शुभम सावंत विरार,
विरारमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी,
राजा छत्रपती शिवाजी चौक विरार पश्चिम येथे सकाळी ८. ०० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून सुरू झालेल्या या शिवजयंती उत्सवामध्ये शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पोवाडे शिवगर्जना आदींनी येथील वातावरण शिवमय झाले होते.शिवरायांचा लढा हा मानवतेच्या हक्कासाठी व न्यायासाठी होता.राज्यातील शेतकरी,महिला व समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते लढले व हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे थोर चरित्र हे आपल्या सर्वांसाठी महान आदर्श आहे,असे प्रतिपादन यावेळी महापौर राजीव पाटील यांनी केले.या समारंभाला माजी नगरसेवक व स्थायी समिती सभापती अजीव पाटील व माजी नगरसेवक विलासबंधू चोरघे,माजी नगरसेवक हार्दिक राऊत,माजी नगरसेविका सिमा काळे,माजी सभापती नगरसेवक सखाराम महाडिक, माजी नगरसेवक नयन जैन, राजेश बक्षी,भुषण चुरी, महानगरपालिका सहाय्यक आयुक्त श्रीम.काळे, के.पी.पाटील विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थी व शिक्षकवृंद आणि विरार भागातील नागरिक मोठ्या संख्येने या समारंभाला उपस्थित होते.

