- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
Author: दीपक मोहिते
नाशिक प्रतिनिधी नाशिक येथे भव्य रोजगार मेळावा संपन्न, नाशिक पोलीस आयुक्तालय नाशिक शहर व युवाशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे भव्य रोजगार आयोजित करण्यात आला होता.या रोजगार मेळाव्यामध्ये नाशिक,जळगाव,मुंबई,गोवा रत्नागिरी व पुणे,या विभागातील एकूण २२ कंपन्यांतील १ हजार ३२५ रिक्त पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. या मेळाव्यात सहभागी झालेल्या कंपन्यांमध्ये आयटी,ऑटोमोबाईल, फार्मा,कॅपिटल गुड्स,बँकिंग तसेच इतर क्षेत्रातील नोकरीच्या संधी उपलब्ध होत्या.नुकतेच उत्तीर्ण झालेल्या तसेच अनुभवी उमेदवारांसाठी या रोजगार मेळाव्यात नोकरीच्या भरपूर संधी होत्या. मेळाव्यामध्ये सहभागी झालेल्या कंपन्यांनी अप्रेंटिस, ट्रेनी,फिक्स टर्म तसेच कंपनीच्या पे रोलवरील पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. मेळाव्यामध्ये एकूण ५१३ युवक-युवती सहभागी झाले होते.त्यापैकी ४३१ उमेदवारांना वेगवेगळ्या कंपन्याकडून नियुक्तीपत्रे देण्यात…
दीपक मोहिते, पर्यावरणाची ऐसी तैसी, मुंबई कोस्टल रोडसाठी ९ हजार खारफुटींची कत्तल होणार, वर्सोवा ते भाईंदरपर्यंत कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या उद्देशाने मुंबईच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरु होणार आहे.त्यासाठी सुमारे ९ हजार खारफुटीची कत्तल करण्यात येणार आहे.एवढ्या मोठ्याप्रमाणात कत्तल होणार असल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे.सदर बाब चिंता निर्माण करणारी आहे.पण महायुती सरकार विकासाच्या नावाखाली सुरु असलेला धुमाकूळ थांबवायला तयार नाही. राज्यशासनाच्या अधिकृत दस्ताऐवजानुसार,या प्रकल्पामुळे सुमारे ९ हजार खारफुटीची झाडे तोडण्यात येणार आहेत व अतिरिक्त ५१ हजार झाडे प्रभावित होणार आहेत.मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीमुळे शहराच्या शाश्वत शहरी नियोजन व पर्यावरण,या दोन संवेदनशील विषयावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.मुंबई महानगर प्रदेश…
अनंत भोईर,पालघर पालघर येथे शिंदे गटात बॅनर वॉर जोरात, राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक हे लोकदरबार व सुरु असलेल्या विकासकामांची पाहणी करण्यासाठी काल पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्या स्वागतासाठी शिवसेनेच्या स्थानिक नेत्याने तुफान बॅनरबाजी केली होती. जिल्ह्यातील आपल्या पक्षाचे वर्चस्व तसेच युतीमधील घटक पक्षाशी असणाऱ्या स्पर्धेत शिवसेना बॅनरबाजीमध्ये सरस ठरली आहे.पण या बॅनरबाजीमुळे शिंदे गटातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आले आहेत. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक हे सूर्या पाणीपुरवठा योजनेची पाहणी करण्यासाठी आले होते.त्यांनी धामणी धरण व पालघर एसटी विभागीय कार्यालय व आगर या ठिकाणी भेट देऊन नंतर परिवहन मंडळाला दिलेल्या जागेची पाहणी केली.त्यांच्या स्वागतासाठी शिवसेनेच्या लहान मोठ्या नेत्यांनी खानीवडे टोल नाका…
सुरेश वैद्य,पालघर पालघर जिल्हा परिषदेमध्ये क्यूसीआय संस्थेची पाहणी –१०० दिवस कृती कार्यक्रमांतर्गत गुणवत्तेचा घेतला आढावा, १०० दिवस कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने भारत सरकारच्या भारतीय गुणवत्ता परिषद ( क्यूसीआय ) या प्रतिष्ठित संस्थेच्या पथकाने आज पालघर जिल्हा परिषदेला औपचारिक भेट दिली.या भेटीदरम्यान जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्यात आले.जिल्हा परिषद इमारतीमधील व्यायामशाळा, ग्रंथालय,स्वच्छतागृहे, प्रशासकीय कक्ष तसेच इतर मूलभूत सुविधा व सेवांचे बारकाईने परीक्षण करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी या पथकाचे स्वागत केले.तसेच त्यांच्या दालनात पथकासोबत चर्चा केली.यावेळी जिल्हा परिषदेची एकूण कार्यपद्धती,योजना अंमलबजावणी आणि नागरिकांपर्यंत सेवा पोहोचवण्याच्या प्रयत्नांची सविस्तर माहिती दिली. यानंतर झालेल्या बैठकीत विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत अतिरिक्त मुख्य…
दीपक मोहिते, पालघर येथे शिंदे गटातर्फे लोक दरबाराचे आयोजन, गेल्या महिन्यात पालकमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार भरवल्यानंतर काल परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी लोकदरबार आयोजित केला होता.हा लोकदरबार म्हणजे भाजपवर शिंदे गटाकडून कुरघोडी करण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा सर्वत्र सूरू झाली आहे. या लोकदरबारात नागरिक, प्रशासन आणि शासन यांच्यात समन्वय साधून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यासाठी आम्ही लोकदरबार हा लोकाभिमुख उपक्रम सुरू केला आहे,असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले. या लोकदरबारात कु.सानिका घरत या विद्यार्थींनीस आज तत्काळ जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यात आले. नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच तक्रारी अर्जावर तात्काळ निर्णय घेण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या…
सुशील भोईर,वाडा तीव्र पाणीटंचाईवर उपाययोजना करा, ग्रामस्थांचा आक्रोश मोर्चा,प्रशासनाकडून मागण्या मान्य, वसई पूर्व भागात कामण, देवदळ,कोल्ही,चिंचोटी परिसरात दरवर्षी उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होत असते.या ज्वलंत प्रश्नावर नगरसेविका प्रीती दिनेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आजवर अनेक आंदोलने करण्यात आली.मात्र मनपा प्रशासन यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात अपयशी ठरली.यंदाही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे या सर्व गावातील ग्रामस्थांनी माजी नगरसेविका प्रिती दिनेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग ” जी,” कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.यावेळी प्रभाग समितीचे सहा.आयुक्त निलेश म्हात्रे यांनी ग्रामस्थाच्या मागणीनुसार परिसरातील विहीर साफ करून टँकरने पाणीपुरवठा सुरु करणे, ग्रामस्थांच्या मागणीनुसार २६ ठिकाणी बोरिंग ( हातपंप ) मारणे,कामण लघु पाटबंधारे योजना सुरळीत करणे,दलित वस्ती योजना सुरु…
वसंत भोईर,वाडा शंभर रु.त क्विंटलभर गहू स्वच्छ ; थेट दळायला न्यायचं! रब्बी हंगामात गहू काढण्यासाठी शेतकरी आता हार्वेस्टरचा वापर करू लागले आहेत.मजुरावर अवलंबून राहणे,कमी होऊन काढणी प्रक्रिया जलद होऊ लागली आहे.पूर्वी गव्हाची काढणी मजुरांच्या मदतीने करण्यात येत असे.पण आता हार्वेस्टरमुळे ही प्रक्रिया सोपी झाली आहे. गहू फिल्टर करणाऱ्या यंत्रणेचा वापर केला,तर गहू काढणीनंतर गव्हात असणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण ९९ टक्के कमी होते.गहू चांगल्या प्रकारे स्वच्छ होतो. गहू स्वच्छ झाल्यानंतर थेट दळायला नेता येतो. गहू फिल्टर करण्यासाठीचा दर एका पोत्यामध्ये १२० रु.आहे.हार्वेस्टरच्या वापरामुळे गहू पिकाची काढणी कमी खर्चात आणि कमी वेळेत अधिक करता येते. साधारणपणे अर्ध्या तासात एका क्षेत्रातील गहू पिकाची काढणी…
डाकिवली- केळठण रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा शिवसेनेचा आरोप, तालुक्यात वर्दळीचा डाकिवली- केळठण या रस्त्याचे काम सुरू असून या कामात नियमानुसार साहित्य वापरले जात नाही. त्यामुळे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप शिवसेना ( शिंदे गटाचे ) उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी केला आहे. या रस्त्याचे काम करणाऱ्या बोगस ठेकेदार व त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा,अशी मागणी एका निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. डाकीवली-केळठण हा १२ कि.मी.लांबीचा रस्ता असून त्यासाठी भिवंडी ग्रामीणचे आ.शांताराम मोरे यांच्या फंडातून साडेचार कोटीचा निधी मंजूर झाला असून हे काम ओवी कंट्रक्शन या ठेकेदार कंपनीला देण्यात आले आहे.परंतु ठेकेदार एजन्सीने या…
नाशिक प्रतिनिधी, नाशिक येथे गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आंदोलन, दोन वर्षानंतर येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी प्रदूषणमुक्त करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सचिव दिनकर पाटील आणि पदाधिकाऱ्यांनी नाशिकच्या कुंभमेळा स्थळी रामकुंडामध्ये बुडी मारून नाशिक महानगरपालिकेचा निषेध करीत आंदोलन केले. त्र्यंबकेश्वरपासून नाशिकपर्यंत वाहणाऱ्या गोदावरी नदीमध्ये अनेक ठिकाणी प्रदूषण,सांडपाणी व पानवेली यासारखे प्रश्न गंभीर असून गोदावरी प्रदूषण मुक्त करण्याबाबत न्यायालयाने आदेश देऊन आणि पर्यावरणवादी संस्थांनी आंदोलन इशारे देऊन देखील नाशिक महानगरपालिका गोदावरी प्रदूषण मुक्त करण्याबाबत अपयशी ठरत असल्याने आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. आज पदाधिकाऱ्यांनी रामकुंडात गोदावरी नदीमध्ये उड्या मारून महानगरपालिकेच्या आणि प्रशासनाच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. गोदावरीला आता पानवेलीचा…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” बेफाम झालेल्या पोलीस यंत्रणेला सरकारने वेळीच रोखावे,पोलीस यंत्रणेत सुधारणा करावी, गेल्या काही वर्षात आपल्या पोलीस यंत्रणेची प्रकृती प्रचंड ढासळली असून या व्यवस्थेत अक्षरशः बजबजपुरी निर्माण झाली आहे.त्यामुळे लोकांचा या यंत्रणेवरून विश्वास उडत चालला आहे.पोलीस आपल्या पदाचा धाक गुन्हेगारांऐवजी सामान्य नागरिकाना दाखवण्यात धन्यता मानत आहेत.तसेच आचारसंहितेचे उल्लंघन करत त्यांच्याकडून होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सतत वाढत आहेत.अशात पोलीस व राजकारणी,अशी साखळी निर्माण झाल्यामुळे समाजात या दोघांविषयी प्रचंड चीड व संताप व्यक्त करण्यात येत आहे. देश व राज्यात पोलीस अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे पोलीस यंत्रणा व रचनेमध्ये सुधारणा ( रिफॉर्मस ) करण्याची आवश्यकता आहे.सचिन वाझे,प्रदीप शर्मा अशा अनेक…
