सुरेश काटे, तलासरी
तलासरी येथे शिवजयंती उत्साहात साजरी,
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तलासरीत मोठ्या उत्सहात शिवप्रेमी नागरिकांतर्फे साजरी करण्यात आली.

आज सकाळी ११. ०० वाजता श्रीराम मंदिरापासून मिरवणूकीला सुरुवात करण्यात आली.यावेळी तलासरी तहसीलदार अमोल पाठक,माजी आ.श्रीनिवास वनगा,पोलीस निरीक्षक विजय मूतदक,नगराधक्ष सुरेश भोये, तलासरी नगरपंचायतचे नगर सेवक,विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक,उपस्थित होते,यात बाल शिवाजीची
वेषभुषा केलेली बालके तसेच शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेला आश्वारुढ कलाकार,हे मिरवणूकीचे विशेष आकर्षण होते,
मिरवणूकीची सुरुवात श्रीराम मंदिर पासून सुरु होऊन बाजार पेठेतून तलासरी नाका, सुतारपाडा येथून तलासरी नाका उड्डाणपुलाखाली तीची सांगता झाली.

