Author: दीपक मोहिते

संजय नेवे,विक्रमगड माकपतर्फे विविध मागण्यासाठी आज तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला, विक्रमगड तालुक्यातील आदिवासींना आपल्या हक्काच्या मूलभूत सुविधा मिळाव्यात,यासाठी तालुक्याची निर्मिती झाली.पण आजही मूलभूत सुविधांसाठी स्थानिक भूमिपुत्रांना संघर्ष करावा लागत आहे.तालुक्यातील जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठ्याची कामे अत्यंत संथगतीने सुरु असून ती लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी व लोकांना लवकरात लवकर पाणी मिळावे.तसेच घरकुले मंजूर झाली असून या घरकुलाची रक्कम लाभार्थ्यांना लवकर मिळावी. तालुक्यातील महावितरणाचा सावळा गोंधळ कारभार सुरु असून तो दूर करावा,लोकांना तात्काळ मीटर द्यावे,फॉरेस्ट प्लॉट पती- पत्नीच्या नावे करावे,आरोग्य यंत्रणेत सुधारणा व्हावी, देहर्जा धरणातील विस्थापितांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा, तालुक्यातील खराब रस्त्यांची लवकर लवकर दुरुस्ती करावी.…

Read More

संजय नेवे,विक्रमगड विक्रमगड तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारा पाणीपुरवठा, विक्रमगड तालुक्याची पाणीटंचाई दुर करण्यासाठी प्रशासनाने एक टँकर मंजूर केला आहे.त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. विक्रमगड तालुक्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई भीषण रूप धारण करत आहे. त्यामुळे ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत.पाण्याची पातळी सतत कमी होत आहे.तालुक्यात सर्वत्र पाणीटंचाईला सुरुवात झाली असून खुडेद ग्रामपंचायत हद्दीतील घोडीचापाडा व साखरे ग्रामपंचायत हद्दीतील चिचपाडा,पागीपाडा,पाटील पाडा,येथील विहिरींनी तळ गाठला आहे.या भीषण पाणीlटंचाईमुळे भागातील लोकांची पाण्यासाठी भटकंती सुरु झाली आहे.स्थानिक ग्रामपंचायतीने पाणीटंचाई दूर व्हावी,यासाठी टँकरची मागणी केली होती,ती प्रशासनाने तात्काळ मान्य केली व एक टँकर उपलब्ध करून देण्यात आला आहे.जेणेकरून सध्या या भागातील नागरिकांना पाणी मिळत आहे.तालुक्याच्या तापमानात प्रचंड…

Read More

संगीता तावडे,मंत्रालय, चिंचोटी-भिंवडी राज्यमार्गाचा तिढा सुटण्याची शक्यता, चिंचोटी – कामण -भिवंडी राज्यमार्गाचे रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांसोबत आ.स्नेहा दुबे पंडित यांची मंत्रालयात बैठक नुकतीच पार पडली. वसई तालुक्याचा भिवंडी तालूक्याशी जोडणाऱ्या चिंचोटी – कामण – भिवंडी या राज्य मार्गाची अत्यंत दुर्दशा झाली असून वसई-विरार परिसरातील नोकरदार – कामगार – उद्योजक यांना अतोनात त्रास सहन करावा लागतो.दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडत असतात. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. दरवर्षी हा रस्ता दुरुस्त करण्यात येतो.पण तो पुन्हा पुन्हा फुटतो व रस्यावर खड्ड्याचे साम्राज्य निर्माण होत असते. या प्रकरणी भाजपच्या आ.स्नेहाताई दुबे-पंडित यांनी विधानसभेच्या नागपूर येथील…

Read More

दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” सरकार मुर्दाड बनले आहे, शेतकऱ्यांच्या आयुष्याला कोणाचीच गॅरंटी नाही… राज्याच्या कृषिक्षेत्रावर गेल्या दोन ते तीन दशकापासून अनेक संकटे आदळत आहेत. अवकाळी पाऊस,गारपीटी व नापिकी,अशा अस्मानी संकटामुळे आतापर्यंत दोन लाख शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.आजही ते दुष्टचक्र सुरूच आहे.दोन दिवसापूर्वी परभणी जिल्ह्यात माळसोन्ना या गावात सचिन जाधव या तरुण शेतकऱ्यांने आत्महत्या केली,हे दुःख सहन न झाल्यामुळे त्याची पत्नी ज्योती हीने देखील विषारी औषध घेवून आत्महत्या केली.राज्यात २०२४ मध्ये २ हजार ७०६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसात बाजरी,मका,मिरची,सोयाबीनसह आंबा,द्राक्ष,डाळिंब व मोसंबी,या फळ उत्पन्नाचेही प्रचंड नुकसान झाले आहे.मात्र सत्ताधारी मंडळी या लाखो बाधित शेतकऱ्यांना ” मोदींची…

Read More

दीपक मोहिते, कुणाल कामरा याला अटक करता येणार नाही – मुंबई उच्च न्यायालय, स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिलंय.त्याचा जवाब नोंदवण्यासाठी अटकेची गरज नसल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.कामराच्या जिवाला धोका असून तो मुंबईत आल्यास त्याच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारची असेल,असे स्पष्ट मत न्यायालयाने नोंदवले आहे.त्यामुळे कामराला अटक करण्याचे महायुती सरकारचे स्वप्न न्यायालयाच्या या निर्णयामुळे भंग पावले आहे. कुणाल कामरा हा स्टँडअप कॉमेडीयन असून त्याने गेल्या महिन्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक काव्यातून जोरदार टीका केली होती.त्याच्या गाण्याची व्हिडियो क्लिप व्हायरल झाल्यानंतर राज्यात प्रचंड गदारोळ उठला होता.शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी त्याच्या स्टुडिओवर हल्ला चढवत तोडफोड केली…

Read More

दीपक मोहिते, काहीही हं… शिंदे गटाचा १०० % कपाळमोक्ष होणार… राजकारणात कधी काय होईल,याचा नेम नाही.कालचे शत्रू हे आज गळ्यात गळा घालताना पाहायला मिळतात.राजकारणात सोयीनुसार वागावे लागते,हेच खरं.या अशाच सोयीनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवतीर्थावर नुकतेच दाखल झाले होते.शिंदे हे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते.त्याचवेळी सदा सरवणकर हे गालातल्या गालात हसत होते. मुंबई व ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही ऐतिहासिक भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.राज ठाकरे यांच्या आडमुठे धोरणामुळे शिंदे गटाचे सदा सरवणकर यांना घरी बसावे लागले.या घटनेची उपमुख्यमंत्री शिंदे यांना अवघ्या चार महिन्यात विसर पडावा,यासारखे दुसरे दुर्देव नसावे.त्यांचे माजी आ.राजू पाटील यांनी…

Read More

सचिन परब,वसई जूचंद्र येथील चंडिका देवीच्या यात्रेत रांगोळी प्रदर्शनाला यात्रेकरूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद, जूचंद्र गावाची ग्रामदेवी असलेल्या चंडिकादेवीच्या यात्रेला कालपासून सुरुवात झाली.या यात्रेत जूचंद्र गावातील तरुणांनी काढलेल्या रांगोळ्यांचे दरवर्षी प्रदर्शन भरवण्यात येते. यंदाही रांगोळीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.त्याला चित्ररसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. वसई तालुक्यातील जूचंद्र आणि पंचक्रोशीतील कलाकार रांगोळी काढण्यात नावारूपाला आले आहेत. देवीच्या यात्रेत वेगवेगळ्या विषयावर काढलेल्या रांगोळ्या रसिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.यामध्ये महाकुंभ मेळा,छत्रपती शिवाजी महाराज,दुष्काळाची दाहकता,ज्योतिबा,मुंबईचा हिटमॅन रोहित शर्मा,छावा मधील संभाजी अशा अनेक रांगोळ्या साकारण्यात आल्या आहेत.या रांगोळ्या शैलेश केदारनाथ पाटील,पंकज पाटील, प्रसाद पाटील, प्रविण भोईर, केतन पाटील,संजय पाटील,भारत प्रधान,मिनार पाटील,संजित पाटील,करण वटार ,गणेश सालियन,प्रणित भोईर,स्नेहा…

Read More

जव्हार प्रतिनिधी, एकलव्य कुशल योजनेअंतर्गत आदिवासी युवकांसाठी मोफत रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण, आदिवासी विकास विभागांतर्गत रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम ” एकलव्य कुशल योजनेअंतर्गत १ डिसें.२०२४ पासुन प्रत्यक्ष प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने या योजनेअंतर्गत इच्छुक प्रशिक्षणार्थीना अर्ज करण्यासाठी शबरी महामंडळातर्फे ” एकलव्य कुशल,” (https:/eklavyakushal.in/) हे वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे. या वेबपोर्टलच्या माध्यमातुन कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्यास इच्छुक लाभार्थी आपला अर्ज ऑनलाइन पध्दतीने नोंदवू शकतात. तसेच लाभार्थीना योजनेची अधिक माहिती मिळवण्यासाठी व ऑनलाइन अर्ज नोंदवताना येणा-या शंकाचे निरासन करण्यासाठी शबरी महामंडळातर्फे टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकः १८००२३३५८६० उपलब्ध करुन देण्यात आला आहे. कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी २० प्रशिक्षण…

Read More

जव्हार प्रतिनिधी, शैक्षणिक गुणवत्तेसाठी जव्हारमधील शिक्षकांचा अभ्यास दौरा, जव्हार तालुक्यात शिक्षणाच्या दर्जात सुधारणा घडवण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचा अनुभव घेण्यासाठी जव्हारमधील ५० शिक्षकांनी नुकताच त्र्यंबकेश्वर येथील वंडर स्कूल,हिवाळी या शाळेचा अभ्यास दौरा केला. हा दौरा जव्हार गटशिक्षणाधिकारी विजया टाळकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली ३ एप्रिल २०२५ रोजी आयोजित करण्यात आला होता.या अभ्यास दौऱ्याचे प्रमुख उद्दिष्टे विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडथळे दूर करणे,अध्ययन स्तर उंचावणे,पायाभूत साक्षरता आणि मूलभूत गणिती कौशल्ये विकसित करणे,तसेच शिक्षकांच्या नवनिर्मित क्षमतेला चालना देणे ही होती. वंडर स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे संख्याज्ञान,गणिती क्रिया, वाचन-लेखन कौशल्य आणि संविधानाचे पाठांतर पाहून शिक्षक आश्चर्यचकित झाले. विशेष म्हणजे या शाळेत विद्यार्थी दोन्ही हातांनी लेखन करतात,संविधानातील अनेक कलमे तोंडपाठ…

Read More

नदीम शेख,पालघर तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना मिळाला मोबदला ; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण, मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड या प्रकल्पामुळे पालघर जिल्ह्यातील वाडा व विक्रमगड तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना मोबादला देण्यात आला आहे.त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.या प्रकल्पांमुळे मुंबई महानगर प्रदेशाला दोन हजार मेगावॅट अतिरिक्त ऊर्जा मिळणार आहे.हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे मुंबईसह कल्याण, अंबरनाथ व पनवेल तालुक्याच्या वीजेचा प्रश्न सुद्धा निकाली निघाला आहे. या प्रकल्पासाठी गुजरात वरून हरित ऊर्जा आणण्यात आली आहे.ही वीज इतर वीज कंपन्यांपेक्षा तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त असणार आहे.त्यामुळे वीज ग्राहकाला देखील इतर कंपनीच्या मानाने वीजपुरवठा स्वस्त्यात मिळणार आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा व विक्रमगड तालुक्यातून टॉवर व वीज वाहक…

Read More