Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, बविआचा मनपा मुख्यालयावर धडक मोर्चा, वसई,नालासोपारा व वसई शहरातील रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात काल बहुजन विकास आघाडीने नालासोपाऱ्याचे माजी आ. क्षितिज ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला.यावेळी त्यांनी आपल्या भाषणात मनपा प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले.रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यामुळे लोकांचे जीव जात असून अधिकाऱ्यांना त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही,असा थेट आरोप त्यांनी यावेळी केला. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास हा मोर्चा काढण्यात आला होता.या मोर्च्यात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.गणेशोत्सव व नवरात्रीच्या काळात नागरिकांना या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला.या तीन शहरातील रस्त्याची अवस्था ” रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते,” अशी बिकट अवस्था झाल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट…

Read More

दीपक मोहिते, रामनाथ गोयंका ; थोर पत्रकार व स्वातंत्र्यसैनिकाला शतशः प्रणाम, इंडियन एक्‍स्प्रेस वृत्तपत्रसमूहाचे संस्थापक अध्यक्ष आणि स्वातंत्र्य चळवळीतील ज्येष्ठ नेते रामनाथ गोयंका यांचा आज स्मृतिदिन असुन पत्रकारिता क्षेत्रात तो उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होईल किंवा नाही, हे सांगता येणार नाही.कारण हल्लीची गोदी मिडिया या थोर पत्रकार व स्वातंत्र्यसैनिकाची दखल घेईल,असे वाटत नाही. रामनाथ गोयंका यानी आणिबाणीच्या काळात सरकारशी जो लढ़ा दिला,त्याची नोंद जगभरातील देशाच्या माध्यमानी त्याकाळी घेतली होती.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यानी आपला वृत्तपत्र समूह नेटाने चालवला.सरकारने प्रसिद्धि माध्यमावर लादलेली सारी बंधने त्यानी मोठ्या धाडसाने झुगारली व आपल्या व्यवसायाशी ते आपल्या पत्रकारितेशी कायम प्रामाणिक राहिले.त्याकाळात सरकारने माध्यमांची प्रचंड गळचेपी चालवली होती,परंतु…

Read More

दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” कोणाच्याही कोंबड्याच्या आरवण्याने एकदाचे उजडू द्या… स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष सध्या जागे झाल्याचे पाहायला मिळत आहे.सत्ताधारी पक्षाची मंडळी सरकारमधील आपल्या नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन मागण्याची निवेदने देत सुटले आहेत.तर कालचे सत्ताधारी आता विरोधात आल्यानंतर मोर्चे काढू लागले आहेत.सदर बाब वसईकर जनतेसाठी सुखद असली तरी त्यामधून नक्की काय निष्पन्न होणार ? हे येणाऱ्या काळात वसईच्या जनतेला अनुभवायला मिळणार आहे.या सर्व घडामोडीसंदर्भात करदात्यांनी फारसे मनाला लावून घेता कामा नये.कारण हे सारे उपद्व्याप ” राजकीय कुरघोडी,” या सदरात मोडत असतात. असो,कुणाच्याही कोंबड्याच्या आरवण्याने एकदाचे उजडू द्या,अशा निर्णयाप्रत वसई – विरारची जनता आली आहे.या उपविभागातील अंतर्गत रस्त्याची…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.२६, वर्षानुवर्षे साथ देणारा हा प्रभाग बविआच्या हातून निसटू शकतो… प्रभाग क्र २६ हा सुशिक्षित असा प्रभाग आहे,या प्रभागाचा आनंद नगर,स्टेला v अन्य काही परिसर व्यापारी क्षेत्र म्हणून ओळखला जातो.हा परिसर रेल्वे स्थानकाला लागून असल्यामुळे येथे व्यापार – उदिमाला सुगीचे आले आहेत,आजही ते व्यापारी वैभव टिकून आहे. हा प्रभाग गेली अनेक वर्षे बहुजन विकास आघाडीच्या कायम पाठीशी उभा राहिला.पण सध्या तशी परिस्थिती उरलेली नाही.त्यांच्या एका बड्या नेत्याने गेली अनेक वर्षे पक्षाच्या दैनंदिन कामापासून स्वतःला दूर राखले आहे.अंतर्गत वाद व मतभेदापायी येथील नागरिकांमध्ये लोकप्रिय असलेला हा नेता गेली अनेक वर्षे राजकीय पटलावरून नाहीसा झाला आहे.त्याचा…

Read More

दीपक मोहिते, वसईतील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी तातडीने मान्य,दुरुस्तीच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरु, वसईच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या आ.स्नेहा दुबे पंडित यांनी वसईतील महत्वाचे रस्ते,उड्डाणपूल व रेल्वे ओव्हर ब्रिजच्या कामांना गती देण्यासाठी ३० सप्टें.२०२५ रोजी वर्षा या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेमध्ये वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण एम.एम.आर.डी.ए.तर्फे करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले होते. तथापि,याविषयीची प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात करणे व काम पूर्ण करणे या दरम्यान लागणाऱ्या कालावधीत नागरिकांचा त्रास कमी व्हावा,यासाठी तातडीने हे रस्ते किमान वाहतूक योग्य करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे मुख्यमंत्री यांनी…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.२५, मिश्र लोकसंख्येचा प्रभाग बविआ राखणार का ? हा प्रभाग वसई गाव म्हणून ओळखला जातो.स्थानिक व बाहेरून स्थलांतरीत झालेले नागरिक,अशी रचना या प्रभागाची आहे.हिंदू,ख्रिस्ती व मुस्लिम अशी मिश्र लोकवस्ती या प्रभागात पाहायला मिळते.शहरी भागाला लागून असलेल्या परिसरात टोलेजंग इमारती व गावात छोटेखानी कौलारू घरे असे या प्रभागाचे स्वरूप आहे.महानगरपालिका स्थापन होण्यापूर्वी येथे सुमारे अनेक वर्षे वसई नगरपालिका अस्तित्वात होती. या नगरपालिकेच्या काळात अनेक नागरी समस्या भेडसावत होत्या,त्याचे प्रमाण हल्ली कमी झाले आहे.मात्र या प्रभागाचा नियोजनबद्ध विकास मात्र होऊ शकला नाही.त्यामुळे अरुंद रस्ते,वाहतूक कोंडी,मार्केट,वाहनतळ व अन्य नागरी समस्या आजही ” जैसे थे,” स्थितीच आहेत.नगरपरिषद काळात…

Read More

दीपक मोहिते, सामाजिक भान, दुर्देवी घटनेचे मार्केटिंग नको…. विरार येथील नावाजलेल्या शिक्षण संस्थेच्या संकुलात दोन दिवसांपूर्वी जो काही गैरप्रकार झाला,त्यामधील दोषींवर कारवाई व्हायला हवी,त्याविषयी कोणाचेही दुमत असता कामा नये.समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या या अपप्रवृत्तीना ठेचायलाच हवे.त्यादृष्टीने पोलीस यंत्रणा सध्या सक्रिय झाली आहे.मात्र या घटनेचे मार्केटिंग होता कामा नये.पण दुर्देवाने तसे होताना पाहायला मिळत आहे.गेली अनेक दशके विविध जाती – धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत असलेल्या ऐतिहासिक नगरीमध्ये अशाप्रकारचा किळसवाणा प्रकार घडावा, ही खऱ्या अर्थाने दुर्देवी बाब आहे,आणि त्याचा निषेध करावा,तेवढा थोडाच… पोलीस यंत्रणा,या संपूर्ण घटनेचा सखोल तपास करत आहे,आणि या घटनेतील दोषींना ते गजाआड करतील,याविषयी शंका घेण्याचे कारण नाही.मात्र या…

Read More

वाडा प्रतिनिधी, निशेत रस्त्यावर भलामोठा खड्डा पडल्यामुळे बससेवा बंद, तालुक्यातील कळंभे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या निशेत या पाड्याकडे जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे.मात्र या पावसाळ्यात या रस्त्यावर भला मोठा खड्डा पडल्यामुळे या मार्गावरील बससेवा बंद करण्यात आली आहे.त्यामुळे शाळेतील विद्यार्थांना चार ते कि.मी.चा पायी चालत जाऊन शाळा गाठावी लागत आहे. बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराविरोधात ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत. कळंभे ग्रामपंचायत हद्दीत निशेत,ठाकूर पाडा असून या पाड्यावर जाण्या येण्यासाठी बससेवा होती.येथील विद्यार्थी बसने शाळेत जात येत होते.मात्र या रस्त्यावर भलामोठा खड्डा पडल्याने बससेवा आता बंद झाली आहे.त्यामुळे येथील विद्यार्थांना कळंभे येथे शाळेत येण्यासाठी चार ते पाच किलोमीटर अंतर पायी चालत…

Read More

तलासरी प्रतिनिधी, २७ लाखाचा मुद्देमाल तलासरी पोलिसांनी केला हस्तगत, तलासरी पोलीस स्टेशन हद्दीत सावरोली येथील श्रीनाथ इंडस्ट्रियल इस्टेटमधील एका कंपनीच्या गोडाऊनच्या सुरक्षा रक्षकाने गोडाऊन चे शटर तोडून गाळ्यातील २७ लाख रु.किमतीचे मोटरपंप, वेगवेगळ्या प्रकारची केबल चोरून नेली होती.याप्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सावरोली गावातील या कंपनीने जोतिन ओंकार सिंग राहणार वापी,यास सुरक्षा रक्षक म्हणून कामावर ठेवले,त्याने अवघ्या दोन दिवसात कंपनीच्या गाळ्याचे शटर तोडून २७ लाख रु.चे मोटर पम्प तसेच केबल चोरून नेली.याप्रकरणी तलासरी पोलिसांनी तो तपास करून दोन दिवसांपूर्वी चोरीस गेलेला मुद्देमाल बाळगणारे परवेज आलम जाफर अली खान आणि अक्रम अली अन्वर अली रा. अंधेरी मुंबई…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” शेतीच्या नुकसानी संदर्भात राज्य सरकार संवेदनशील नाही, राज्यात कृषी क्षेत्राचे झालेले नुकसान लक्षात घेऊन राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी ग्रामीण भागात सर्वत्र होत आहे.पण आपले मायबाप सरकार कालपर्यंत नियमात तशी तरतूद नसल्याचे तसेच आजवर कधीच ओला दुष्काळ जाहीर झाला नाही,असे सांगत टोलवाटोलवी करत होती.मात्र काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी टंचाईच्या काळात ज्या सवलती देण्यात येतात व उपाययोजना करण्यात येत असतात,त्या लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.उशीरा का होईना,पण सरकारला शहाणपण सुचलं,असंच या सर्व घडामोडीवरून म्हणावे लागेल. गेल्या पंधरा दिवसात राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ६० लाख हे.जमिनीवरील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.ऑगस्ट महिन्यापर्यंत झालेल्या…

Read More