संजय नेवे,विक्रमगड
माकपतर्फे विविध मागण्यासाठी आज तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला,
विक्रमगड तालुक्यातील आदिवासींना आपल्या हक्काच्या मूलभूत सुविधा मिळाव्यात,यासाठी तालुक्याची निर्मिती झाली.पण आजही मूलभूत सुविधांसाठी स्थानिक भूमिपुत्रांना संघर्ष करावा लागत आहे.तालुक्यातील जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठ्याची कामे अत्यंत संथगतीने सुरु असून ती लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी व लोकांना लवकरात लवकर पाणी मिळावे.तसेच घरकुले मंजूर झाली असून या घरकुलाची रक्कम लाभार्थ्यांना लवकर मिळावी.
तालुक्यातील महावितरणाचा सावळा गोंधळ कारभार सुरु असून तो दूर करावा,लोकांना तात्काळ मीटर द्यावे,फॉरेस्ट प्लॉट पती- पत्नीच्या नावे करावे,आरोग्य यंत्रणेत सुधारणा व्हावी, देहर्जा धरणातील विस्थापितांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा, तालुक्यातील खराब रस्त्यांची लवकर लवकर दुरुस्ती करावी. अशा विविध मागण्यांसाठी आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने तहसील कार्यालयावर मोर्चा नेला होता.यावेळी पाणीपुरवठा विभागातील अधिकारी महावितरणचे अधिकारी,गटविकास अधिकारी,वनविभागाचे अधिकारी,देहेजे प्रकल्प अधिकारी,इ.विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातील ज्येष्ठ नेते राजा गहला,अमृत भावर,विनोद माढा ताई बेंदर,संजय ठाकरे आदी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

