सचिन परब,वसई
जूचंद्र येथील चंडिका देवीच्या यात्रेत रांगोळी प्रदर्शनाला यात्रेकरूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद,
जूचंद्र गावाची ग्रामदेवी असलेल्या चंडिकादेवीच्या यात्रेला कालपासून सुरुवात झाली.या यात्रेत जूचंद्र गावातील तरुणांनी काढलेल्या रांगोळ्यांचे दरवर्षी प्रदर्शन भरवण्यात येते.
यंदाही रांगोळीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.त्याला चित्ररसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
वसई तालुक्यातील जूचंद्र आणि पंचक्रोशीतील कलाकार रांगोळी काढण्यात नावारूपाला आले आहेत. देवीच्या यात्रेत वेगवेगळ्या विषयावर काढलेल्या रांगोळ्या रसिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.यामध्ये महाकुंभ मेळा,छत्रपती शिवाजी महाराज,दुष्काळाची दाहकता,ज्योतिबा,मुंबईचा हिटमॅन रोहित शर्मा,छावा मधील संभाजी अशा अनेक रांगोळ्या साकारण्यात आल्या आहेत.या रांगोळ्या शैलेश केदारनाथ पाटील,पंकज पाटील, प्रसाद पाटील, प्रविण भोईर, केतन पाटील,संजय पाटील,भारत प्रधान,मिनार पाटील,संजित पाटील,करण वटार ,गणेश सालियन,प्रणित भोईर,स्नेहा मालवी,संचिता म्हात्रे,अक्षदा पाटील,जय म्हात्रे,नितेश भोईर,साई पाटील,बालाजी कोतावडे यांनी साकारल्याचे आहेत.

