- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ७५ वर्षानंतर आम्ही कुठे आहोत ? आपला देश प्रजासत्ताक होवुन ७५ वर्षाचा काळ लोटला असून यंदाचे हे वर्ष अमृतमहोत्सवी वर्ष आहे.दिवसरात्र मेहनत व अभ्यास करून तयार करण्यात आलेली राज्यघटना आता स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडताना दिसू लागली आहे.७५ वर्षांपूर्वी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदु ठेवून ही घटना तयार करण्यात आली,पण गेल्या सात दशकात हा सर्वसामान्य माणूस हरवला गेला.आपली राज्यघटना ही जगात सर्वात श्रेष्ठ राज्यघटना असून तिचा जगभरात नावलौकिक आहे.आपल्या राज्यघटनेसारखी जगभरात कोणत्याही देशाची इतकी परिपूर्ण राज्यघटना नाही.घटनाकरानी राज्यघटना तयार करण्यासाठी घेतलेली मेहनत खरोख़रच कौतुकास्पद आहे.अठरापगड़ जाती-जमाती,पोटजमाती व विविध धर्माचा समावेश असलेल्या देशातील सर्व वंचित घटकाना न्याय देणे, हे महत्वाचे काम घटनाकारानी रात्रंदिवस…
जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे तालुकास्तरीय शेतकरी मार्गदर्शन व पशुपालक प्रशिक्षण शिबिर संपन्न, जव्हार तालुक्यातील मौजे कशिवली नं.२ ( जुनी जव्हार ) येथे जिल्हा परिषद पालघर व पंचायत समिती जव्हार,यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शेतकरी मार्गदर्शन शिबीर व पशुपालक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद पालघरचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती संदिप पावडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.तर अध्यक्षीय स्थान पंचायत समिती जव्हारच्या सभापती विजयाताई लहारे यांनी भूषवले.यावेळी पंचायत समिती जव्हार गटविकास अधिकारी दत्तात्रय चित्ते,सहा. गटविकास अधिकारी संदेश दुमाडा,जुनीजव्हार ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच निलेश भोये,उपसरपंच संजय भोये,वाळवंडा सोसायटीचे चेअरमन दैनात लहारे,पेसा समिती अध्यक्ष राजू भोये,विभागप्रमुख अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी…
सुरेश काटे,तलासरी राजभवन येथे दादरा नगर हवेली आणि दीव दमणचा निर्मिती दिन संपन्न, मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागाने राजभवन येथे उत्तर प्रदेश,दादरा नगरहवेली आणि दीव दमण निर्मिती दिवसनिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये कॉ. गोदावरी शामराव पुरुळेकर महाविद्यालय तलासरीच्या विद्यार्थ्यांनी तारपा नृत्य सादर केले.तसेच वाडा येथील महाविद्यालय व विद्यापीठाचे काही विद्यार्थ्यांनी देखील विविध कार्यक्रमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले. राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन विद्यार्थ्यांचे कौतुक करताना म्हणाले, ” एक तारपा व एक काठी, ” च्या माध्यमातून एक मोठा समूह सुंदर नृत्य करू शकतो,” हे अप्रतिम आहे.त्यांनी यावेळी सर्वच उपक्रमांची कौतुक केले व कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालयाच्या १७ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित…
संजय लांडगे,वाडा, अखेर वाडा बस स्थानकाच्या दुरुस्तीचे काम सुरु, वाडा एसटी आगार येथे काँक्रिटीकरण करण्यासाठी आजपासून खोदकाम सुरु केले असून हे काम महिनाभर चालेल,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.हे काम पूर्ण होईपर्यंत सर्व बसेस नवीन स्थानकातून सुटणार आहेत.त्यामुळे विद्यार्थी व सर्व प्रवाशांना बस पकडण्यासाठी कोर्टासमोरील बस स्थानकाकडे धाव घ्यावी लागत आहे.पहिल्याच दिवशी अनेक विद्यार्थी बस पकडण्यासाठी महामार्गांवरून चालत जाताना दिसत होते. खंडेश्वरी नाका येथे एक उपपीक पॉईंट ठेवणार होते. मात्र पहिल्या दिवशी असे काही दिसून आले नाही. खंडेश्वरी नाका येथे पीक-अप पॉईंट असेल तर दोन्ही बाजुला जाणाऱ्या प्रवाशांसाठी तात्पुरती शेड बांधणे आवश्यक असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहॆ.
अनिल वैद्य,नाशिक, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तीनाथाचे दर्शन घेतले, श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथे निवृत्तीनाथ महाराज पौषवारी तीन दिवसीय महोत्सवाचा ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शासकीय पूजेने शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्रंबकेश्वरमध्ये लाखो वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळाली.भगव्या पताका घेऊन चालणाऱ्या वारकऱ्यांमुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही निवृत्तीनाथ मंदिरात जाऊन घेतले.निवृत्तीनाथाचे दर्शन घेण्यासाठी निवृत्तीनाथ मंदिरात जाणारे पहिले गृहमंत्री म्हणून अमित शहा यांचा इतिहासात नोंद झाली आहॆ. ” निवृत्ती नामाचा निज छंद एका जनार्दनी आनंद,” या अभंगाची अनुभूती त्रंबकेश्वर येथे पौषवारी अर्थात निवृत्तीनाथ संजीवन समाधी सोहळा यात्रेनिमित्त आलेल्या लाखो वारकऱ्यांना झाली. पौषवद्य एकादशी अर्थात षटतीला संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांनी…
अनंत भोईर,पालघर, मतदारांनी मतदानाच्या अधिकाराचा वापर करावा – जिल्हाधिकारी बोडके, मतदान हा आपला महत्त्वाचा हक्क, अधिकार आहे. त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने प्राधान्याने करावा आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडावे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवन येथे केले. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे,निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे,निवडणूक उपजिल्हाधिकारी रवींद्र हजारे,उपजिल्हाधिकारी विजया जाधव,महेश सागर, तेजस चव्हाण तसेच वरिष्ठ अधिकारी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते. जिल्हाधिकारी गोविद बोडके म्हणाले की,भारतीय निवडणूक आयोगाची २५ जानेवारी १९५० रोजी स्थापना झाली.तेव्हापासून २५ जाने.हा दिवस राष्टीय मतदार दिवस साजरा करण्यात येतो.गेल्या काही वर्षांपासून…
जव्हार प्रतिनिधी, शिवम चौधरीचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील यश : देहेरे आश्रम शाळेचा गौरव, शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा,देहेरे येथील ११ वीचा विद्यार्थी शिवम विलास चौधरी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर शाळेचा आणि देशाचा गौरव वाढवला आहे. अमेरिकेतील ” Kindness Grows हेरे,” संस्थेच्या माध्यमातून आयोजित ” Kids Kindness Project,” मध्ये शिवमने ” From Darkness to लीगत,” हा प्रकल्प सादर केला.या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आदिवासी भागातील मुलांना अभ्यासासाठी सोलर लॅम्प्स उपलब्ध करून देणे,हा आहे. या प्रकल्पासाठी एकूण २८२ अर्ज आले होते, त्यापैकी फक्त ४७ प्रकल्पांची निवड करण्यात आली.विशेष म्हणजे, भारतातून फक्त शिवमच्या प्रकल्पाची निवड झाली असून,तो या उपक्रमासाठी अनुदान मिळवणारा भारतातील एकमेव विद्यार्थी…
सुशीला फातरपेकर,नालासोपारा नालासोपारा येथे ९ फेब्रु.रोजी फनस्ट्रीटचे आयोजन, मोबाईल आणि संगणकाच्या युगात दिवसें दिवस मैदानी खेळाकडे लहान मुलांसह तरुणांचा कल कमी होताना दिसत आहे.यासाठी नागरिकांना बालपणातील त्यांनी खेळलेल्या सर्व खेळाचा आनंद घेता यावा,त्यांच्यात खेळ व व्यायामाची आवड निर्माण व्हावी यासाठी वसई विरार शहर महानगरपालिका विविध सेवाभावी संस्थांच्या मदतीने ” फनस्ट्रीट,” या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. या उपक्रमांर्तगत एकाच ठिकाणी अनेक पारंपारिक व इतर खेळात सहभागी होण्याची संधी उपलब्ध होत असून या फनस्ट्रीटच्या आयोजनामुळे वसई विरार शहरामधील नागरिकांना, विद्यार्थ्यांना त्यांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी व त्यांच्या मध्ये खेळांची तसेच विविध मैदानी खेळासह इतर खेळांची आवड निर्माण होण्यास मदत होणार आहे. या फनस्ट्रीटमध्ये…
सुशीला फातरपेकर,नालासोपारा नालासोपारा येथे ९ फेब्रु.रोजी फनस्ट्रीटचे आयोजन, मोबाईल आणि संगणकाच्या युगात दिवसें दिवस मैदानी खेळाकडे लहान मुलांसह तरुणांचा कल कमी होताना दिसत आहे.यासाठी नागरिकांना बालपणातील त्यांनी खेळलेल्या सर्व खेळाचा आनंद घेता यावा,त्यांच्यात खेळ व व्यायामाची आवड निर्माण व्हावी यासाठी वसई विरार शहर महानगरपालिका विविध सेवाभावी संस्थांच्या मदतीने ” फनस्ट्रीट,” या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. या उपक्रमांर्तगत एकाच ठिकाणी अनेक पारंपारिक व इतर खेळात सहभागी होण्याची संधी उपलब्ध होत असून या फनस्ट्रीटच्या आयोजनामुळे वसई विरार शहरामधील नागरिकांना, विद्यार्थ्यांना त्यांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी व त्यांच्या मध्ये खेळांची तसेच विविध मैदानी खेळासह इतर खेळांची आवड निर्माण होण्यास मदत होणार आहे. या फनस्ट्रीटमध्ये…
दीपक मोहीते, स्वच्छ भारत अभियानाची ग्रामीण भागात होणार प्रभावी अंमलबजावणी, जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून अनेक गावे स्वच्छतेच्या बाबतीत आदर्श होत आहेत. जिल्ह्यातील ४७३ ग्रामपंचायतींमधील ८९८ गावांपैकी ७०३ गावे ओडीएफ प्लस मॉडेल झाली आहेत. १५ व्या वित्त आयोगातील बंधित निधीमधून जास्तीत जास्त निधी स्वच्छतेच्या कामावर खर्च करण्याचे निर्देश पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी यांना दिले आहेत.तसेच तालुका स्तरीय प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू करण्यात यावेत,तसेच गावापातळीवर स्वच्छतेच्या सुविधा कार्यरत राहण्यासाठी देखाभाल दुरुस्तीकरीता प्राधान्य द्यावे,अन्यथा कारवाई करण्यात येईल.अशी तंबीदेखील यावेळी अधिकारी वर्गाला दिली. स्वच्छ भारत मिशन ( ग्रा.) चा…
