वाडा येथील स्फोटाप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी,
वाडा तालुक्यातील वडवली येथील मे.एम.डी.पायरोलीसीस एल.एल.पी कंपनीत गेल्या आठवड्यात स्फोट होवून
दोन मुलींना प्राण गमावावा लागला आहे,तर इतर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.या घटनेला कंपनी व्यवस्थापक व मालक जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी.तसेच पिडीत आणि मयत झालेल्या मुलांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी( अ ) ऑफ इंडियाचे सचिव रमेश भोईर यांनी केली आहे.
वाड्याचे तहसीलदार यांना भोईर यांनी दिलेल्या निवेदनातून कंपनीत काम करणारे परमार कुटूंबियातील पाच ते सहा सदस्यांना गंभीर स्वरूपाच्या दुखापती होवून काही लोकं अत्यवस्थ आहेत.त्यामधील लहान मुलांपैकी काजोल परमार ( वय ३ वर्षे ), व आकाश परमार ( वय १८ महिने ) या दोन चिमुकल्यांचा दुदैवी मृत्यू झाला आहे.सदर घटनेस सर्वस्वी कंपनी मालक व व्यवस्थापक जबाबदार आहॆत.या प्रकरणी संबंधितांवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,तसेच या कंपनीमध्ये टायर जाळुन तेल काढले जात आहे तसेच पावडर व तारेचे उत्पादन काढण्यात येत असल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत आहे.त्यामुळे कंपनी परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.सदर कंपनी तात्काळ बंद करण्यात यावी, तसेच परमार कुटूंबियांना न्याय म्हणून जखमींना प्रत्येकी पाच लाख व मृत निष्पाप बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रू.ची आर्थिक मदत देण्याची अशी मागणी केली आहे.
तरी या प्रकरणी तात्काळ कार्यवाही व्हावी,अन्यथा पिडीतांच्या कुटूंबियांना घेवुन आंदोलन करण्यात येईल,असा इशाराही देण्यात आला आहे.

