएफआय,तलासरी तालुकातर्फे मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.ही रॅली तलासरी गावाच्या बाजारपेठेतून काढण्यात आली.आपल्या देशात दरवर्षी २३ मार्च रोजी शहीद दिन साजरा करण्यात येतो.देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या शूरवीरांचे स्मरण दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी या दिवसाचे खास स्मरण केले जाते. २३ मार्च १९३२ रोजी लाहोर तुरुंगात,युवा स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली.भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांच्या बलिदानाचा दिवस हा दरवर्षी शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो.
साधारणत: २० वर्षे वयाच्या शूरवीरांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी तलासरीच्या डीवायएफआय संघटनेतर्फे मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते .
या रॅलीत डीवायएफआयचे अनिल झिरवा,नंदकुमार हडळ,सुहास सुरती,विजय बोदले,इ.सह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

