दीपक मोहिते,
” परिवर्तन,”
दिल्लीचे तख्त ; भाजप काबीज करण्याची शक्यता,
सुमारे २७ वर्षानंतर भाजपला दिल्लीचे तख्त मिळण्याची शक्यता आहे.
विविध एक्झिट पोल्सनी भाजपला काठावरचे बहुमत मिळेल,असा अंदाज व्यक्त केला आहे.चाणक्य या एक्झिट पोल एजन्सीने भाजपला ३९ – ४४ पर्यंत तर मॅट्रिझने ३५ – ४० जागा मिळतील,असा अंदाज व्यक्त केला आहे.तर आम आदमी पार्टीची मजल ३२ – ३७ पर्यंत जाऊ शकते,असे म्हंटले आहे.त्यामुळे निकालानंतर घोडेबाजाराला उत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला केवळ ३ जागा मिळू शकतील,अशी शक्यता चाणक्यने व्यक्त केली आहे.भाजपला जर काठावरचे बहुमत मिळाल्यास भाजप ” मिशन लोटस,” राबवेल.ऐन निवडणुकीच्या धामधुमीत भाजपने आम आदमी पार्टीला भगदाड पाडले होते.त्याच पार्श्वभूमीवर भाजप निकालानंतर ” मिशन लोटस,” अंमलात आणण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.गेली २७ वर्षे देशाची राजधानी असलेल्या राज्यात आपल्याला सत्ता मिळवत येत नाही,याचे शल्य मोदी-शहा या दोघांना कायम बोचत होते.त्यामुळे यंदा भाजप सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते.घोडेबाजाराची शक्यता गृहीत धरून अरविंद केजरीवाल,मनीष सिसोदिया व मुख्यमंत्री अतिशी,या तिघांना आपच्या आमदाराभोवती मजबूत तटबंदी उभी करावी लागणार आहे.या निवडणुकीचा निकाल ८ फेब्रु.रोजी लागणार आहे,निकालानंतर राजधानीच्या शहरात राजकीय हालचालींना प्रचंड वेग येणार आहे.

