सूरज चव्हाण विरार
पालघर जिल्ह्यात व्यसनाविरोधी पथनाट्य स्पर्धा २०२४ संपन्न,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यसनमुक्तीच्या विचारांच्या प्रचारासाठी व्यसनमुक्ती पथनाट्य स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. व्यसनांच्या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रखर विरोधी मताचे होते.सरकारने व्यसनमुक्तीची कास धरावी, यासाठी त्यांनी भारतीय संविधानात कलम ४७ च्या माध्यमातून खास तरतूद केली.
व्यसनांना आळा घालणे, तसेच व्यसनी व्यक्तींचे मतपरिवर्तन करुन त्यांना निर्व्यसनी बनवणे,हे नशाबंदी मंडळाचे उद्दिष्ट साध्य व्हावे आणि युवकांपुढे तसेच सर्वसामान्य समाजापुढे व्यसनमुक्तीचा संदेश जावा,यासाठी नशामुक्त भारत अभियानांतर्गत, जिल्हा परिषद पालघर समाजकल्याण विभाग, आरोग्य विभाग,सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय,सत्पाळा,विरार यांचा मराठी विभाग आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय सत्पाळा विरार जिल्हा पालघर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यसनाविरोधी पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सेंट जोसेफ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.कविता आल्मेडा,उपप्राचार्य डॉ सुभाष डिसोजा,राष्ट्रीय प्रशिक्षक, समुपदेशक राष्ट्रपती पदक पुरस्कार विजेते बॉस्को डिसोजा,पथनाट्य मार्गदर्शक भरत भाले आणि नशाबंदी मंडळाचे पालघर जिल्हा समन्वयक मिलिंद पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.कविता आल्मेडा यांनी व्यसनाधीनता किती भयानक असते,हे उपस्थित युवकांना समजावून सांगितले. जिल्हा परिषद पालघर समाजकल्याण अधिकारी यांनी पाठवलेला संदेश उपस्थित नागरिकांना वाचून दाखवण्यात आला.बॉस्को डिसुझा यांनी सांगितले,की व्यसनमुक्तीच्या लढ्यामध्ये सहभागी असल्याचे सांगत निर्व्यसनी युवा पिढी राष्ट्रीय असल्याचे म्हटले व ही संपत्ती जतन करण्यासाठी आमचा सदैव सक्रिय सहभाग राहिल. बॉस्को यांनी आपल्या व्यसनमुक्तीचे सारे श्रेय डॉ. सुभाष डिसोजा यांना दिले. पालघर जिल्ह्यातील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होऊन व्यसनमुक्ती (अंमली पदार्थ) विषयांवर समस्या सांगितल्या,. जास्तीत जास्त उपाययोजना करण्यावर भर दिला व त्यांची अमलबजावणी करुन व्यसनमुक्तीसाठी प्रयत्नशील राहण्याचा संदेश पालघरकरांना दिला.
सदर स्पर्धेचे परीक्षण बॉस्को डिसोजा आणि भरत भाले यांनी केले.स्पर्धेत प्रथम क्रमांक सेंट जोसेफ कनिष्ठ महाविद्यालय,नंदाखाल व व्दितीय क्रमांक विवा महाविद्यालय,विरार यांनी पटकावला.विशेष श्रेणी पुरस्कार सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय, सत्पाळा,विरार (पश्चिम) विरार यांना देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जगदीश संसारे यांनी केले,तर सहाय्यक प्राध्यापक डॉ प्रसाद डाबरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.मिलिंद पाटील यांनी यावेळी उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ दिली.

