वसंत भोईर,वाडा ग्रामीण,
शेतीची राखण नव्हे,पिकाला पाणी देतोय साहेब,
तालुक्यातील ग्रामीण भागात कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना नव्याने लागवड केलेल्या भाजीपाला पिकांना पाणी देण्यासाठी कसरत करावी लागत आहे. विहिरीत मुबलक पाणी असले तरी वीजेअभावी या पाण्याचा शेतकऱ्यांना काही उपयोग होत नाही. त्यामुळे पाणी देण्यासाठी झारीचा उपयोग करावा लागत आहे.भातकापणीची कामे संपली आहे,आता भाजीपाला लागवड सुरू आहे त्याला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना धडपड करावी लागत आहे.
तालुक्यात दिवसरात्र वीज पुरवठा खंडित होत असतो. त्याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.शेतातील वाळ,हरभरा,मुग, भाजीपाल्याला पाणी देता येत नसल्याने आम्ही झारीने पाणी देत असतो,असे गुंज गावातील शेतकरी मोहन पवार यांनी सांगितले.वीजपुरवठा सुरळीत व्हावा,अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करत आहेत.तालुक्यात पाणी मुबलक असूनही त्याचा शेती व बागायती क्षेत्राला होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे, आहे.,वाडा तालुक्यांत खरीप व रब्बी पीक मोठ्याप्रमाणात घेण्यात येत असते.एकेकाळी वाडा तालुक्याची ओळख तांदळाचे कोठार म्हणून होत असे,आज हे पीक पाण्याअभावी लयाला गेले आहे.

