दीपक मोहिते,
महानगरपालिकेच्या विकास कामांचा व योजनांचा आढावा,
आज वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात आ.स्नेहा दुबे-पंडीत यांनी महानगरपालिकेची विविध विकास कामे व योजनांसंदर्भात महानगरपालिका अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.
सदर आढावा बैठकीत महानगरपालिकेच्या विविध विभागातर्फे नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध सुविधा,लोककल्याणकारी योजना यांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांतर्फे आ.स्नेहा दुबे-पंडीत यांना देण्यात आल्या. त्याचबरोबर महानगरपालिकेची सुरु असलेली विकास कामे व महानगरपालिकेच्या पुढील योजना यासंदर्भात चर्चा करण्यात आली.आमदाराकडून महानगरपालिका अधिकाऱ्यांना विविध सूचना देण्यात आल्या व त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले.
या आढावा बैठकीमध्ये प्रभारी आयुक्त रमेश मनाळे,अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, महानगरपालिकेचे सर्व उप-आयुक्त, सहा.आयुक्त व विभाग प्रमुख उपस्थित होते.

