Author: दीपक मोहिते

जव्हार प्रतिनिधी, आयरे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना दिले कायद्याचे ज्ञान, आयरे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान आणि स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन देण्यासाठी जव्हार पोलीस विभागातर्फे विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते.या सत्रात पोलीस कर्मचाऱ्यांनी विविध महत्त्वाच्या विषयांवर माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना कायद्याची ओळख व जबाबदारीची जाणीव करून दिली. पोलीस शिपाई प्रदीप विटकर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी विविध पदांची माहिती दिली.त्यांनी पोलीस भरती प्रक्रिया,शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व,तसेच अभ्यासाची योग्य पद्धत,यावर सखोल मार्गदर्शन केले. शिवाय,मोबाईलचा मर्यादित वापर,विनापरवाना वाहन चालवण्याचे दुष्परिणाम, आणि अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी बाळगणे याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली. हेमंतकुमार डामसे यांनी पोक्सो कायद्याविषयी माहिती देताना बालविवाहाचे दुष्परिणाम,त्याची सामाजिक व कायदेशीर…

Read More

नवीन पाटील, सफाळे, पिकअप टेम्पो- बाईकच्या अपघातात एक ठार,दोन जखमी, मनोर मार्गावर गुरूवारी भीषण अपघात झाला आहे.या अपघातात एका दुचाकीवरून जात असलेल्या भाऊ बहिणींपैकी भावाचा मृत्यू झाला आहे.तर बहीण गंभीर जखमी झाली आहे. या व्यतिरिक्त आणखी एक दुचाकीस्वार देखील गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.विशाल यादव,असे या अपघातातील मृत दुचाकीस्वार तरूणाचे नाव आहे. पालघर तालुक्यातील मनोर येथील धुपोंडापाडा येथे राहणारे विशाल चांदमल यादव ( १९ ) आणि त्याची बहीण डिंपल चांदमल यादव ( २२ ) हे दोघे दुचाकीने पालघरच्या दिशेने निघाले होते. पालघर- मनोर मार्गावर गोवाडे गावाच्या हद्दीत एका वळणावर भरधाव पिकअप टेम्पोने विशाल यादव चालवत असलेल्या दुचाकीला मागून जोरात धडक…

Read More

संदीप लहांगे,डहाणू, जिल्हा परिषद शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा संपन्न, पालघर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे शाळांतील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा २०२४-२५ पालघर आर्यन हायस्कूलचे मैदान येथे पार पडल्या.मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे,अध्यक्ष प्रकाश निकम,कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संदीप पावडे,समाज कल्याण समिती सभापती मनीषा निमकर व जिल्हा परिषद सदस्य निता पाटील,सारिका निकम,भावना विचारे,पंचायत समिती सभापती शैला कोळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धा पार पडल्या,. या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांचे मी मनापासून कौतुक करतो,तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या, त्यांना सांभाळणाऱ्या शिक्षकांची जबाबदारी ही त्यांच्या पालकांपेक्षा मोठी असून त्या शिक्षकांचे करावे तितके कौतुक कमी आहे, हे शिक्षक या समाजातील…

Read More

संजय लांडगे,वाडा शहर, गुरुनाथ लहांगे यांना दिल्ली येथे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान, वाडा तालुक्यातील मेघवालपाडा येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या गुरुनाथ लहांगे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक व समाजिक कार्यातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिल्ली येथील राजेंद्र भवन येथे प्रसिद्ध बाबू जगजीवनराम कला संस्कृती आणि साहित्य ऍकेडमीतर्फे वीर बिरसा मुंडा राष्ट्रीय सन्मान पद व आदर्श शिक्षक,२०२४ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. गुरुनाथ भागोजी लहांगे मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा मेघवालपाडा तथा अध्यक्ष आदिवासी शिक्षक संघटना वाडा,सचिव प्राथमिक शिक्षक समन्वय समिती,वाडा यांना शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल लोकसभेच्या माजी सभापती मीराकुमार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.गुरुनाथ भागोजी लहांगे,हे…

Read More

वसंत भोईर,वाडा ग्रामीण, भाताला हमीभाव कागदावरच ; अद्याप भातखरेदी सुरूच झाली नाही… गेल्या काही वर्षापासून शेतीव्यवसाय अनिश्चिततेच्या वातावरणात हेलकावे खात आहे.पावसाचे उशिराने आगमन,अतिवृष्टी,अवकाळी पाऊस,परतीच्या पावसाचा फटका,नापिकी व सरकारचे कृषीविषयक दिशाहीन धोरण, इ.कारणामुळे शेती व्यवसाय उतरणीला लागला आहे.अशा परिस्थितीत सरकार उत्पादित शेतमालाला हमी भाव देणे व वेळेवर भातखरेदी केंद्रे सुरू करणे,या दोन महत्वाच्या बाबीकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे.त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. खाजगी बाजारपेठेत भाताला भाव मिळत नसल्यामुळे राज्य शासनाने पालघर जिल्ह्यात आदिवासी विभाग महामंडळाच्या माध्यमातून वाडा,मोखाडा तालुक्यातील १० खरेदी केंद्रे स्थापन केली आहेत.या खरेदी केंद्रावर सुमारे १ हजार ४६५ शेतकऱ्यांनी भात विक्रीसाठी नोंदणी केली.नोंदणी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना २…

Read More

वसंत भोईर,वाडा ग्रामीण, वाडा येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न, सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांचे ५२ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन वाडा पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे ह.वि.पाटील विद्यालय चिंचघर येथे नुकतेच आयोजित करण्यात होते.त्यास उदंड प्रतिसाद मिळाला. सदर विज्ञान प्रदर्शनात उच्च प्राथमिक गट व उच्च माध्यमिक गटाने विविध विषयांवर प्रयोगांची मांडणी केली होती.यामध्ये एकुण १०४ प्रयोगांची मांडणी करण्यात आली होती.शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा तसेच विद्यार्थ्यांसाठी वकृत्व व प्रश्नमंजुषा स्पर्धा यांचे आयोजन या विज्ञान प्रदर्शनात करण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन वाडा पंचायत समीतीच्या सभापती अस्मिता लहांगे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जि.प.सदस्या भक्ती वलटे,पं.स.सदस्य अमोल पाटील,सागर…

Read More

दीपक मोहिते, न्यूजलाईन, मासेमारी व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याची गरज… कोंकण महसूल महसुल विभागातील पालघर,रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग,या चार जिल्ह्यात शेती-बागायती सोबत मासेमारी व्यवसायही मोठ्या प्रमाणात करण्यात येतो.समुद्रकिनारी असलेल्या या चार जिल्ह्यात हजारो कुटुंबीय या मासेमारी व्यवसायावर आपला चरितार्थ चालवतात.समुद्रातील मत्स्य उत्पादनाने चारही जिल्ह्यात कोळी व मांगेला समाजाला आर्थिक वैभव मिळवून दिले.३० वर्षांपूर्वी मत्स्यउत्पादन हे माफक दरात विकण्यात येत असे व ते सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला परवडणारे होते.त्याकाळी मच्छिमारांना विपुल प्रमाणात मत्स्यउत्पादन मिळत असे,त्यामुळे ग्राहकांना ते वाजवी दरात विकणे शक्य होत असे.आज ती स्थिती उरली नाही,उत्पादनात घट व खर्चात वाढ,त्यामुळे माश्यांचे दर गगनाला पोहोचले आहेत, व ते ग्राहकांनाही परवडत नाही.उत्पादनात सतत घट का…

Read More

दीपक मोहिते, महानगरपालिकेच्या विकास कामांचा व योजनांचा आढावा, आज वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात आ.स्नेहा दुबे-पंडीत यांनी महानगरपालिकेची विविध विकास कामे व योजनांसंदर्भात महानगरपालिका अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. सदर आढावा बैठकीत महानगरपालिकेच्या विविध विभागातर्फे नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध सुविधा,लोककल्याणकारी योजना यांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांतर्फे आ.स्नेहा दुबे-पंडीत यांना देण्यात आल्या. त्याचबरोबर महानगरपालिकेची सुरु असलेली विकास कामे व महानगरपालिकेच्या पुढील योजना यासंदर्भात चर्चा करण्यात आली.आमदाराकडून महानगरपालिका अधिकाऱ्यांना विविध सूचना देण्यात आल्या व त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले. या आढावा बैठकीमध्ये प्रभारी आयुक्त रमेश मनाळे,अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, महानगरपालिकेचे सर्व उप-आयुक्त, सहा.आयुक्त व विभाग प्रमुख उपस्थित होते.

Read More

वसंत भोईर,वाडा ग्रामीण, शेतीची राखण नव्हे,पिकाला पाणी देतोय साहेब, तालुक्यातील ग्रामीण भागात कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना नव्याने लागवड केलेल्या भाजीपाला पिकांना पाणी देण्यासाठी कसरत करावी लागत आहे. विहिरीत मुबलक पाणी असले तरी वीजेअभावी या पाण्याचा शेतकऱ्यांना काही उपयोग होत नाही. त्यामुळे पाणी देण्यासाठी झारीचा उपयोग करावा लागत आहे.भातकापणीची कामे संपली आहे,आता भाजीपाला लागवड सुरू आहे त्याला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना धडपड करावी लागत आहे. तालुक्यात दिवसरात्र वीज पुरवठा खंडित होत असतो. त्याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.शेतातील वाळ,हरभरा,मुग, भाजीपाल्याला पाणी देता येत नसल्याने आम्ही झारीने पाणी देत असतो,असे गुंज गावातील शेतकरी मोहन पवार यांनी सांगितले.वीजपुरवठा सुरळीत व्हावा,अशी मागणी तालुक्यातील…

Read More

सूरज चव्हाण विरार पालघर जिल्ह्यात व्यसनाविरोधी पथनाट्य स्पर्धा २०२४ संपन्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यसनमुक्तीच्या विचारांच्या प्रचारासाठी व्यसनमुक्ती पथनाट्य स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. व्यसनांच्या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रखर विरोधी मताचे होते.सरकारने व्यसनमुक्तीची कास धरावी, यासाठी त्यांनी भारतीय संविधानात कलम ४७ च्या माध्यमातून खास तरतूद केली. व्यसनांना आळा घालणे, तसेच व्यसनी व्यक्तींचे मतपरिवर्तन करुन त्यांना निर्व्यसनी बनवणे,हे नशाबंदी मंडळाचे उद्दिष्ट साध्य व्हावे आणि युवकांपुढे तसेच सर्वसामान्य समाजापुढे व्यसनमुक्तीचा संदेश जावा,यासाठी नशामुक्त भारत अभियानांतर्गत, जिल्हा परिषद पालघर समाजकल्याण विभाग, आरोग्य विभाग,सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय,सत्पाळा,विरार यांचा मराठी विभाग आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच सेंट…

Read More