Author: दीपक मोहिते

आशिष देशपांडे,मुंबई नक्की खरं काय ? आणि खोटं कोण बोलतंय ? मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले आहे.मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या ९८ हजार कोटी रु.च्या मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवींवर शिंदे सरकारने डल्ला मारल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधकांच्या या आरोपानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर येऊन घाईघाईने खुलासा केला,पण तो मुंबईकरांना पटलेला नाही.या ठेवी आता ९ हजार कोटीवर आल्याचे स्पष्ट होत आहे. शिक्षण,आरोग्य,उद्याने, धरणे,रस्ते,कोस्टल रोड,या सहा विकासकामांपैकी रस्ते व कोस्टल रोड,या दोन विकासकामांवर गेल्या तीन वर्षात प्रचंड खर्च करण्यात आला आहे.यामध्ये सत्ताधारी,अधिकारी व ठेकेदार यांचे उखळ चांगलेच पांढरे झाले आहे.ही जी लूट झाली आहे,ती प्रशासकीय…

Read More

बोईसर प्रतिनिधी, चुकून झाडलेल्या गोळीने साथीदाराचा बळी ; आठ जण अटकेत ,दोन जण फरार, पालघर तालुक्यातील बोरशेती जंगलात अवैध शिकारीदरम्यान झालेल्या गोळीबारात एका शिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. २९ जाने.रोजी पहाटे, रानडुकराच्या शिकारीसाठी जंगलात गेलेल्या टोळीतील एका सदस्याच्या बंदुकीतून चुकून झाडलेल्या गोळीने रमेश वरठा (वय ६० रा. बोरशेती ) यांचा जागीच मृत्यू झाला.त्यानंतर त्यांचा मृतदेह झुडुपांत लपवून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र,पोलिसांच्या तपासातून ही घटना उघडकीस आली असून,या प्रकरणी आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. २८ जाने.रोजी आठ ते दहा जणांनी बोरशेती जंगलातील आंब्याच्या पाणी भागात रानडुकराच्या शिकारीचे नियोजन केले होते. शिकाऱ्यांनी बंदुका घेऊन डोंगराच्या कड्यावर आणि झाडांवर ठाण मांडले…

Read More

सुशील जोशी,पालघर पालघर जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न, पालघर जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करताना पालघर जिल्ह्यातील सर्व विकास यंत्रणांनी लोकोपयोगी कामे तातडीने करावीत.अशा सूचना वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी संबंधित शासकीय अधिकारी यांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिल्या. वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक काल सकाळी ११.०० वाजता लोकशाहीर आत्माराम पाटील नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे झाली.सदर बैठकीस जि.प.अध्यक्ष प्रकाश निकम,खा.सुरेश म्हात्रे,आ.ॲड.निरंजन डावखरे,आ.राजेंद्र गावित, आ.दौलत दरोडा, आ.विलास तरे,आ.विनोद निकोले,आ.हरिश्चंद्र भोये, आ.स्नेहा दुबे-पंडित,आ. राजन नाईक, जिल्हाधिकारी गोविंद बोडके,पोलीस आयुक्त मिरा-भाईंदर, वसई-विरार मधुकर पाण्डेय,अति. आयुक्त एमएमआरडीए राधाबिनोद शर्मा,जि. प.मुख्य कार्यकारी अधिकारी…

Read More

दीपक मोहिते, ” परिवर्तन,” दिल्लीचे तख्त ; भाजप काबीज करण्याची शक्यता, सुमारे २७ वर्षानंतर भाजपला दिल्लीचे तख्त मिळण्याची शक्यता आहे. विविध एक्झिट पोल्सनी भाजपला काठावरचे बहुमत मिळेल,असा अंदाज व्यक्त केला आहे.चाणक्य या एक्झिट पोल एजन्सीने भाजपला ३९ – ४४ पर्यंत तर मॅट्रिझने ३५ – ४० जागा मिळतील,असा अंदाज व्यक्त केला आहे.तर आम आदमी पार्टीची मजल ३२ – ३७ पर्यंत जाऊ शकते,असे म्हंटले आहे.त्यामुळे निकालानंतर घोडेबाजाराला उत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला केवळ ३ जागा मिळू शकतील,अशी शक्यता चाणक्यने व्यक्त केली आहे.भाजपला जर काठावरचे बहुमत मिळाल्यास भाजप ” मिशन लोटस,” राबवेल.ऐन निवडणुकीच्या धामधुमीत भाजपने आम आदमी पार्टीला भगदाड…

Read More

वाडा येथील स्फोटाप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी, वाडा तालुक्यातील वडवली येथील मे.एम.डी.पायरोलीसीस एल.एल.पी कंपनीत गेल्या आठवड्यात स्फोट होवून दोन मुलींना प्राण गमावावा लागला आहे,तर इतर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.या घटनेला कंपनी व्यवस्थापक व मालक जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी.तसेच पिडीत आणि मयत झालेल्या मुलांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी( अ ) ऑफ इंडियाचे सचिव रमेश भोईर यांनी केली आहे. वाड्याचे तहसीलदार यांना भोईर यांनी दिलेल्या निवेदनातून कंपनीत काम करणारे परमार कुटूंबियातील पाच ते सहा सदस्यांना गंभीर स्वरूपाच्या दुखापती होवून काही लोकं अत्यवस्थ आहेत.त्यामधील लहान मुलांपैकी काजोल परमार ( वय ३ वर्षे ),…

Read More

अनंत भोईर,पालघर आभासी पद्धतीने उपकेंद्र आणि आदर्श शाळांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, आज पालकमंत्री पालघर जिल्हा तथा महाराष्ट्र राज्य वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते आभासी पद्धतीने जिल्ह्यातील उपकेंद्र आणि आदर्श शाळांचे उद्घाटन करण्यात आले. आज जिल्हा नियोजन समितीच्या सभे दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय येथून हे उद्घाटन करण्यात आले. सातपाटी येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी निवास्थान इमारत, प्राथमिक आरोग्य केंद्र मलवाडा येथे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी निवासस्थान इमारत, मौजे इंदगाव येथे ता. विक्रमगड येथील उपकेंद्र इमारत, मौजे विजयनगर ता.जव्हार येथील उपकेंद्र इमारत, मौजे खैरे-अंबिवली ता.वाडा येथील उपकेंद्र इमारतींचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम,भिवंडीचे खा.सुरेश म्हात्रे,आ.निरंजन डावखरे, दौलत दरोडा,स्नेहा दुबे…

Read More

सुशील भोईर,वसई रोड, जीवन विकास नागरी सहकारी पतसंस्था ” ब्ल्यू रिबन २०२४, पुरस्काराने सन्मानित, वसईतील नामवंत पतसंस्था जीवन विकास नागरी सहकारी पतसंस्थेला बँको या संस्थेतर्फे ब्ल्यू रिबन २०२४ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ३५० ते ४०० कोटी रू.च्या ठेवी असलेल्या पतसंस्थेच्या वर्गवारीत गुणवत्तापूर्वक काम केल्याबद्दल हा पुरस्कार जीवन विकास नागरी पतसंस्थेला प्राप्त झाला आहे. या विभागात पुरस्कार प्राप्त करणारी कोकण विभागातील जीवन विकास नागरी सहकारी ही एकमेव पतसंस्था आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या पुरस्कारामुळे जीविका पतसंस्थेच्या वाटचालीत आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. अँम्बे व्हॅली,लोणावळा येथे झालेल्या “…

Read More

सचिन परब, वसई शिवसेनेच्या ( उबाठा ) तालुकप्रमुखपदी काकासाहेब मोटे, वसई पंचायत समितीचे माजी सदस्य व निष्ठावान शिवसैनिक,अशी ओळख असलेल्या काकासाहेब मोटे यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वसई तालुकाप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. शिवसेना नेते कै.आनंद दिघे व कै.वसंत वैती यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले काकासाहेब मोटे हे गेली वीस वर्षे समाजकारण व राजकारणात सक्रिय आहेत.वसई पूर्व भागात शिवसेना वाढीसाठी त्यांनी कै.वसंत वैती यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले.२००७ साली त्यांनी गोखीवरे गणातून वसई पंचायत समितीची निवडणूक लढवली व दणदणीत विजय मिळवला होता.बोईसर विधानसभेचा जो भाग वसई तालुक्यात समाविष्ट आहे.त्या विभागाच्या शहरी व ग्रामीण भागाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.त्यांच्या…

Read More

पालघर प्रतिनिधी, समाज कसा आहे,याविषयी शांतपणे संशोधन करायला हवं – डॉ.मिलिंद बोकील, ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि समाजशास्रज्ञ डॉ. मिलिंद बोकील यांनी ” इरावती कर्वे : भारतीय मानवशास्त्राच्या प्रांगणातील आद्य दीपमाळ,” या प्रा.प्रतिभा कणेकर लिखित पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी उदगार काढले. पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात झालेल्या प्रकाशन सोहोळा प्रसंगी ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले,प्रतिभाताई यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना मला अतिशय आनंद होतोय, कारण एका मराठीच्या प्राध्यापिकेने समाजशास्राच्या दुसर्‍या प्राध्यापिकेचे चरित्र लिहिणं,ही वेगळी व अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.निवृत्त झाल्यानंतर पाच-दहा वर्षांनी सुद्धा एखादं पुस्तक लिहिता येतं,हे प्रतिभार्ताइंनी दाखवून दिलं आहे.चरित्र लिखाण ही महत्त्वाची गोष्ट आहे. प्रतिभार्ताइंनी रसाळ आणि ओघवत्या भाषेत इरावती…

Read More

दीपक मोहिते, दिल्ली विधानसभा निवडणूक : सकाळपासूनच मतदानाला वेग, आज सकाळी सात वाजल्यापासून दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे.एकूण ७० जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत १३ हजार ७६६ मतदानकेंद्रावर सुमारे १ कोटी ५६ लाख मतदार आपला हक्क बजावणार आहेत.एकूण ६९९ उमेदवार रिंगणात असून भाजप व आम आदमी पार्टी,या दोन तुल्यबळ पक्षात सरळ लढत होत आहे.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस देखील रिंगणात आहे,पण या पक्षाचा फारसा प्रभाव पाहायला मिळत नाही. दिल्लीची राजसत्ता खेचून आणण्यासाठी भाजप पूर्ण तयारीनिशी रिंगणात उतरला आहे.तर आम आदमी पार्टीही तेवढ्याच ताकदीने त्यांना रोखण्यासाठी सज्ज झाली आहॆ. मतदानाच्या वेळी संघर्ष होण्याची शक्यता गृहीत धरून निवडणूक आयोगाने अर्धसैनिकांच्या २२०,दिल्ली पोलिसांचे ३५…

Read More