सचिन परब,
वसई शिवसेनेच्या ( उबाठा ) तालुकप्रमुखपदी काकासाहेब मोटे,
वसई पंचायत समितीचे माजी सदस्य व निष्ठावान शिवसैनिक,अशी ओळख असलेल्या काकासाहेब मोटे यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वसई तालुकाप्रमुखपदी नियुक्ती केली आहे.
शिवसेना नेते कै.आनंद दिघे व कै.वसंत वैती यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले काकासाहेब मोटे हे गेली वीस वर्षे समाजकारण व राजकारणात सक्रिय आहेत.वसई पूर्व भागात शिवसेना वाढीसाठी त्यांनी कै.वसंत वैती यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले.२००७ साली त्यांनी गोखीवरे गणातून वसई पंचायत समितीची निवडणूक लढवली व दणदणीत विजय मिळवला होता.बोईसर विधानसभेचा जो भाग वसई तालुक्यात समाविष्ट आहे.त्या विभागाच्या शहरी व ग्रामीण भागाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.त्यांच्या या नियुक्तीचे वसई पूर्व भागातील शिवसैनिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले आहे.या नियुक्तीनंतर माध्यमांशी बोलताना मोटे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे,त्याला मी तडा जाऊ देणार नाही.तसेच पक्षवाढीसाठी झोकून देऊन काम करणार असल्याचे सांगितले.

