संजय लांडगे,वाडा शहर,
गुरुनाथ लहांगे यांना दिल्ली येथे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान,
वाडा तालुक्यातील मेघवालपाडा येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या गुरुनाथ लहांगे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला.
त्यांच्या शैक्षणिक व समाजिक कार्यातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिल्ली येथील राजेंद्र भवन येथे प्रसिद्ध बाबू जगजीवनराम कला संस्कृती आणि साहित्य ऍकेडमीतर्फे वीर बिरसा मुंडा राष्ट्रीय सन्मान पद व आदर्श शिक्षक,२०२४ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
गुरुनाथ भागोजी लहांगे मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा मेघवालपाडा तथा अध्यक्ष आदिवासी शिक्षक संघटना वाडा,सचिव प्राथमिक शिक्षक समन्वय समिती,वाडा यांना शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल लोकसभेच्या माजी सभापती मीराकुमार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.गुरुनाथ भागोजी लहांगे,हे गेल्या २५ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून त्यांची संपूर्ण सेवा ही आदिवासी दुर्गम भागात झाली आहे.उज्जैनी सारख्या अतिदुर्गम भागात काम करीत असताना शाळेचे नाव क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी शिखरावर नेऊन ठेवले,. कबड्डी खेळात जिल्हास्तरीय स्पर्धेत त्यांची शाळा मुलींच्या कबड्डी या खेळात प्रथम क्रमांक पटकावणारी शाळा ठरली होती.तसेच वाडा तालुक्यापासून सर्वात दूर असणारी केंद्रशाळा आपल्या शाळेला आलेल्या अडचणींना तोंड देत त्यांनी शाळेचे नियोजनबद्ध बांधकाम केले.गेल्या २५ वर्षात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.या सन्मानाबद्दल सर्व स्थरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

