Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, फ्रंटलाईन, अपेक्षेप्रमाणे सेनेचे रविंद्र फाटक यांनी बाजी मारली, ठाणे – पालघर विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे रविंद्र फाटक हे प्रचंड मतांनी निवडून येतील, असा अंदाज होता. पण त्यांची निवड बिनविरोध होईल,असे कोणालाही वाटले नव्हते. शिवसेनेला ही जागा मिळावी, यासाठी एकनाथ शिंदे यांनी केलेले प्रयत्न स्तुत्य असेच होते.त्यांनी वनमंत्री गणेश नाईक व भाजपचे आ. संजय केळकर या दोघांना धोबीपछाड देत,ही जागा आपल्या पदरात पाडली. या सर्व घडामोडीनंतर ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी शिंदे यांनी आपली राजकीय ताकद जी पणाला लावली ती नक्कीच अभिनंदनास पात्र आहे. निवडणुकीपूर्वी पालघर जिल्ह्यात अनेक वावड्या उठल्या व अफवांचे अमाप पीक आले होते. त्यामध्ये अनेक युट्युब…

Read More

दीपक मोहिते, वेळीच सावध व्हा, अन्यथा विनाश अटळ… आज जागतिक पर्यावरण दिन, जगभरात हा दिन दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.काही वर्षांपूर्वी विकासाच्या नावाखाली वसुंधराचे अपरिमित हानी होत असल्याचे दिसून आल्यामुळे सन् १९७२ साली स्वीडन देशाची राजधानी स्टॉकहोम येथे याविषयी एका परिषदेचे आयोजन करण्यात आले. तेव्हापासून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पर्यावरणप्रेमी मान्यवरांनी केलेला हा प्रयत्न स्तुत्य असला तरी गेल्या ५४ वर्षात या महत्वाच्या विषयी किती काम झाले ? याचा लेखा-जोगा मांडणे मला गरजेचे वाटले, म्हणून हा लेख प्रपंच करत आहे. तप्त वातावरण,भुगर्भातील पाण्याची पातळी सतत खालावणे, अवेळी पाऊस पडणे, तप्त वातावरणामुळे जलसाठ्यातील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” अन्यायाविरोधात तरुणांनी पेटून उठायला हवे, राजकारणात सर्वसामान्य कार्यकर्त्याला काडीची किंमत नसते, अशी चर्चा सतत होत असते. त्यांची गरज केवळ सतरंज्या उचलणे, नेते मंडळींची खरकटी व उष्टी उचलणे या कामासाठी असते. हे आपण सतत अनुभवत असतो. निवडणूकीसाठी उमेदवारी देणे किंवा लाभाचे पद देताना मंत्री, खासदार, आमदार व पक्षाचे वरिष्ठ नेते यांची मुले, नातेवाईक व मित्रमंडळी यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरण्यात येत असते. वर्षानुवर्षे हे असेच चालत आल्यामुळे पक्षात डावलल्या गेलेल्या एका कार्यकर्त्याने सोशल मीडियावर आपल्या मनातील खदखदीला मोकळी वाट करून दिली आहे. ते आपल्या पोस्टमध्ये काय म्हणतात ते पहा, त्यांच्या पोस्टचे शीर्षक आहे, ” कार्यकर्त्यांनी करायचं काय ?”…

Read More

दीपक मोहिते, चबाहर बंदर व टॅरिफ ; भारताचे परराष्ट्र धोरण चांगलेच अंगलट, अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपले मित्र असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कितीही दावे करत असले तरी अमेरिका गेल्या सहा महिन्यांपासून भारताची आर्थिक कोंडी करण्याची एकही संधी सोडत नाही. मध्यंतरी आपण रशियाकडून कच्चे तेल खरेदी करू लागल्यामुळे ट्रम्प यांनी आपल्या विरोधात ५० टक्के टॅरिफचे हत्यार उपसले. त्यामुळे आपल्या निर्यातीवर त्याचा चांगलाच परिणाम जाणवू लागला आहे. डोनाल्ड ट्रम्प एवढे करून थांबले नाहीत, तर सध्या सुरू असलेल्या युद्धात त्यांनी इराणमधील चबाहर या महत्वाकांक्षी बंदर परिसरात प्रखर बॉम्बहल्ले चढवले. हे बंदर, भारत व इराण संयुक्तपणे उभारत आहेत. या बंदराच्या उभारणीसाठी भारताने अब्जावधी…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” रविंद्र फाटक यांना वसईत पैकीच्या पैकी मतदान होऊ शकते, ठाणे – पालघर विधान परिषद जागेसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावली व ती आपल्या पदरात पाडून घेतली. पालघर व ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात ” आपणच दादा आहोत,” हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. आपले पारंपारिक राजकीय शत्रू असलेले वनमंत्री गणेश नाईक व ठाण्याचे आ. संजय केळकर या दोघांचे त्यांच्यासमोर मात्रा न चालल्यामुळे या दोन्ही जिल्ह्यावर त्यांचे निर्विवाद राजकीय वर्चस्व निर्माण झाले आहे. तरीही त्यांना बेसावध राहून चालणार नाही.पालघर,बोईसर या दोन तालुक्यात त्यांच्या पक्षाची चांगली बांधणी आहे. मात्र वसई तालुका,तलासरी, विक्रमगड या…

Read More

दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन, ” महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करण्याचे संकेत मिळत आहेत, समान नागरी कायदा महाराष्ट्रात लवकरात लवकर लागू होण्याची शक्यता आहे. यापूर्वी उत्तराखंड व आता गुजरात व आसाम या तीन राज्यांनी हा कायदा लागू केल्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत महाराष्ट्रही तो लागू करण्याच्या तयारीत आहे. तसे संकेत मिळू लागले आहेत. भाजपच्या जाहीरनाम्यात समान नागरी कायदा लागू करण्याचं आश्वासन देण्यात आले होते. भाजपनं जाहीरनाम्यात म्हटलंय की, ” भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ४४ मध्ये राज्याच्या धोरणाचे मार्गदर्शक तत्त्व म्हणून सामान नागरिक कायद्याचा समावेश केला आहे. भाजप असं मानतो की जोपर्यंत भारतात समान नागरी संहिता लागू होत नाही, तोपर्यंत महिलांना समान…

Read More

दीपक मोहिते, फ्रंटलाईन, महायुती सर्वच्या सर्व जागा जिंकणार, विधान परिषदेच्या १७ जागासाठी २२ जून रोजी होणाऱ्या निवडणुकीचे जागावाटप पूर्ण झाले असून महायुतीमधील भाजप,शिवसेना ( शिंदे गट ) व राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.गट ) या तीन प्रमुख पक्षांनी एकेक पाऊल मागे घेत ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. भाजप – ११,शिवसेना ( शिंदे गट ) – ०४ व राष्ट्रवादी काँग्रेस ( अ.प. गट ) – ०२ ,असे जागावाटप झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या जागावाटपासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला सात जागा मिळाल्या हव्या, अशी मागणी करत दिल्ली गाठली होती. पण गृहमंत्री अमित शहा यांनी धुर्तपणे चर्चेचा चेंडू मुख्यमंत्री…

Read More

दीपक मोहिते, फ्रंटलाईन, अखेर शांतता करार दृष्टिक्षेपात, अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराचा अंतिम मसुदा तयार झाला आहे, पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हेकेखोरपणामुळे उभय देशात होणाऱ्या सामंजस्य करारावर आता चर्चा अधून मधून खंडित होत असते.पण इराणच्या कडवट भूमिकेमुळे डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान बरेचसे खाली आले आहे.त्यामुळे शांतता करार अंतिम टप्यात आल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमानी स्पष्ट केले आहे इराणी माध्यमांच्या वृत्तानुसार, होर्मुझ सामुद्रधुनीतील नाकेबंदी हटवून भागात शांतात आणि स्थैर्य निर्माण, यासाठी ट्रम्प यांनी आता प्रशासनाला कराराची चर्चा अंतिम टप्याकडे नेण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्डमार्शल असीम मुनीर या प्रकरणी महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीमधील वाहतूक ३० दिवसांत…

Read More

दीपक मोहिते, कृषी पर्यटन तरुणांना वरदान ठरू शकते, समुद्रकिनारी वसलेला पालघर जिल्हा हा निसर्गरम्य जिल्हा असून शेती, बागायती व विपुल वनसंपदा असलेल्या जिल्ह्यात आता नागरीकरणाला चांगला वेग आला आहे. नागरी, डोंगरी व समुद्री अशा तीन भागात विखुरलेला असा हा जिल्हा आहे. जिल्ह्यातील भूमिपुत्र हे भातशेती व बागायती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असतात. मात्र,गेल्या काही वर्षात पावसाचा लहरीपणा, बदलते हवामान,अवकाळी पाऊस व पर्जन्यमानाचे प्रमाण उतरणीवर जाणे, आदी कारणामुळे भूमीपुत्राची मुले शेती व बागायती व्यवसायात आपले नशीब आजमवण्या ऐवजी इतर व्यवसायात स्थिरावू लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कृषीक्षेत्र आता दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. अनेक तरुण आता रिसॉर्टस व फार्महाऊस या व्यवसायात…

Read More

दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन, ” सर्वसामान्य माणसाला जगणं कठीण झालंय, भारतीय राजकारणांच्या इतिहासात गेल्या १२ वर्षांचा काळ हा अनेक राजकीय घडामोडी, उलथापालथी, साधनशूचिता व अशांततेचा काळ म्हणून ओळखला गेला. ” सत्तेसाठी काय पन, ” ही नवीन विचारधारा उदयाला आली, सत्तांतर झाले, लोकांना वाटले होते की, आपल्याला ” अच्छे दिन, ” येतील. पण प्रत्यक्षात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न बाजूला पडले. मूठभर धनदांडग्याच्या हितासाठी राबणारे सरकार तुमच्या आमच्या नशिबी आले. खरेदी विक्रीच्या प्रक्रियेत विक्रीला महत्व येत गेले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समाजातील शेवटच्या माणसाला केंद्रस्थानी ठेवून देशाच्या विकासाचा गाडा पुढे नेण्याचे जे स्वप्न आपल्या नेत्यांनी त्याकाळी उराशी बाळगले होते, त्याला तडा गेला. १९७५ ते १९८०…

Read More