सुशील भोईर,वसई रोड,
जीवन विकास नागरी सहकारी पतसंस्था ” ब्ल्यू रिबन २०२४, पुरस्काराने सन्मानित,
वसईतील नामवंत पतसंस्था जीवन विकास नागरी सहकारी पतसंस्थेला बँको या संस्थेतर्फे ब्ल्यू रिबन २०२४ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
३५० ते ४०० कोटी रू.च्या ठेवी असलेल्या पतसंस्थेच्या वर्गवारीत गुणवत्तापूर्वक काम केल्याबद्दल हा पुरस्कार जीवन विकास नागरी पतसंस्थेला प्राप्त झाला आहे. या विभागात पुरस्कार प्राप्त करणारी कोकण विभागातील जीवन विकास नागरी सहकारी ही एकमेव पतसंस्था आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
या पुरस्कारामुळे जीविका पतसंस्थेच्या वाटचालीत आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. अँम्बे व्हॅली,लोणावळा येथे झालेल्या ” बँको ब्लू रीबन २०२४,” या पुरस्कार कार्यक्रमात अध्यक्ष नेल्सन दोडती,उपाध्यक्ष संज्याव रोझारिओ,संचालक आल्बर्ट परेरा,संचालक जीवन चौधरी व तज्ञ संचालक मँथ्यू डिसोझा यांनी हा पुरस्कार स्विकारला.
जीवन विकास नागरी पतसंस्थेची सभासद संख्या १८ हजाराहून अधिक असून मिश्र व्यवसाय ६०० कोटी रू.वर पोहोचला आहे. पतसंस्थेच्या सहा शाखा असून कोअर बँकींगद्वारे सक्षम सेवा पतसंस्था देत आहे.लवकरच सभासदांसाठी ऑनलाईन बँकींग सुरु करण्यात येणार आहे.पतसंस्था जीवन विकास मंडळ या पितृसंस्थेच्या माध्यमातून वैद्यकीय-शैक्षणिक निधीद्वारे गरजू व्यक्तिसाठी लाखो रु.चे आर्थिक सहाय्य करत असते.
पतसंस्थेला मिळालेला पुरस्कार हा संस्थेच्या सभासदांनी संस्थेवर टाकलेला विश्वास,सर्व आजी-माजी संचालक व कर्मचाऱ्यांच्या श्रमाचे फलित असल्याची प्रतिक्रिया पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष नेल्सन दोडती यांनी व्यक्त केली आहॆ.

