नदीम शेख,पालघर
तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना मिळाला मोबदला ; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण,
मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड या प्रकल्पामुळे पालघर जिल्ह्यातील वाडा व विक्रमगड तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना मोबादला देण्यात आला आहे.त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.या
प्रकल्पांमुळे मुंबई महानगर प्रदेशाला दोन हजार मेगावॅट अतिरिक्त ऊर्जा मिळणार आहे.हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे मुंबईसह कल्याण, अंबरनाथ व पनवेल तालुक्याच्या वीजेचा प्रश्न सुद्धा निकाली निघाला आहे.
या प्रकल्पासाठी गुजरात वरून हरित ऊर्जा आणण्यात आली आहे.ही वीज इतर वीज कंपन्यांपेक्षा तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त असणार आहे.त्यामुळे वीज ग्राहकाला देखील इतर कंपनीच्या मानाने वीजपुरवठा स्वस्त्यात मिळणार आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा व विक्रमगड तालुक्यातून टॉवर व वीज वाहक तारा टाकण्याचे काम पूर्ण झाले असून वीज प्रवाहाची चाचणी घेण्यात आली आहे.वीजप्रवाह देखील आता सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी विजेचा टॉवर उभारताना ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर हे टॉवर उभारण्यात आले आहेत, ती जमीन शेतकऱ्यांच्याच नावावर राहणार आहे.त्याचा मोबदलाही शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.पालघर जिल्ह्यातील वाडा व विक्रमगड जवळ या भागातून हे विजेचे टॉवर गेले आहेत.त्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात आल्याचे मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड या कंपनीकडून सांगण्यात आले.
प्रतिक्रिया-
सुरुवातीला आम्हाला वाटले होते,या प्रकल्पामुळे आमची आर्थिक हानी होईल.मात्र प्रकल्प जसा तयार होत गेला, त्यावरून आम्हाला समजले की हा प्रकल्प आमच्यासाठी चांगला आहे.त्याच्यामुळे आमच्या शेतीची कुठल्याही प्रकारची हानी झाली नाही. आम्हाला आमच्या अपेक्षेप्रमाणे मोबदलासुद्धा मिळाला आहे.
— राजेश भोईर,शेतकरी

