वसंत भोईर,वाडा ग्रामीण,
वाडा येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न,
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांचे ५२ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन वाडा पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे ह.वि.पाटील विद्यालय चिंचघर येथे नुकतेच आयोजित करण्यात होते.त्यास उदंड प्रतिसाद मिळाला.
सदर विज्ञान प्रदर्शनात उच्च प्राथमिक गट व उच्च माध्यमिक गटाने विविध विषयांवर प्रयोगांची मांडणी केली होती.यामध्ये एकुण १०४ प्रयोगांची मांडणी करण्यात आली होती.शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा तसेच विद्यार्थ्यांसाठी वकृत्व व प्रश्नमंजुषा स्पर्धा यांचे आयोजन या विज्ञान प्रदर्शनात करण्यात आले होते.
विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन वाडा पंचायत समीतीच्या सभापती अस्मिता लहांगे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी जि.प.सदस्या भक्ती वलटे,पं.स.सदस्य अमोल पाटील,सागर ठाकरे, योगेश गवा,गटविकास अधिकारी वैभव शिंदे, डाॅ.गिरीश चौधरी,उपसरपंच मनेश पाटील,मधुकर पाटील, श्रीकांत भोईर,गटशिक्षण अधिकारी जयवंत कामडी,मुख्याध्यापक संदेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन जव्हारकर यांनी केले.सूत्रसंचालन जितेंद्र पाटील व भक्ती पाटील यांनी केले तर आभार मोहन पाटील (गुरुजी) यांनी मांडले.हे विज्ञान प्रदर्शन व्यवस्थित पार पडावे यासाठी ह.वि.पाटील विद्यालय चिंचघरचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

