जव्हार प्रतिनिधी,
आदिवासी मुलींच्या शासकीय वसतीगृहात शिवजयंती उत्साहात साजरी.
आज आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह, नवीन जव्हार येथे शिवजयंती उत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी विविध सांस्कृतिक आणि स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात रांगोळी स्पर्धा,वकृत्व स्पर्धा,गीतगायन स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेने झाली. विद्यार्थीनींनी या सर्व स्पर्धांमध्ये अतिशय उत्साहाने भाग घेतला आणि सुंदर रांगोळ्या काढून,चित्रांद्वारे शिवचरित्राचे दर्शन घडवले.शिवजयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख वक्त्यांमध्ये शिवश्री कृष्णा मुरमे,मनोज कामडी आणि प्रतिभा मुरमे यांनी विद्यार्थिनींना छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन,विचार आणि शौर्य यावर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. राणी दिनेश गावीत हीने उत्कृष्ट पद्धतीने केले.कु. नेहाली विजय राऊत हिने माँसाहेब जिजाऊ यांची वेषभूषा करून त्यांचे महत्त्व अधोरेखित केले.सन २०२४-२५ या वर्षाचा स्टुडंट ऑफ द इयर,हा पुरस्कार कु. राणी दिनेश गावीत हिला देण्यात आला.तिच्या कर्तृत्वाचा गौरव करून तिचे अभिनंदन करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसतीगृहाच्या गृहपाल पुष्पा विश्वनाथ जाधव,राजु राठोड,दामु भोये, गणेश पाटील,लक्ष्मण गावित, भगवान जाबर आणि सविता गवारी यांनी विशेष मेहनत घेतली.या कार्यक्रमामुळे वसतीगृहात एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थिनींना शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा मिळाली.

