संजय नेवे,विक्रमगड
विक्रमगड तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारा पाणीपुरवठा,
विक्रमगड तालुक्याची पाणीटंचाई दुर करण्यासाठी प्रशासनाने एक टँकर मंजूर केला आहे.त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
विक्रमगड तालुक्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई भीषण रूप धारण करत आहे. त्यामुळे ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत.पाण्याची पातळी सतत कमी होत आहे.तालुक्यात सर्वत्र पाणीटंचाईला सुरुवात झाली असून खुडेद ग्रामपंचायत हद्दीतील घोडीचापाडा व साखरे ग्रामपंचायत हद्दीतील चिचपाडा,पागीपाडा,पाटील पाडा,येथील विहिरींनी तळ गाठला आहे.या भीषण
पाणीlटंचाईमुळे भागातील लोकांची पाण्यासाठी भटकंती सुरु झाली आहे.स्थानिक ग्रामपंचायतीने पाणीटंचाई दूर व्हावी,यासाठी टँकरची मागणी केली होती,ती प्रशासनाने तात्काळ मान्य केली व एक टँकर उपलब्ध करून देण्यात आला आहे.जेणेकरून सध्या या भागातील नागरिकांना पाणी मिळत आहे.तालुक्याच्या
तापमानात प्रचंड वाढ झाल्यामुळे पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. तालुक्यातील आणखी काही गावपाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी पाणीटंचाई आराखडा तयार करणे आवश्यक असून पाणीपुरवठा विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी लोकप्रतिनिधीनी केली आहे.

