जव्हार प्रतिनिधी,
एकलव्य कुशल योजनेअंतर्गत आदिवासी युवकांसाठी मोफत रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण,
आदिवासी विकास विभागांतर्गत रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम ” एकलव्य कुशल योजनेअंतर्गत १ डिसें.२०२४ पासुन प्रत्यक्ष प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने या योजनेअंतर्गत इच्छुक प्रशिक्षणार्थीना अर्ज करण्यासाठी शबरी महामंडळातर्फे ” एकलव्य कुशल,” (https:/eklavyakushal.in/) हे वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे.
या वेबपोर्टलच्या माध्यमातुन कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्यास इच्छुक लाभार्थी आपला अर्ज ऑनलाइन पध्दतीने नोंदवू शकतात. तसेच लाभार्थीना योजनेची अधिक माहिती मिळवण्यासाठी व ऑनलाइन अर्ज नोंदवताना येणा-या शंकाचे निरासन करण्यासाठी शबरी महामंडळातर्फे टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकः १८००२३३५८६० उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी २० प्रशिक्षण संस्थांची निवड करुन त्यांना कार्यारंभ आदेश दिले आहेत.सदर प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातुन संपुर्ण राज्यात सद्यस्थितीत ४५ प्रशिक्षण केंद्रांवर निवासी/अनिवासी स्वरुपाचे विविध कौशल्य विकास प्रशिक्षण राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत १८ ते ४५ वयोगटातील १३ हजार ८०० अनुसूचित जमातीच्या युवक-युवतींना विविध रोजगाराभिमुख कौशल्य प्रदान करुन त्यांना रोजगार/स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
एकलव्य कुशल योजनेअंतर्गत शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, नाशिक ( आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन ) आदिवासी युवकांसाठी मोफत रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण दरम्यान प्रशिक्षणार्थींना मोफत प्रवेश, प्रशिक्षण,निवास आणि भोजनाची सोय,नोकरी आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम प्रशिक्षण, भविष्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाचे प्रमाणपत्र,प्रशस्त आणि अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र,मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह,पर्यटन,हॉटेल मॅनेजमेंट,व्यक्तिमत्व विकास आणि इंग्रजी कौशल्यांसाठी तज्ज्ञ मार्गदर्शक आदि सुविधा देण्यात येणार आहेत.
यासाठी पात्रता पुढीलप्रमाणे आहे,शिक्षण किमान १० वी पास, वय १८ ते ४५ वर्षे,प्रशिक्षण कालावधी २ महिने ( ३९० तास ), ४० दिवस प्रशिक्षण + १५ दिवस ऑन-जॉब ट्रेनिंग असणार आहे.प्रशिक्षणात तुम्हाला निसर्ग आणि पर्यटन क्षेत्रातील सखोल ज्ञान,प्रभावी इंग्रजी संभाषण कौशल्य,व्यक्तिमत्व आणि नेतृत्व विकास, आदरातिथ्य,सुरक्षा तंत्र, आणि प्रथमोपचार,डिजिटल मार्केटिंग आणि उद्योजकता विकास शिकण्यास मिळणार आहे.हे प्रशिक्षण गौशिक टेक्नॉलॉजीस कौशल्य विकास संस्था,सत्यधर्म गडगे बाबा आश्रम,गंगा देवस्थान मागे, वाफेपाडा,शहापूर,जि.ठाणे संपर्क क्र. 8591 911 988/7977844885 या नंबरवर करावा.नोंदणीसाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdpWTwVGH0KlNMCC0DIXb1A4EXUfNGBIjEGqkXZJObRi68KoQ/viewform?usp=header येथे माहिती सादर करावी.जास्तीत जास्त पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी सदर योननेचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयुक्त,आदिवासी विकास आयुक्तालय,नाशिक यांनी केले आहे.

