दीपक मोहिते,
कुणाल कामरा याला अटक करता येणार नाही – मुंबई उच्च न्यायालय,
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिलंय.त्याचा जवाब नोंदवण्यासाठी अटकेची गरज नसल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.कामराच्या जिवाला धोका असून तो मुंबईत आल्यास त्याच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारची असेल,असे स्पष्ट मत न्यायालयाने नोंदवले आहे.त्यामुळे कामराला अटक करण्याचे महायुती सरकारचे स्वप्न न्यायालयाच्या या निर्णयामुळे भंग पावले आहे.
कुणाल कामरा हा स्टँडअप कॉमेडीयन असून त्याने गेल्या महिन्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक काव्यातून जोरदार टीका केली होती.त्याच्या गाण्याची व्हिडियो क्लिप व्हायरल झाल्यानंतर राज्यात प्रचंड गदारोळ उठला होता.शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी त्याच्या स्टुडिओवर हल्ला चढवत तोडफोड केली होती.तसेच त्याच्या विरोधात अनेक पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आले होते.पण कुणाल कामरा याने तामिळनाडू राज्यात आश्रय घेतल्यामुळे शिंदे गटाच्या शिवसैनिकांची डाळ शिजू शकली नाही.सुरक्षेच्या नावाखाली त्याला मुंबईत येता येणार नाही,असे मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सारंग कोतवाल व न्यायमूर्ती एस.मोडक यांच्या खंडपीठाने सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर आपला निर्णय सुरक्षित ठेवला आहे.मुंबई
पोलिसांनी कामरा याच्या अटकेची मागणी केली होती,पण कामरा याच्या जीवाला धोका असल्यामुळे राज्य सरकारची मागणी खंडपीठाने फेटाळली असून न्यायालयाचा आदेश मिळेपर्यंत त्याला अटक करता येणार नाही,असे स्पष्ट केले आहे.त्यामुळे कामरा याला आता अटक करता येणार नाही.यापूर्वी मद्रास उच्च न्यायालयानेही त्याच्यावर अटकेची कारवाई करता येणार नाही,असे स्पष्ट केले होते.

