- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मी ज्या नालासोपारा मतदारसंघातून येतो…
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
Author: दीपक मोहिते
जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे शैक्षणिक साहित्य व पोषण आहाराचे वाटप, सकल आदिवासी संस्था, कल्याणच्या महिला पदाधिकारी आणि दात्यांतर्फे आज शिरोशी व तळ्याचापाडा तसेच ग्रामपंचायत जुने जव्हार येथे गणवेश व शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले. तसेच याच कार्यक्रमात गरोदर माता-भगिनींसाठी पूरक आहार आणि नवरात्र भेट कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला. सदर कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक आदिवासी तारपा नृत्याने करण्यात आले. त्यानंतर संस्थेच्या अध्यक्षा सुनंदा डेकाटे, सचिव योगिनी कोसराबे,कोषाध्यक्षा संगीता निनावे,तसेच सदस्या कांता आष्टीकर व वृषाली मसुरकर यांनी विद्यार्थी आणि गरोदर माता-भगिनींची आपुलकीने विचारपूस करून मार्गदर्शन केले.यावेळी ते म्हणाले की, “आम्हीही आपल्या आदिवासी समाजाचे असून,जास्तीत जास्त गरीब व गरजू विद्यार्थ्यांनी प्रगती करून उज्ज्वल भविष्य…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” नवे जिल्हे नंतर निर्माण करा,सर्वप्रथम बोईसर नगरपरिषदेचे भिजत पडलेले घोंगडे मार्गी लावा… जे सरकार बोईसर ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये रूपांतर करू शकत नाही,ते सरकार आता २० नवीन जिल्हे व ८१ तालुके निर्माण करण्याच्या घोषणा करत सुटले आहे.राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच याविषयी घोषणा केली आहे.त्यामुळे बोईसर व अन्य सहा गावातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. पालघर जिल्ह्यातील बोईसर ग्रामपंचायतीने नगरपरिषदेची निर्मिती होण्यासंदर्भात सर्व निकष पूर्ण केले आहेत.वाढते नागरीकरण ( लोकसंख्या – जवळपास सव्वा लाखाच्या घरात ) नागरी सुविधांचा उडालेला बोजवारा व प्रशासकीय कामकाजामध्ये निर्माण झालेला विस्कळीतपणा लक्षात ग्रामपंचायतीने नगरपरिषद स्थापन करण्याचा प्रस्ताव मंजूर करून काही वर्षांपूर्वी मंत्रालयात…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व -प्रभाग क्र.२२, प्रभाग क्र.२२ मध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे, या प्रभागात विविध समाजाचा भरणा आहे.येथे वाढत्या नागरीकरणामुळे मराठी भाषिक आता अल्पसंख्याक झाले आहेत.नव्याने निर्माण झालेल्या नागरी संकुलात विविध जाती धर्माच्या लोकांचा भरणा सर्वाधिक आहे.जलाराम बापू नगर परिसरात भलीमोठी झोपडपट्टी असून काठियावाडी व श्रमिक वर्ग या झोपडपट्टीत मोठ्या संख्येने राहतो.एकंदरीत या प्रभागात मिश्र लोकवस्ती आहे.गेल्या काही वर्षात येथे मोठ्याप्रमाणात नागरीकरण झाले.पूर्वी या भागात अनेक मिठागरे होती,पण त्याचे क्षेत्र आता कमी झाले आहे.या खारटन जमिनीची मालकी केंद्रीय सॉल्ट विभागाकडे आहे.पण,१९९० पासून मीठ व्यवसाय हळूहळू इतिहास जमा झाला. त्यामुळे या जमिनीवर बिल्डर लॉबीची वाकडी नजर आहे.पण या जमिनीची…
दीपक मोहिते, जिल्हा प्रशासन व वसई विरार मनपा यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव, पालघर जिल्ह्यात काल रेड अलर्ट असताना पहाटे पाचच्या सुमारास विरार पूर्वेस चंदनसार विभागातील बरफपाडा येथे अचानक ५० घरामध्ये पाणी शिरले व एक घर पाण्याचा प्रवाहात वाहून गेले.या दुर्घटनेची वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नैसर्गिक आपत्ती निवारण विभागाला थांगपत्ता नव्हता. तर जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात या घटनेचा साधा उल्लेखही करण्यात आला नाही. या घटनेवरून महानगरपालिका व जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये बिलकुल समन्वय नसल्याचे दिसून आले आहे.या नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या ३० कुटुंबाना एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मदतीचा हात पुढे करत ३० चटया व रेशनिंग किटचे वाटप केले. काल पालघर जिल्ह्यात विरार पूर्व…
दीपक मोहिते, कामण येथे पोषण महाकार्यक्रमाचे यशस्वी आयोजन, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प,वसई – कामण चंद्रपाडा येथे आई चंडिका नवरात्र उत्सवात आठव्या पोषण महाकार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.स्थानिक स्वराज्य संस्था महिला लोकप्रतिनिधी प्रशिक्षण व महिला मेळाव्यामध्ये आहाराचे प्रात्यक्षिक व आहाराविषयी मार्गदर्शन,प्रभात फेरी,स्वच्छता ही सेवा,आदिशक्ती अभियान,महिलांचे आरोग्य विषयक माहिती व मार्गदर्शन, महिला बालकल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती,मातृवंदना योजना, नारी सशक्त अभियान,लेक लाडकी योजनाबाबत प्रचार, प्रसिद्धी,बालविवाह कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा व बालसंगोपन योजना याविषयी माहिती देण्यात आली.उपस्थित महिला बालविकास संरक्षण अधिकारी संभाजी पवार, तसेच ग्रामपंचायत चंद्रपाडा मधील सरपंच, उपसरपंच,प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर,एएनएम, आशा वर्कर,सर्व विभागाच्या मुख्य सेविका,ग्रामपंचायत अधिकारी ग्रामस्थ अंगणवाडी सेविका…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” सोनम वांगचूक यांना रासुकाखाली अटक करणे,सरकारच्या हुकूमशाहीचे लक्षण, सोनम वांगचुक यांना दोन दिवसापूर्वी अटक करण्यात आली आहे.लडाखमध्ये त्यांनी स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा, म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण आंदोलन छेडले होते.२४ सप्टें.२०२५ रोजी या आंदोलनाने हिंसक रूप धारण केले.उपोषण करत असलेले तरुण,विद्यार्थी आणि काही समुदायांनी बाहेर पडून कार्यालये,राजकीय कार्यालये, वाहने जाळली.आंदोलनात जाळपोळ,लाठीचार्ज व गोळीबार होऊन काही लोकांना प्राण गमवावे लागले. या घटनेत सोनम वांगचुक यांना काल अटक झाली आहे. लडाखमध्ये त्यांनी स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण आंदोलन छेडले होते.२४ सप्टें.२०२५ रोजी आंदोलन हिंसक झाले.उपोषण करत असलेल्या काही तरुण,विद्यार्थ्यांनी आंदोलनातून बाहेर पडून राजकीय कार्यालये,सरकारी…
दीपक मोहिते, निसर्गाची अवकृपा, पिडीत शेतकऱ्यांना आधाराची गरज,अन्यथा राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढणार… यंदा पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला असून मराठवाडा,रायगड व पालघर जिल्ह्यातील शेती व बागायतीचे होत्याचे नव्हते झाले आहे.पावसाचा रुद्रावतार व शेतीची झालेली नासाडी,लक्षात घेऊन सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करायला हवा,पण आपले सरकार हे सध्या बघ्याच्या भूमिकेत आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आता आत्महत्येच्या मार्गावर जाईल,अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे.केंद्र व राज्य सरकारने राज्याच्या ग्रामीण भागात निरीक्षण पथके पाठवून तातडीने नुकसानीची पाहणी करावी व लवकरात लवकर पिडीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी,अशी मागणी करण्यात येत आहे. यंदा मे महिन्यात सुरू झालेला पाऊस अद्याप थांबायचे नाव घेत नाही,त्यामुळे बळीराजा पार धायकुतीला…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.२१, परप्रांतीय मतदारांवर भाजपची भिस्त… सदर प्रभाग हा वसई व नालासोपारा पूर्व भागात पसरला असून बाहेरून येथे स्थायिक होणाऱ्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे.या प्रभागात खारटन जमिनीचे क्षेत्र प्रचंड असूनही १९८० च्या दशकात येथे मोठ्याप्रमाणात बांधकाम परवानग्या दिल्या गेल्या.त्यामुळे अल्पावधीत या प्रभागातील लोकसंख्या गगनावर पोहोचली.अनेक नागरी वसाहती सरसकट खारटन जमिनीवर उभ्या राहिल्या.या वसाहतीमध्ये राहायला आलेल्या नागरिकांना १९८० ते २०००,अशी दोन दशके नागरी सुविधाअभावी अनेक यातना सहन कराव्या लागल्या.२००० साली सुर्या पाणीप्रकल्पाच्या टप्पा – १ मधून पाणी मिळू लागल्यानंतर मात्र या नागरी संकुलातील रहिवाश्याना काही अंशी दिलासा मिळाला. त्यानंतरच्या काळातही सिडको प्राधिकरणाने बांधकाम परवानग्या देण्याचा सपाटा…
वसंत भोईर,वाडा अन्यायकारक करवाढ मागे घ्या,अन्यथा तीव्र आंदोलन, वाडा नगरपंचायतीने अलीकडेच निवासी व व्यापारी मालमत्तेच्या सुधारित कर आकारणीच्या नोटीसीचे वाटप सुरु केले आहे.अचानक झालेल्या करवाढीने येथील नागरिक हवालदिल झाले असुन नागरिक व व्यापारी यांच्यावर अतिरिक्त कराचा बोजा पडला आहे.वाढीव करवाढ शिथिल करा,अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाविकास आघाडीने नगरपंचायत प्रशासनाला दिला आहे. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी मनोज पष्टे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.वाडा नगरपंचायत ही नव्याने स्थापन झालेली नगरपंचायत असून त्यावर मालमत्ता व दिवाबत्ती करासोबतच वृक्ष कर,शिक्षण कर,रोजगार हमी कर,अग्निशमन कर,उपयोग कर्ता,अशा अतिरिक्त करांचीही वाढ झाली आहे.या वाढीव करामुळे नागरिक व व्यापारी यांच्या करामध्ये अवाढव्य वाढ…
वसंत भोईर, वज्रेश्वरीचे मूळ स्थान भागीरथी माता ; निसर्गरम्य पण दुर्लक्षित वाडा तालुक्यातील गुंजकाठी येथे पांडवकालीन अधि प्राचीन भागीरथी मातेचे मंदिर आहे.निसर्गरम्य, डोंगराळ भागात वसलेले हे मंदिर सध्या दुर्लक्षित अवस्थेत आहे. तालुक्यातील गुंज काटी येथील मंदाकिनी पर्वतावर भगवान परशुराम व त्याची माता भागीरथी आज ही तपश्चर्या करीत आहेत.अशी भाविकांची समजूत आहे. पांडव अज्ञातवासात असताना ते येथे आले होते.त्यांनी देवतांसाठी मंदिर उभे करावे या हेतूने मंदिर बांधावयास घेतले.उंदीराची मूर्ती पूर्ण होण्याआधी कोंबडा आरवल्याने ( पहाट ) झाल्यामुळे त्यांनी बांधकाम थांबवले.अपूर्ण मंदिराचे अवशेष आजही गुंजकाटी येथे आढळतात.त्याचप्रमाणे येथे शिवमंदिराचे अवशेष, देवतांच्या पालना घराचे अवशेष आहेत.मंदिर पूर्ण न झाल्याने तेथील देवता आश्रयासाठी भागीरथी…
