जव्हार प्रतीनिधी
जव्हार नांदगाव येथे शिवजयंती निमित्त अनोखा उपक्रम,
आज मौजे नांदगाव- जव्हार,येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त आदिवासी उत्सव समिती, ग्रामस्थ आणि महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) संयुक्त विद्यमाने एक विशेष उपक्रम राबवण्यात आला.
रोजगार हमी योजनेच्या कामाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाला पंचायत समिती, जव्हारचे रोहयो अधिकारी राहुल भोये,ग्रामपंचायत सरपंच रमेश कोरडे,पोलीस पाटील सुनंदा गवारी,रोजगार सेवक सुदाम मिसाळ, ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ आणि रोजगार हमी मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे मुख्य प्रवर्तक भास्कर गवारी,हणुमंत देहाडे, गणेश गवारी यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमातून ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नवा आदर्श निर्माण करण्यात आला आहे.कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांचे स्मरण करून त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला.या उत्साहपूर्ण
उपक्रमाने संपूर्ण नांदगाव परिसरात स्फूर्ती आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण केले आहे.

