अनंत भोईर,पालघर
आभासी पद्धतीने उपकेंद्र आणि आदर्श शाळांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन,
आज पालकमंत्री पालघर जिल्हा तथा महाराष्ट्र राज्य वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते आभासी पद्धतीने जिल्ह्यातील उपकेंद्र आणि आदर्श शाळांचे उद्घाटन करण्यात आले.
आज जिल्हा नियोजन समितीच्या सभे दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय येथून हे उद्घाटन करण्यात आले.
सातपाटी येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी निवास्थान इमारत,
प्राथमिक आरोग्य केंद्र मलवाडा येथे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी निवासस्थान इमारत,
मौजे इंदगाव येथे ता. विक्रमगड येथील उपकेंद्र इमारत,
मौजे विजयनगर ता.जव्हार येथील उपकेंद्र इमारत,
मौजे खैरे-अंबिवली ता.वाडा येथील उपकेंद्र इमारतींचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम,भिवंडीचे खा.सुरेश म्हात्रे,आ.निरंजन डावखरे, दौलत दरोडा,स्नेहा दुबे – पंडित,राजन नाईक, राजेंद्र गावित,विनोद निकोले,हरिश्चंद्र भोये,विलास तरे,जिल्हाधिकारी गोविंद बोडके,मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,आयुक्त वसई विरार महानगरपालिका अनिल कुमार पवार,तसेच इतर सर्व अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी आदर्श शाळांचे देखील आभासी पद्धतीने उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.जिल्हा परिषद शाळा वरसाळे, जि.प.शाळा काळीभोंड,जि.प शाळा, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय मोखाडा आणि तलासरी,जि.प.शाळा,कणेर या शाळांचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.
तसेच य प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा – २,२४ – २०२५ या आर्थिक वर्षांमध्ये ज्या लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली.त्यामधील तालुक्यातील काही निवडक लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मंजुरी प्रमाणपत्रे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे,प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा डॉ.रूपाली सातपुते तसेच सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

